Swasthyam Ayurved Panchkarm Multispeciality Center

Swasthyam Ayurved Panchkarm  Multispeciality  Center Best Ayurvedic hospital in Miraj

हरे कृष्ण...🙏💐धन्य आजी दिन संत दर्शनाचा... 💐साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा....🎁एक अचानक संस्मरणीय भेट...असा एक दुग्ध ...
05/11/2025

हरे कृष्ण...🙏
💐धन्य आजी दिन संत दर्शनाचा...
💐साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा....

🎁एक अचानक संस्मरणीय भेट...असा एक दुग्ध शर्करा योग जुळून आला....
तो म्हणजे सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी..

✅आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) चे जगप्रसिद्ध असे वरिष्ठ सन्यासी आदरणिय, वंदनीय, तेजस्वी ,प्रेमळ, मधुरवाणी असणारे .....
💐परमपूज्य श्रील भक्ती रसामृत स्वामी महाराज💐...
आमच्या" राधारमण" वास्तू मध्ये त्यांचे आगमन झाले... येण्याच प्रयोजन होत छोटीशी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेण्यासाठी परंतु ...त्यांनीच आम्हाला एक अध्यात्मिक खरी खूरी ट्रीटमेंट दिली....
✅"स्वास्थ्यम" आयुर्वेद पंचकर्म मल्टी स्पेशालिटी सेंटर मध्ये परम पूज्य महाराजांनी सर्व गोष्टी पाहिल्या, तसेच सेंटरचे व इथे असणाऱ्या सुविधा, सर्व कर्मचारी वर्गाचे त्यांनी कौतुकही केले..आणि ट्रीटमेंट बद्दल पण समाधानी झाले....

✅पुढे इस्कॉन सेंटर मिरज व आजूबाजू परिसरातील भक्तांसाठी महाराजांनी छोटासा क्लास दिला....सर्वांनी कार्तिक महिन्यांमधील" दामोदर अष्टकम" गायले व
दिपदान याचा कार्यक्रम झाला....
..... 💐अशा दिव्य संघाचा काल दिवसभर आम्हाला लाभ मिळाला...." वैष्णव सेवेनेच भगवंत प्रसन्न होतात" याची दिव्य अनुभूती आम्हा सर्वांना आली....... खूप खूप धन्यवाद की महाराजांना वैयक्तिकरित्या आयुर्वेदिक चिकित्सा देण्याची संधी लाभली व त्यांचा दिव्य संघ आम्हाला मिळाला....

सर्व भक्तांचे खूप खूप धन्यवाद🙏🙏
हरे कृष्ण...🙏..

🙏आपले सेवक
🌿वैद्य रमेश व सौ आरती गुजर आणि परिवार...
"स्वास्थ्यम" आयुर्वेद पंचकर्म मल्टी स्पेशालिटी सेंटर मिरज 8669065390/8421505752

🌿 राष्ट्रीय आयुर्वेद दिवस🌿🎯 मंगळवार दि.23 सप्टेंबर 2025 रोजी "राष्ट्रीय आयुर्वेद दिवस"  निमित्त निमा मिरज तालुका...तसेच ...
25/09/2025

🌿 राष्ट्रीय आयुर्वेद दिवस🌿

🎯 मंगळवार दि.23 सप्टेंबर 2025 रोजी
"राष्ट्रीय आयुर्वेद दिवस" निमित्त निमा मिरज तालुका...
तसेच केंद्रीय निमा च्या निर्देशानुसार आपण हा दिवस...

वैद्य रमेश गुजर सर यांचे...
" स्वास्थ्यम आयुर्वेद पंचकर्म मल्टी स्पेशालिटी सेंटर मिरज...
या ठिकाणी डॉ सूर्यकांत व्हावळ सर डिव्हिजनल सेक्रेटरी निमा महाराष्ट्र यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली आज आयुर्वेद दिन साजरा झाला...

यावेळी निमा मिरज चे अध्यक्ष डॉ स्वप्नील नाडे...
यांनी प्रास्तविक केले.....
तसेच डॉ रमेश गुजर सर यांनी आयुर्वेद व आयुर्वेदातील विविध संधी यावर विचारविनिमय केला ....
डॉ प्रवीण पाटील सर यांनी आभारप्रदर्शन केले...

या वेळी निमा मिरज चे
कोशाध्यक्ष डॉ दीपक राजपुरोहित सर,
उपाध्यक्ष डॉ मोमीन सर ,
उपसचिव डॉ संजय पाटील सर ,
उपखजिनदारडॉ सचिन कुंभार सर
माजी कोशाध्यक्ष डॉ राजेश लोहार सर,
डॉ जगदाळे सर,
डॉ सासनुर सर ,
डॉ सुनील चौंदीकर सर, डॉ अजित जाधव सर, डॉ गुरू बगली सर,डॉ भारती जाधव मॅडम, डॉ वैशाली पाटील मॅडम हे निमा सदस्य उपस्थित होते....

Meeting Followed by

*🎯HIGH TEA and Breakfast

And all Executive Comitee Of NIMA MIRAJ TALUKA

🎯Location For Swasthyam Ayurved Panchakarm Multi-speciality Center Miraj
*8669065390*
Pls ... Follow This Link Or Check....
Blow Current Location
https://share.google/STFrSjBk7Yg6g4cfC

🔴मुळव्याधामुळे त्रस्त आहात ❓🟪🟪Sanjeevani Clinic🟪🟪❗❗योग्य उपचारांसाठी आमच्याशी संपर्क साधा ❗❗💠मुळव्याधाची सामान्य लक्षणेः...
19/05/2025

🔴मुळव्याधामुळे त्रस्त आहात ❓

🟪🟪Sanjeevani Clinic🟪🟪

❗❗योग्य उपचारांसाठी आमच्याशी संपर्क साधा ❗❗

💠मुळव्याधाची सामान्य लक्षणेः💠

🔷गुदभागातून रक्तसाव

🔷गुदभागाजवळ गाठ

🔷खाज आणि जळजळ

🔷गुदभागात सूज

🔷शौच करताना वेदना

‼️आजच आमच्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या‼️

🩺डॉ. शरद मोतुगडे यांचे

🟪🟪🟪🟪संजीवनी क्लिनिक, मिरज🟪🟪🟪🟪

✅पत्ता - उदगांव वेस, माळी गल्ली, मिरज 416 410.

✅संपर्क: 7058271421, 9923316764

🪷आरोग्यम् धनसंपदा🪷🌿वैद्य रमेश गुजर यांच्या 🌷स्वास्थ्य आरोग्य टिप्स🌷=======================🤔कुठलाही आजार,आपल्याला का होतो...
13/02/2025

🪷आरोग्यम् धनसंपदा🪷

🌿वैद्य रमेश गुजर यांच्या

🌷स्वास्थ्य आरोग्य टिप्स🌷

=======================

🤔कुठलाही आजार,
आपल्याला का होतो ?🤔

🎯कुठलाही आजार आपल्याला का होतो ? तर त्याचे सहज सोपे उत्तर आहे. तुमच्या मनाने स्विकारल्यामुळे !

बुद्ध सांगतात की, तुमचे मन आणि विचार हेच सर्वकाही आहे. जसा विचार कराल तसेच तुम्ही घडाल...

भगवत गीता मध्ये भगवान श्रीकृष्णानीं
सांगितले आहे की....

"मन : एव मनुष्यानां कारणम बंध मोक्षयो"

🎯आपल्या शरीरात पाण्यावर तरंगण्याची नैसर्गिक शक्ती आहे. पण तरीही माणूस पाण्यात बुडून मरतो. याला काय म्हणाल? आपल्या मनाने अतिशय प्रखरपणे स्विकारलेय की मला पोहायला येत नाही आणि कोणालाही पोहायला येत नाही ही अंधश्रद्धा आहे. हत्ती किती जड आहे पण तोही पोहतो. कारण त्याने ठरवलेले नाही. त्याला माहीतच आहे तो पाण्यावर तरंगणार आहे.

🎯सापाला तर हात नि पाय ही नसतात. तरीही तो पाण्यात पोहतो. म्हणजे हात पाय हलवले, तरच आपण पाण्यावर तरंगू शकतो हाही गैरसमजच आहे. जी माणसं पाण्यात बुडून मरतात त्यांचे शरीर काही वेळाने पाण्यावर तरंगायला लागते. याप्रमाणेच आपल्यात प्रतिकारशक्ती आहे.

🎯आपल्याला कसलाच आजार होऊ नये यासाठी आपले मनच सतत कार्यरत असते. त्या मनाला प्रखरपणे मान्य करायला शिकवा. हेच खरे शरीर शास्त्र आहे. मेडीकल सायन्स ही शक्ती तुमच्यात नसेल तर काहीच करू शकत नाही.

🎯ताप आल्यावर, सर्दी झाल्यावर, शिंक आल्यावर कसलाही आजार झाल्यावर थोडे थांबा. तुमच्यातील प्रतिकार शक्तीला काम करू द्या. अशा आजारांवर वारेमाप खर्च करणे शरीरावर अत्याचार आहेत. ही अंधश्रद्धा आहे. शरीरशास्त्रात नैसर्गिक प्रतिकार शक्ती म्हणजेच खरे विज्ञान आहे.

🎯आपल्या शरीरातली अर्ध्याहून अधिक आजारांच्या मागे आपलं अज्ञ मन ( Subconcious Mind )असतं. पण कित्येकदा आपल्याला याची माहीती नसते. डॉक्टरांकडे गेलं आणि उपचार घेतले की तात्पुरतं बरं वाटतं, थोड्या दिवसांनी पुन्हा दुखणं उफाळून येतं, काय करावं, ते समजत नाही.

🥸मन आणि शरीर यांना जोडणारी,काही लक्षणे :--

एखाद्या गोष्टीची भिती किंवा चिंता वाटली की घशाला कोरड पडते....

परीक्षेचा किंवा अजून कसला तणाव असेल तर पोटात गोळा येतो...

समोर एखादा अपघात किंवा दुर्घटना पाहिली की हातापायातली शक्ती गळून जाते. आणि याविपरीत सतत हसतमुख असणारी व्यक्ती क्वचितच आजारी पडते...

🎯आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरही अज्ञात मनाची सत्ता चालते. जसं की, समोर मातीचे कण उडाले की सेकंदाच्या दहाव्या भागात लगेच पापण्या मिटतात. अज्ञात मन शक्तीशाली आहे पण एखाद्या सेनापती सारखं, त्याच्यावर सत्ता चालते ती फक्त आपल्या विचारांची.

ताकतवार असला तरी तो गुलामच. दिलेला आदेश पाळणं एवढचं त्याचं काम. आपण जे काही बोलतो तेच आपले विचार आहेत.

समजा एखादा माणुस, नकळत, अशी वाक्ये पुन्हा पुन्हा वापरत असेल; त्याला बघितलं की माझं रक्तच खवळतं, ह्यांच्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं आणि हे बदलले, माझी तळपायाची आग मस्तकाला जाते.

क्वचित अशी वाक्ये वापरली गेली, तर हरकत नाही; पण पुन्हा पुन्हा हेच बोलल्यास आणि ते सुप्त मनात गेल्यास त्याचा विपरीत परिणाम रक्ताभिसरणावर नक्कीच होतो. डॉक्टरकडे गेल्यावर औषध नि उपचाराने काही काळ बरं वाटतं, पण अज्ञ मन त्याचा पिच्छा अजिबात सोडत नाही.

ही सर्व वाक्य सतत तणावात असणार्‍या व्यक्तीच्या सवयीचा भाग बनतात आणि लवकरच ब्लडप्रेशर आणि मोठ्या स्वरुपाचे हृदयाचे विकार घेरण्यास सुरुवात करतात. थोडक्यात सतत मानसिक तणाव, हताश पणा आणि निराशा अनुभव करणाऱ्या व्यक्तीला हृदयाचे विकार लवकर घेरतात.

🎯जी व्यक्ती स्वतःलाच घालून पाडून बोलते, स्वतःची निंदा करते, स्वतःला दुबळा समजते, त्या व्यक्तींना छोट्या आतड्यांच्या विकारांची समस्या उदभवते.

🎯बहुसंख्य लोक अपचन या आजाराने त्रस्त असतात. खरं तर मलविसर्जन ही अतिसहज आणि नैसर्गिक क्रिया आहे. तरीही काही जणांना ‘धक्का देण्यासाठी’ कृत्रिम उपायांचा, जसं की एखादे चुर्ण किंवा एखादं औषध ह्यांचा आधार घ्यावा लागतो.

🎯काही वेळा ह्याचं कारण बाल्यावस्थेत दडलेलं सापडतं. कडक शिस्तीच्या नादात आई वडीलांनी मुलाला केलेली शिक्षा. त्याचा राग त्याच्या मनात असतो. लहान मूल आईवडीलांवर राग काढू शकत नाही. त्याला त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागते. त्यांना विरोध म्हणून ही क्रिया तो रोखून धरतो. हळुहळू तो मोठा होतो. शिस्तीचा बडगाही संपतो पण आपल्या आतड्यांवरचं नैसर्गीक नियंत्रण तो हरवून बसतो.

===खुप महत्वाचे===
🎯जेव्हा व्यक्ती आर्थिक संकटात सापडते, तेव्हा तिची पचनशक्ती कमजोर होते. जे लोक कंजुष वृत्तीचे असतात, त्यांच्यामध्ये मुळव्याध्याची समस्या जास्त आढळते. छोट्याछोट्या गोष्टींवरही एखादी व्यक्ती वारंवार उत्तेजित होते, चिडते, अस्वस्थ होते आणि मग त्याचा परिणाम जठर आणि पित्ताशयावर पडतो.

🎯आजकाल बहुतांश महिला वर्गाला झंडुबाम शिवाय झोपच येत नाही. कारण काय असेल बरं? ह्या व्यक्तीला बघितलं की माझं डोकं दुखतं, त्याने माझं खुप डोकं खाल्लं, आमच्या ह्यांच्या समोर कितीही डोकं फोडा काहीही फायदा नाही. निरंतर, नकळत असं बोलत राहील्याने अज्ञ मनात संदेश पोहचतो की माझ्या डोक्याला दुखायचे आहे आणि मायग्रेनचा त्रास चालू होतो.

🎯डोकेदुखीची अजुनही काही कारणे आहेत. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी अप्रिय घटना घडलेली असतेच, पण तिला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा उगाळण्याचा स्वभाव असेल तर डोकेदुखी सुरु होते. तेव्हा असे कटु अनुभव विसरुन जाणेच हेच इष्ट!

कधी नकोसे वाटणारे काम, त्रासदायक काम अंगावर येऊन पडते आणि डोके दुखते. जितके ते काम पुढे ढकलल्या जाते तेवढा त्रास होतो, तेव्हा अशी कामे तात्काळ निपटून काढावीत.

🎯एखादी व्यक्ती सतत जबाबदारीच्या ओझ्याने वाकून थकुन गेली असेल तेव्हा तिला पाठदुखीला वा कंबर दुखीला सामोरं जावं लागतं. असह्य वेदना होतात. ह्यात माने पर्यंतचे स्नायू आखडले जातात. त्यांच्या वरचा ताण जाणवतो. चेहरा मूळ स्थानी न राहता उजवीकडे किंवा डावीकडे कलतो.

🎯आता ह्यावर उपाय काय आहे? आपापले औषधौपचार चालू ठेवा. पण हे रोग शरीरातून समूळ उपटून काढायचे असतील तर स्वयंसुचना हाच त्यावरचा एकमेव उपाय आहे.

*🥸एक उदाहरण घेऊ या :*

तंद्रावस्थेत जाऊन आपल्या अज्ञात मनाला सुचना द्या. आता माझं डोकं एकदम हलकं हलकं होत आहे, आता ते अजून शिथील आणि हलकं झालं आहे, डोके दुखण्याचे प्रमाण कमी होत आहे, माझ्या डोक्यात जमा झालेलं अतिरीक्त रक्त आता शरीराच्या इतर भागात सुरळीतपणे पसरत आहे. माझा डोके दुखीचा त्रास नाहीसा होत आहे, काही क्षणांमध्ये ही बैचेनी दुर होईल. आणि डोकेदुखी गायब होईल.

🎯प्रत्येक रोगासाठी अशा सुचना तयार करुन त्या अज्ञ मनापर्यत पोहचवून रोगमुक्त होता येते. सारांश काय तर, भावनांची कोंडी करुन जगू नका. रोग बनून ते शरीराला पोखरतील. राग व्यक्त करा, आणि मोकळे व्हा.

🎯इथे एका महापुरुषाचा दृष्टांत आठवतो. त्यांना राग आल्या क्षणी ते कागद घ्यायचे आणि सविस्तर लिहून काढायचे. मनातले संपुर्ण भाव ओतून रिते व्हायचे. ते कागद दोन चार दिवस तसेच टेबलावर ठेवायचे आणि नंतर जाळून किंवा फाडून टाकायचे.

अशा प्रकारे मनातली सारी खळबळ बाहेर काढून टाकता येते. शेवटी क्रोधाची भावना नाहीशी होते आणि हलकं हलकं वाटतं.

तुम्हा सर्वांना, निरोगी आणि ठणठणीत आयुष्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा !

😇भय मुक्त रहा...!!
रोग मुक्त व्हा...!!😇

🎯आयुर्वेद स्वीकारा निरोगी रहा

🌿Health
🌿Wellness
🌿Ayurved
🌿Panchkarma
🌿Peace
🌿Yoga
🌿Diet

🔖अधिक माहितीसाठी संपर्क....

🛕स्वास्थ्यम आयुर्वेद पंचकर्म मल्टी स्पेशालिटी सेंटर*

🌿वैद्य रमेश गुजर
आयुर्वेदाचार्य,पंचकर्मतज्ञ

🌿सौ आरती गुजर
आहारतज्ञ ,योगतज्ञ,
समुपदेशक

🎯पत्ता..
दत्त कॉलनी (पश्चिम) बस स्टॉप जवळ, डॉ. जी एस कुलकर्णी प्लॉटिंग मध्ये, मिरज मालगाव रोड, मिरज..

🎯टीप= वैद्य रमेश गुजर सर
महिन्याच्या प्रत्येक "शुक्रवारी"
"कोरे नेत्र रुग्णालय"
म्हासोबा गेट कवठेमहांकाळ
येथे कन्सल्टिंग व्हिजिट साठी ...
🎯सकाळी 11 ते 5 पर्यंत उपलब्ध असतात.

🔖8669065390
🔖9834535454
🔖8421505752
=======================
# Swsathyam Ayurved # Health & Wellness

॥ हरे कृष्ण ॥🌿आयुर्वेद स्वीकारा... निरोगी रहा..!🌿" स्वास्थ्यम" आयुर्वेद पंचकर्म मल्टीस्पेशालिटी सेंटर मिरज आयोजीत,✅वैद्य...
20/01/2025

॥ हरे कृष्ण ॥

🌿आयुर्वेद स्वीकारा... निरोगी रहा..!🌿

" स्वास्थ्यम" आयुर्वेद पंचकर्म मल्टीस्पेशालिटी सेंटर मिरज आयोजीत,

✅वैद्य रमेश गुजर
आयुवेदाचार्य , पंचकर्म तज्ञ
B.A.M.S
( Ayurved Immuno & Plasma Therapist)

✅सौ. आरती गुजर
आहारतज्ञ, योगतज्ञ, समुपदेशक C.C.N.D. & C.F.T.

यांच्या सौजन्याने

🌿आयुर्वेदिक आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिर🌿

✅त्वचाविकार
✅उच्चरक्तदाब
✅पोटविकार
✅संधिवात
✅ओबेसिटी
✅डायबेटीस
✅थायरॉइड
✅मनोविकार

🎯शिबिराची वैशिष्ट्ये 🎯

✅मोफत नाडी व कोष्ट परीक्षण.

✅आयुर्वेदीक औषधोपचारांवर 50% सवलत.

✅मोफत हाडांची (BMD Mashin द्वारे) घनता तपासणी केली जाईल.

✅मोफत आहार, व्यायाम व योग सल्ला.

✅आयुर्वेद पंचकर्म सवलतीच्या दरात

✅रक्त तपासणी मध्ये 50% सवलत

✅तज्ञांकडून मोफत मार्गदर्शन व समुपदेशन.

🎯शिबिराची वेळ /वार 🎯

🔖शुक्रवार दि. 24 जानेवारी 2025
🔖वेळ : सकाळी 10 ते सायं. 4 पर्यंत

🎯शिबिराचे ठिकाण 🎯

"कोरे नेत्र रुग्णालय"(डॉ प्रदीप कोरे सर) म्हसोबा गेट जवळ, कवठे महांकाळ...

✅टीप... वैद्यरमेश गुजर सर
महिन्याच्या प्रत्येक "शुक्रवारी" कोरे नेत्र रुग्णालय मध्ये 📌सकाळी 11 ते सायं 5 पर्यंत कन्सल्टिंग विजिट साठी उपलब्ध..

📌नांव नोंदणी आवश्यक....📌
आजच आपले नांव नोंदणी करा....
📱8421505752, 8669065390, 9834535454

नमस्कार मित्रांनो🙏... मी डॉक्टर रमेश गुजर 🌿"स्वास्थ्यम" आयुर्वेद पंचकर्म मल्टी स्पेशालिटी सेंटर, मिरज येथे गेली 13 वर्ष ...
21/11/2024

नमस्कार मित्रांनो🙏...
मी डॉक्टर रमेश गुजर 🌿"स्वास्थ्यम" आयुर्वेद पंचकर्म मल्टी स्पेशालिटी सेंटर, मिरज येथे गेली 13 वर्ष वैद्यकीय व्यवसाय करीत आहे ...
✅कवठे महांकाळ मधील मित्र, नातेवाईक, अनेक शिक्षक, वरिष्ठ जेष्ठ लोक म्हणत असे.....
गावासाठी तसेच महांकाली देवीच्या या पंढरीमध्ये मातीमध्ये काहीतरी वैद्यकीय सेवा झाली पाहिजे..
काही अनेक जबाबदारी मुळे थोड जमले नाही, त्याबद्दल क्षमस्व...असो
✅मग या वर्षी ठरविले ...12 जुलै 2024 रोजी माझ्या मुलीच्या वाढदिवासानिमित्ताने.... कवठे महांकाळ पंचक्रोशीतल प्रसिद्ध धन्वंतरी कै.डॉ. शिवाण्णा कोरे यांचे कृपने "कोरे नेत्र रुग्णालय" डॉ प्रदीप कोरे सर यांचे मार्गदर्शन, अनुमती मुळे आपल्या गावामधे एक दिवस आपल्या सर्वासाठी म्हणुन एक शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक उपचार पद्धतीने रुग्ण तपासणी करून अगदी माफक दरामध्ये ही सेवा करण्याचे ठरविले ,
त्याबद्दल सर्व कोरे कुटुंबीयांचे तसेच आपना सर्वांचे खूप खूप आभार🙏
✅मी "प्रत्येक शुक्रवारी"
🎯सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत "कोरे नेत्र रुग्णालय" येथे आयुर्वेद कन्सल्टिंग साठी उपलब्ध असेन ...
व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, प्रेरणेने, तसेच प्रतिसादाने बऱ्याच रुग्णांची सेवा होईल....
खुप खुप धन्यवाद....🙏🙏🙏
🎯संपर्क..8669065390/9834535454

🎯आरोग्यम् धनसंपदा🎯🌿 आरोग्या वरती बोलू काहीअलीकडच्या काळामध्ये  आरोग्य विषयी वाढलेल्या तक्रारी म्हणजेच........🎯वायरल फीवर...
08/09/2024

🎯आरोग्यम् धनसंपदा🎯

🌿 आरोग्या वरती बोलू काही

अलीकडच्या काळामध्ये आरोग्य विषयी वाढलेल्या तक्रारी म्हणजेच........

🎯वायरल फीवर ,अंगामध्ये हलका ताप असणे.
🎯चिकनगुनिया, संधिवात..
🎯यूरिक ॲसिड वाढणे..
🎯हाता पायाची बोटे दुःखी,गुडघेदुःखी, सर्व सांधेदुःखी,
सांध्या वर सूज असणे..
🎯भूक न लागणे, अशक्त पणा, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, दम अथवा धाप लागणे...
🎯पोटाच्या वारंवार तक्रारी वाढणे, आम्लपित्त, पोट साफ न होणे....
🎯अंगावरती पित्त गांधी उठणे,सूज येणे, खाज सुटणे..
🎯मन उदास असणे, उत्साह नसणे, वैवाहिक जीवनातील आनंद नसणे*....
🎯स्त्री पुरुषांच्या शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होणे.
🎯 केस गळणे, कोंडा होणे, केस लवकर पांढरे होणे....
🎯त्वचे विषयी आजार फंगल इन्फेक्शन ,सोरायसिस,इसब, खरूज, नायटे...
🎯 सतत लघवीचे इन्फेक्शन होणे, किडनी वरती सूज असणे..

🎯इत्यादी अशा विविध आरोग्य विषयीच्या तक्रारी वाढत जातात*...
याचं कारण आहे की जेव्हा आपणास ताप (Fever )येतो परंतु कधीकधी ताप व्यक्त होतो अथवा येऊन गेलेला कळत सुद्धा नाही... त्यानंतर (After Post Viral or Bacterial infection नंतर )...*

🎯थोड्या औषधी उपचारानंतर आपल्या शरीरातील तापाची लक्षणे, इतर काही लक्षणे तर कमी होतात*...

🎯परंतु त्याचे राहिलेले शेष दोष लिव्हर(Liver), पांथरी (Spleen) , किडनी (Kidney) , रस वाही यंत्रणा (Lymphoid System) च्या माध्यमातून रस रक्ता मधील दुष्टी वाढवत जातात* ...

ती जर रस,रक्तदुष्टी आपण आयुर्वेदाच्या सहाय्याने म्हणजेच.. पंचकर्म ( शरीर शुद्धी) तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्याची औषधे व प्लाजमा थेरपी च्या माध्यमातून जर बरी केली नाही... तर राहिलेले रस, रक्तातील दोष आपणास वरील सर्व तक्रारी वाढवत जाऊन आपल्याला कायमस्वरूपी व्याधी होण्याची शक्यता असते*.....

🎯हे होऊ नये म्हणून
यासाठी योग्य तो आहार, विहार, व्यायाम व आरोग्य विषयी सल्ला औषध उपचारांसाठी....

🎯स्वास्थ्यम आयुर्वेद पंचकर्म मल्टी स्पेशालिटी सेंटरला भेट द्या*....

व आपले जीवन आनंदी आणि निरोगी बनवा....

🌿वैद्य रमेश गुजर
आयुर्वेदाचार्य (B.A.M.S.)
(IMT/Plasma Therapist)

🌿सौ आरती गुजर
आहार,योगतज्ञ, समुपदेशक
(CCND &CFT)

🎯अधिक माहितीसाठी संपर्क
दत्त कॉलनी पश्चिम बस स्टॉप जवळ, मिरज, मालगाव रोड मिरज.

🎯टीप...
महिन्याच्या दर "शुक्रवारी"
कोरे नेत्र रुग्णालय, म्हसोबा गेट जवळ ,कवठे महांकाळ येथे...वैद्य गुजर सर कन्सल्टिंग साठी उपलब्ध असतात

🎯वेळ...
सकाळीं 11 ते सायं. 5 पर्यंत..

*8669065390*
*9834535454*
*8421505752*

🌿 Acne Treatment..🌿DON'T POP IT, STOP IT...With...✅Swasthyam Aryuved  ✅Panchakarm ✅ Skin Care  Solution....🎯For More Det...
21/08/2024

🌿 Acne
Treatment..🌿

DON'T POP IT, STOP IT...

With...
✅Swasthyam Aryuved
✅Panchakarm
✅ Skin Care Solution....

🎯For More Detail...
Vist Us
Datta Colony West, Near Bus Stop,
Plotting By Dr G S Kulkarni ,
Miraj Malgaon Road, Miraj

🎯Every Friday Consulting
Visit Also
At "Kore Netra Rugnalay" Masoba gate
Kavathe Mahankal
🎯Time..Mor.11AM. To 5 PM

📱8669065390
📱8421505752

# Ayurved Panchkarma Multi-speciality Center Miraj ...

"स्वास्थ्यम "आयुर्वेद पंचकर्म मल्टी स्पेशालिटी सेंटर ....* डॉ .रमेश गुजर  BAMS आयुर्वेदाचार्य (IMTA)( Immuno Modulation ...
18/03/2024

"स्वास्थ्यम "आयुर्वेद पंचकर्म मल्टी स्पेशालिटी सेंटर ....

* डॉ .रमेश गुजर
BAMS आयुर्वेदाचार्य
(IMTA)( Immuno Modulation Therapist/
धातू साम्य तंत्र Plasma Therapist/ )
Ayur School of Panchved..

*सौ आरती गुजर
CCND & CFT
आहार, योगतज्ञ व समुपदेशक..

संपूर्ण स्वास्थ्यम टीम
यांच्या वतीने

"आयुर्वेदिक आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिर"

*शनिवार, दिनांक.16 मार्च 2024 रोजी
*ठिकाण - मालगाव ग्रामपंचायत हॉल, मालगाव.
या ठिकाणी आयोजित केले होते..

या शिबिरास मालगाव मधील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, डॉक्टर्स, सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत अधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य , हरे कृष्ण (इस्कॉन) मालगाव संस्थेतील भक्तगण अधिकारीवर्ग ,ग्रामस्थ मंडळी तसेच इतर कर्मचारी वर्ग इ...
यांच्या उपस्थिती मध्ये सकाळी 9वाजता " उद्घाटन, दीप प्रज्वल व पसायदान स्तवन" करून शिबिराची सुरुवात झाली....
या आयुर्वेदिक आरोग्य शिबिरास विविध आजूबाजूच्या गावातील व मालगाव मधील विविध गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला,
शिबिरामध्ये एकूण "65" रुग्णांची
आयुर्वेदिक पद्धती म्हणजेच "नाडी व कोष्ट (पोट) तपासणी करून, आयुर्वेदिक औषध उपचार अगदी माफक दरात देण्यात आली

आयुर्वेद स्वीकारा निरोगी रहा...

अधिक माहिती व संपर्क..
Ayurved Panchkarma Multi-speciality Center Miraj

*दत्त कॉलनी (पश्चिम) बस स्टॉप जवळ,
डॉ. जी एस कुलकर्णी प्लॉटमध्ये,
मिरज मालगाव रोड, मिरज

8669065390
8421505752
9834535454

Address

Datt Colony (West), Near Bus Stop, Miraj Malgaon Road, Miraj(Plotting By Drive G. S. Kulkarni ), Plot No/49
Miraj
416410

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm

Telephone

+918669065390

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swasthyam Ayurved Panchkarm Multispeciality Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Swasthyam Ayurved Panchkarm Multispeciality Center:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram