24/11/2022
तरुण वयातच केस पांढरे का होतात? त्यावर तुम्ही काय करू शकता?
माणसाच्या सौंदर्यात भर घालण्यात त्याच्या केसांचा खूप मोठा हात असतो, आणि माणूस हा कोणाच्याही केसांवर पहिले भुळतो कारण दाट काळेभोर आणि नीट नेटके केस तुमची वेगळीच छाप समोरच्या व्यक्तीवर पाडतात!
आणि फक्त काळेभोर दाट केस असून चालत नाही, त्यांची एक विशिष्ट फॅशन असेल तर ते आणखीनच खुलून दिसते!
अवेळी टक्कल पडणे, केस गळणे, केसांची वाढ नीट न होणे, केस लवकर पांढरे होणे, त्यासाठी वापरला जाणारा हेयर डाय आणि त्यातली केमिकल्स या अशा समस्यांना माणूस सुद्धा तितकाच जबाबदार आहे!
कारण केसांची योग्य काळजी न घेण किंवा त्यांना योग्य ते पोषण न मिळणं यामुळेच या समस्या उद्भवतात!
काळे, चमकदार केस हे सर्वांनाच हवे असतात. पण सर्वच एवढे नशीबवान नसतात. आजकालच्या आधुनिक आणि धावपळीच्या जगात तर अवेळी केस पांढरे होणे हे आता सामान्य झाले आहे. कारण आता ६० नाही तर ३० वय असतानाचा लोकांचे केस पांढरे होतात.
अवेळी केस पांढरे होणे ह्यामागील एक महत्वाचे कारण म्हणजे तणाव. ब्रिटीश वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीनुसार वैज्ञानिकांनी ह्याचा शोध लावला आहे की, तणाव आपल्याला वेळेआधीच वृद्धत्वाकडे घेऊन जातो.
मेलानिन हे एक असं तत्व आहे जे आपल्या केसांना काळं ठेवण्याचं काम करत. जेव्हा मेलानिन नवीन पेशींची निर्मिती करणे थांबवतं तेव्हा आपले केस हे पांढरे होऊ लागतात.
जसं शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी वेगवेगळ्या विटामिन्सची गरज असते तसचं केसांना काळे ठेवण्यासाठी विटामिन बी -१२ महत्वाचे असते. ह्याच्या कमतरतेमुळे मेलानिन नवीन पेशींची निर्मिती करू शकत नाही.
ज्या लोकांना नेहेमी डोकेदुखीचा त्रास असतो किंवा सायनस हा आजार असतो त्या लोकांचे केस देखील वेळेआधीच पांढरे होतात.
आजकाल केसांना सिल्की शाईनी बनविण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे शाम्पू आणि कंडिशनर उपलब्ध आहेत. त्याच्या जाहिराती देखील मोठ्या प्रमाणात केल्या जातात आणि त्या बघून आपल्या सारखे लोक ते केमिकल युक्त शाम्पू वापरतात. ह्यामुळे देखील केस पांढरे होतात.
जर तुम्ही मद्यपान, धुम्रपान, ड्रग्स इत्यादी गोष्टींच्या आहारी गेले असाल, तर हे देखील तुमचे केस पांढरे होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
आपले केस पांढरे व्हायला लागले की, आपण लगेच त्याला डाय करायला लागतो. पण जास्त डाय केल्याने केस आणखी पांढरे होण्याची शक्यता असते. कारण ह्यात वापरण्यात आलेले केमिकल्स केसांकरिता अत्यंत हानिकारक असतात.
आणि सध्या तर जाहिरातीत सुद्धा दाखवतात की केमिकल्स शिवाय डाय आले आहेत पण खरं बघायला गेलं तर कोणताही डाय केमिकल्स शिवाय बनूच शकत नाही, कारण त टिकण्यासाठी त्यात केमिकल्स सारख्या गोष्टी घालाव्याच लागतात!
सध्याच्या तरुण मुलांमध्ये तर केस जाणून बुजून पांढरे करायचे किंवा वेगवेगळे कलर द्यायचे ही फॅशन झाली आहे, जी अत्यंत हानिकारक असून त्यांचे परीणाम खूप वाईट आहेत! कारण तरुण वयात केसांना योग्य ते पोषण न मिळता केमिकल्स चा भडिमार झाल्यामुळे सध्याच्या तरुण पिढीला ही त्रास भोगावे लागतात!
आपलं रूप आपल्याच हातात असतं, त्यामुळे त्याची कशी काळजी घ्यायची आणि केसांची कशाप्रकारे निगा राखावी हे प्रत्येकाला मनावर घ्यायला पाहिजे, फॅशन किंवा ट्रेंड चा विचार थोडा बाजूला ठेवून काय गुणकारी किंवा काय जास्त चांगलं आहे याकडे लक्ष देणं गरजेच आहे!
वयाच्या पस्तिशीनंतर केस पांढरे होणं ही सामान्य गोष्ट आहे.
वास्तवात आपले केस गळणं आणि ते पुन्हा उगवणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण जसजसं वय वाढत जातं, केसांचे रोम छिद्रं बंद होतात आणि त्यांच्या रंग उत्पादनाची क्षमता पण घटते. या प्रक्रियेलाच केस पांढरे होणं असंही म्हटलं जातं.
परंतु, केस केव्हा पांढरे होतील, हे निश्चित करण्यास काही प्रमाणात जेनेटिक्सची पण भूमिका असते. एकदा पस्तिशीच्या जवळपास माणूस पोहोचला की केस एकतर पांढरे होऊ लागतात किंवा तपकिरी होतात.
पण, काही लोक पांढरे केसांचा संबंध अक्कल आणि मॅच्युरिटीशी जोडताना दिसतात. अनेक लोक मानतात की, वय वाढत आहे, त्यामुळे केस पांढरे होत आहेत. पण त्यांना हे केस पांढरे होऊ नये असं वाटत असतं. पूर्वीप्रमाणेच जवान आणि काळे केस असावेत असं त्यांना वाटत असतं.
कॉस्मेटिक वर्ल्डमध्ये तगडी फी घेऊन पांढरे केस काळे करण्याचं काम कॉस्मेटिक एस्थेटिक्स आणि डर्मेटोलॉजिस्ट करत आहेत. पण हे काम काही सोप्या घरगुती उपायांनीही केले जाऊ शकते.
काही उपाय केस पांढरे होण्यापूर्वी काम करतात तर काही पांढरे झाल्यानंतर तुमची मदत करतात. या लेखात आम्ही तुम्हाला केस पांढरे होण्यापासून रोखण्याचे काही सोप्या घरगुती उपायांबाबत सांगणार आहोत.
1. पुरेशा व्हिटॅमिनचे सेवन (Get Enough Vitamins)
असे काही व्हिटॅमिन जे तुमचे केस हेल्दी ठेवू शकतात, यामध्ये,
व्हिटॅमिन बी, विशेष रुपाने बी-12 आणि बायोटिन
व्हिटॅमिन डी
व्हिटॅमिन ई
व्हिटॅमिन ए
समावेश आहे.
2. पुरेशा मिनरल्सचे सेवन करा (Get Enough Minerals)
असे मिनरल्स जी केसांची वाढ आणि रिपेअरमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतात. यामध्ये,
झिंक
आयर्न
मॅग्नेशियम
सेलेनियम
कॉपर
आदींचा समावेश असतो.
3. धूम्रपान करु नका (Stop Smoking)
धूम्रपानमुळे फक्त लंग्स / फुफ्फुसच नव्हे तर स्किन आणि केसांनाही नुकसान पोहोचू शकते. यामुळे केस पातळ होऊ शकतात आणि रोमछिद्रे आकुंचन पावतात.
4. उन्हापासून केसांना वाचवा (Protect Your Hair From The Sun)
केसांना उन्हापासून वाचवणे खूप गरजेचे आहे. ऊन आणि यूव्ही किरणांमुळे केसातील ओलावा कमी होऊ लागतो. त्यामुळे केसांमध्ये ड्रायनेस वाढतो आणि केस गळण्याची समस्या सुरु होते. यापासून वाचण्यासाठी डोक्यावर हॅट किंवा टोपी घाला.
5. केसांचे नुकसान करणे बंद करा (Stop Damaging Your Hair)
हेअर केअरचे अनेक फायदे आहेत. पण त्याचा गरजेपेक्षा जास्त वापर केला तर केसांचे नुकसान होऊ शकते. यामध्ये,
ब्लीचिंग
ओल्या केसांना ब्रश करणे
रुंद दातांचा कंगवा वापरणे
केसांना हेअर ड्रायरचा जास्त वापर करणे
साबण / केमिकल शॅम्पूने केस धुणे
केस जास्त धुणे
आदींचा समावेश होतो.
पांढऱ्या केसांसाठी घरगुती उपाय (Home Remedies For Gray Hair)
नॅचरल हीलिंगची बाजू घेणारे नेहमी पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आजमावण्याचा सल्ला देतात. यामध्ये समावेश आहे...
खोबरेल तेल (Coconut Oil)
प्रत्येक दुसऱ्या दिवशी, झोपायला जाण्यापूर्वी आपले केस आणि डोक्याच्या त्वचेला खोबरेल तेलाने मालीश करा. सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे आपले केस धुवून घ्या.
अद्रक (Ginger / Zingiber Officinale)
दररोज एक टीस्पून ताजं अद्रक आणि 1 टेबलस्पून मध एकत्रित करुन खा.
गुळाचा शिरा (Blackstrap Molasses)
प्रत्येक दुसऱ्या दिवशी गुळापासून तयार केलेल्या शिऱ्याचे सेवन करा. यामुळे अनेकवेळा पांढरे झालेले केसही काळे दिसू लागतात.
आवळा (Amla / Phyllanthus Emblica)
दररोज 6 ounces किंवा 170 ML ताज्या आवळ्याचा ज्यूस प्या. जर असे करणे शक्य नसेल तर प्रत्येक आठवड्याला एकदा आवळ्याच्या तेलाने केसांची मालीश करा. आवळा केसांसाठी संजीवनीचे रुप मानले जाते.
काळ्या तिळाचे बी (Black Sesame Seeds / Sesamum Indicum)
आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा, एक चमचा काळ्या तिळाच्या बीचे सेवन करा. याच्या सेवनाने केस पांढरे होण्याची प्रक्रिया केवळ मंदच होते, असे नव्हे तर अनेवेळा पोषण मिळाल्यामुळे पांढरे केसही काळे होऊ लागतात.
तूप (Ghee)
देशी गाईच्या शुद्ध तुपाने केस आणि स्काल्पला मसाज करा. देशी गाईच्या तुपाला आयुर्वेदात मोठे गुणकारी मानले जाते. यामध्ये असलेले प्रोटिन केसांना जबरदस्त पोषण देते आणि केस पांढरे होण्याची प्रक्रिया मंद करते.
राजगिरा (Amaranth )
ताज्या राजगिराचा रस काढा आणि आठवड्यातून तीन वेळा केसांवर लावा. आयुर्वेदामध्ये हे एक अतिशय प्रभावी आणि अंमलात आणला गेलेला उपाय मानला जातो.
व्हीटग्रास जूस (Wheatgrass Juice / Thinopyrum Intermedium)
प्रतिदिन 30 ते 60 ML ताजा व्हीटग्रास ज्यूस प्या. 1 मोठा चमचा व्हीटग्रास पावडर रोज आपल्या नाश्त्यामध्ये किंवा जेवणात मिक्स करा. यामध्ये असलेल्या पोषक तत्त्वांमुळे केसांना हेल्दी वाढ मिळते आणि केस पांढरे होण्याची प्रक्रिया मंद होण्यास मदत करते.
कांदा Onion
कांदा डोक्याला लावण्याचे अनेक फायदे आहेत. कांद्याचे तेलही केसांसाठी खूप गुणकारी मानले जाते. ब्लेंडरमध्ये एक कांदा बारीक करुन घ्या. कांद्याची पेस्ट एखाद्या चाळणीच्या मदतीने चाळून तिचा ज्यूस काढा.
आठवड्यातून दोन वेळा, हा रस आपल्या डोक्याला लावून घासा. सुमारे 30 मिनिटे केसांवर ही पेस्ट तशीच राहू द्या. नंतर डोकं शॅम्पूने धुवून घ्या. पांढ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे.
गाजराचा रस (Carrot Juice / Daucus Carota Subsp. Sativus)
गाजरमध्ये मोठ्याप्रमाणात व्हिटॅमिन असते. यामध्ये आढळून येणारे व्हिटॅमिन्स केसांचे आरोग्य चांगले करण्यासाठी आवश्यक असतात.
जर केस पांढरे होत असतील तर तुम्ही रोज 250 एमएल गाजराचे ज्यूस प्यायला हवं. यामुळे शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळेल आणि केस पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावेल.
कडी पत्ता (Curry Leaves / Murraya Koenigii)
1/4 कप कडी पत्ता आणि 1/2 कप दह्याची पेस्ट करा. ते तुमचे डोके आणि स्काल्पवर लावा. सुमारे 30 मिनिटांनंतर केस धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे करा.
अश्वगंधा (Ashwagandha / Withania Somnifera)
भोजनाबरोबर अश्वगंधाच्या पत्त्याचे सेवन करा. किंवा मार्केटमध्ये मिळणाऱ्या अश्वगंधाच्या पावडरचाही उपयोग करु शकता.
अश्वगंधाला भारतात जिनसेंग नावानेही ओळखले जाते. यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात ताकद आणि एनर्जी मिळते. त्याचबरोबर अश्वगंधा केसांनाही हेल्दी बनवते.
बदामाचे तेल (Almond Oil)
बदामाचे तेल, लिंबाचा रस आणि आवळ्याचा ज्यूस समान पद्धतीने एकत्रित करा. आपल्या केस आणि स्काल्पच्या मिश्रणाने मालीश करा. तीन महिन्यांपर्यंत दिवसातून दोन वेळा हे रुटीन फॉलो करा. हा उपाय आयुर्वेदात सांगितल्या गेलेल्या चांगल्या उपायांपैकी एक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा 👉
NatureHealing center - +919619371711