30/06/2021
मित्रांनो...आज सोलापूर येथील सुप्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉक्टर संतोष मोटे
M.B.B.S. PGDHS Diabetes MHS Diabetes
Consultant Diabetologist
यांची आपल्या मोहोळ शहरातील सुप्रसिद्ध " आरोग्यम ओपीडी हाऊस मध्ये व्हिजीट आहे.
तरी कृपया ज्यांना मधुमेहाचा त्रास होत आहे त्यांनी आज दुपारी ०२ ते ०४ या वेळेत भेट देवून वेळेत उपचार करुन घ्यावे.
मित्रहो....मधुमेह हा शरीरासाठी चांगला रोग नाही.
कृपया मधुमेहाच्या काही गंभीर लक्षणांची माहिती देत आहे.
ती पुर्णपणे वाचावी आणि आपणास किंवा आपल्या परिवारातील,शेजारी-नातलग,मित्र परीवारातील कुणालाही असा त्रास होत असेल तर आजच आरोग्यम ओपीडी हाऊस मध्ये भेट द्या...🙏
👇
■ लक्षण नं - ०१
जर प्री – डायबिटिजची स्थिती शरीरात निर्माण झालेली असेल किंवा तुम्ही मधुमेहाच्या अगदी उंबरठ्यावर आलेला असाल, तर किती ही खाल्लत तरी काही वेळाने पुन्हा भूक लागेल.
जे अन्न तुम्हाला ५-६ तास ऊर्जा पुरवेल असे वाटते, तेच अन्न खाऊन देखील पुरेसे वाटत नाही. हा एक संकेत आहे, की तुमच्या शरीरातील साखर आवश्यकतेपेक्षा अधिक झालेली आहे.
👇
■ लक्षण नं - ०२
वर नमूद केल्याप्रमाणे ‘इन्सुलिन रेझीस्टन्स’मुळे ग्लूकोज ऊर्जेत परिवर्तित होत नाही, ज्यामुळे शरीरात ऊर्जेचा अभाव होतो व सतत थकवा जाणवू लागतो
👇
■ लक्षण नं - ०३
मधुमेहाच्या रुग्णाला बरेचदा मुत्रविसर्ग होतो, विशेषतः रात्रीच्या वेळी. शरीरातील ग्लूकोजच्या वाढलेल्या मात्रेमुळे किडनीचे शुद्धीकरणाचे काम वाढते ज्यामुळे जास्त लघवी लागते.
👇
■ लक्षण नं - ०४
मधुमेहाच्या रुग्णाला लघवीचा त्रास होत असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण भरपूर कमी होते व सारखी तहान लागते, घशाला सतत कोरडच पडलेली असते.
👇
■ लक्षण नं - ०५
शरीरात पाणी कमी असल्याने, इतर अवयवांना पाणी पुरवठ्यात कमतरता होते.ज्यामुळे त्वचा अत्यंत कोरडी होते व सतत खाज येऊ लागते.
👇
■ लक्षण नं -०६
पायाला सतत मुंग्या येणे. पायाला सतत मुंग्या येत असतील अधुनमधून पाय बधीर होत असेल तरीही डॉक्टरांचा सल्ला त्वरीत घ्या.
👇
■ लक्षण नं - ०७
शरीरावर झालेली कोणतीही जखम लवकर भरून न येणे. जखम चिघळत जाणे. जखमेत खाज होणे अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला त्वरीत घ्या.हे मधुमेहाचे लक्षण असू शकते.
👇
लक्षण नं - ०८
नजर कमजोर होणे – मधुमेहाच्या सुरूवातीच्या काळात डोळ्यांना अचानक अधारी येणे. निट न दिसणे. अशी लक्षणे दिसतात. पण, मधुमेहात नजर कायमची अधू होत नाही. काही कालावधीनंतर रूग्णाची नजर स्थिर होते. त्याला निट दिसू लागते.
👇
लक्षण नं - ०९
चिडचिडेपणा आणि मूड खराब होण्याचे प्रकार वारंवार घडणे हेही मधुमेहाचे लक्षण आहे. शरीरातील रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे मधुमेहाचे रूग्ण अधिक चिडचिडे बनतात. सततचे डिप्रेशन, घराबाहेरप पडण्याची ईच्छा न होणे, कामात लक्ष न लागने हेसुद्धा मधुमेहाचे लक्षण मानले जाते.
👇
लक्षण नं - १०
काम केल्यावर थकवा जाणवने ही अत्यंत साधी बाब आहे. मात्र, नियमितपणे अशक्तपणा जानवणे हा मधुमेहाचे लक्षण दाखवणारा प्रकार आहे. हे लक्षण दिसतात त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करा. टाईप-2 मधुमेहात रूग्णाच्या शरीरातील साखर काही काळासाठी मोठ्या प्रमाणात वाढते. या प्रकाराची लक्षणे हळुहळू पूढे येतात.
👇
लक्षण नं - ११
अचानक अशक्तपना जाणवने. तीव्र भूक लागने ही सुद्धा मधुमेहाचीच लक्षणे आहेत. मधुमेह असलेल्या व्यक्तीला अचानकपणे अशक्तपणा येतो. रूग्णाच्या शरीरात जेव्हा हाई ब्लड शुगर असते तेव्हा शरीराला ग्लुकोजला मॅनेज करताना अडचण निर्माण होते.
👇
लक्षण नं - १२
वजन घटने – वजन अधिक मोठ्या प्रमाणात वाढणे मधुमेहाला निमंत्रण देते. तसेच, प्रमाणापेक्षा कमी होणे हे सुध्दा मधुमेहाचेच लक्षण आहे. वजन घटण्याचे डॉक्टर दोन कारणे सांगतात. एक वारंवार वॉशरूमला जाणे आणि दुसरे म्हणजे शरीरातील वाढत्या कॅलरीजवर नियंत्रण ठेवता न येणे.
👇
लक्षण नं - १३
जास्तीत जास्त पाणी प्यावसे वाटणे. वारंवार लगवीला लागने. जास्त पाणी पिऊनही वारंवार तहान लागणे. अशा वेळी तहान भागविण्यासाठी काही लोक ज्यूस, सोडा, चॉकलेट, दूध आदी गोष्टींचे सेवन करतात. पण, या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील साखर अधिकच वाढते. त्यामुळे होणारा त्रास कमी होण्याऐवजी अधिक वाढतो.
शिवाय
■ लैंगिक समस्या जानवणे ताठरपणा कमी होने
■ स्त्रिया व पुरुषांना लघवीच्या समस्या होने इ.
महत्वाची टीप: वरीलपैकी कोणतेही लक्षण दिसले तरी, लगेच आपल्याला मधुमेह झाला असे समजून घाबरून जाण्याचे कारण नाही. वरील लक्षणे इतर गोष्टींमुळेही दिसू शकतात. म्हणूनच डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळेत माहिती घेणे केव्हाही फायदेशीर ठरते.
👆
मित्रांनो... वरील पैकी आपणास कोणतीही समस्या असो...इलाज खात्रीशीर केला जातोय.
आपण आजच
" आरोग्यम ओपीडी हाऊस "
पत्ता - महात्मा फुले भाजी मंडई जवळ,
नुतन गणपती समोर,मोहोळ शहर
व वेळेत उपचार करुन बरे व्हा🙏
आमचा संपर्क नंबर -
मो.9881515059,9028359337