01/01/2026
निशुल्क प्राणायाम अभ्यास.
प्रवेश घेण्यासाठी व्हाट्सअप बटन दाबा
कोर्सची सविस्तर माहिती: -
या कोर्स मधील मेडिटेशन /प्राणायामांचा चा नियमित सराव केल्यास त्याचा शरीर मन आणि बुद्धीवर खूप सुंदर प्रभाव पडेल.
मनात विचारांची स्पष्टता निर्माण होईल आणि आपण आपल्या कर्मांवर छान फोकस करू शकू. नकारात्मक विचार हे निघून जातील आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल.
मनावर नियंत्रण मिळवता येईल मन शांत आणि संयमी करता येईल या साधने मधून खऱ्या अर्थाने मनशांती मिळवता येईल.
जीवनातील विविध विषयांवर नियमित मेडिटेशन करण्याचा प्रभाव दिसून येतो जसे की आरोग्य सुधार, सुंदर नाती, ध्येयपूर्ती साठी सामर्थ्य
या दहा दिवसाच्या कोर्समध्ये खालील विविध मेडिटेशन आणि ध्यान प्रक्रियांचा प्रयोग करण्यात आलेला आहे
१) प्रणव जप अर्थात ओम मंत्राचं विविध प्रकारे स्मरण
२) जीवनात प्रगती घडवून आणणारा गायत्री मंत्र आणि त्याचा गहन अर्थ
३) आरोग्य आत्मजागरुकता आणि ऐश्वर्य मिळवून देणाऱ्या वेदांमधील इतर प्रभावी मंत्र आणि त्यांचे अर्थ
४) ब्रीदिंग अवेअरनेस टेक्निक्स आणि सहज प्राणायाम
५) सुंदर फोकस आणि प्रभावी संभाषणासाठी* साऊंड आणि व्हायब्रेशन थेरपी
ऑडिओ मेडिटेशन साधना घरातील सर्वांसाठी १० दिवस रोज २० मिनिटे
ही अत्यंत सोपी आणि प्रभावी ध्यान साधना असून घरातील सर्वांसाठी आहे.
सादर
ध्यान शिक्षक: अजय जोगळेकर