22/01/2018
*मेडिक्लेमविषयी....*
मेडिक्लेम हा विषय जरा नाजूकच आहे. नाजूक यासाठी की, हा विषय बोललो की लोकं म्हणतात..ते सोडून बोल. याचं कारण ही तसंच आहे. लोकांना माहिती मिळत नाही. आणि ऐकीव माहीती ही अपुर्ण आणि चूकीची असते.
एक वाक्यात सांगायचं झालं तर.. दवाखान्याचा खर्च अचानक पडला तर त्याची तरतूद करणारी पाॅलिसी.
मेडिक्लेम काढण्यासाठी वार्षिक एक रक्कम आपल्याला भरावी लागते. यात मुख्यत्वे दोन प्रकार असतात. पर्सनल आणि ग्रुप मेडिक्लेम. यामध्ये मेडिक्लेम कंपनी हाॅस्पिटल सोबत करार करते आणि त्या हाॅस्पिटलच्या नावांची लिस्ट आपल्याला पाॅलीसी सोबत देते.वेबसाईटवर नव्याने अॅड झालेत्या हाॅस्पिटलची नावंही अपडेट करते. लिस्ट मध्ये असलेल्या हाॅस्पिटल मध्ये उपचार घेतल्यास कॅश न भरता ठरलेल्या रक्कमेपर्यत ऊपचार घेता येतात. हाॅस्पिटल लिस्ट मध्ये नसेल तरीही चिंतेचं कारण नाही. फक्त उपचार घेऊन आपण स्वतः बील भरावं लागतं आणि नंतर क्लेम करुन ती रक्कम परत मिळते.
पर्सनल म्हणजे आपण किंव्हा आपल्या फॅमिलीची काढलेली पाॅलिसी. आणि ग्रुप मध्ये मोठ्या समूहाची एकत्रीत काढलेली पाॅलिसी. उदाहरणार्थ टाटा कंपनी त्यांच्या कामगारांची एकत्रीत पाॅलिसी काढते ती ग्रुप ईन्शूरन्स असते.
मेडिक्लेम मध्ये आपली जबाबदारी एक असते ती म्हणजे फाॅर्म भरताना माहिती अचूक आणि खरीखरी भरणे. जुने आजार असतील तर ते स्पष्टपणे सांगणे. एजन्टकडून नीट माहिती करुन घेणे. याचा फायदा असा की क्लेम करताना अडचण येत नाही.
वरील माहिती ही ठोक पुस्तकी माहिती झाली. आता आपण प्रॅक्टिकल गोष्टींविषयी बोलू. लोकं ईन्शुरन्स किंव्हा मेडिक्लेम घेण्यास अनुकूल नसतात. आणि हे कारणं सांगतात.
1. मी तब्येतीने फिट्ट आहे रोज व्यायाम करते/ करतो. मला काहीच होणार नाही.
2. दवाखाना आलाच तर आमची FD आहे ना तीन लाखांची. आणि SIP पण आहे म्युच्यूअल फंडात. गरज पडली तर त्यातूनच पैसे वापरु. ते पैसे तर पडूनच आहेत अशा ईमर्जंसी साठीच ठेवलेत ते.
3. जर एक वर्षात अॅडमिट नाही झालो तर आमचे पैसे बुडले का ?
4.समजा वीस वर्ष आम्ही पैसे भरले आणि कधीच हाॅस्पिटलची गरज नाही पडली. रिटर्न काही मिळणार नाही म्हणजे आमचे पैसे वायाच गेले का ?
5. प्रायव्हेट कंपनीचा भरवसा नाही,पळून गेली तर ? सरकारी काही असेल तर विचार करु.
उत्तर.
1. आपण तब्येतीने फिट्ट फाईन आहात ही चांगलीच गोष्ट आहे. मेडिक्लेम हा अचानकपणे अपघात किंव्हा ईन्फेक्शनमुळे आजारपण आलं आणि हाॅस्पिटलमध्ये अॅडमीट व्हावं लागलं तर त्यासाठी असतो. काही प्रकारांमध्ये बाळंतपणासाठी होणारा खर्च ( डिलिव्हरी नाॅर्मल असो किंव्हा सिझेरियन ) ही सामाविष्ठ असतो. अशा प्रसंगी तब्येतीची काळजी नातेवाईकांना असतेच पण जर बील भरण्यासाठी जवळ पैसे नसतील तर खुप मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं.
2. FD आणि ईतर माध्यमातून गुंतवणूक केलेले पैसे ईथे वापरु शकता पण ते पैसे तुम्हाला परत मिळू शकणार नाही. मेडिक्लेममध्ये वार्षिक पैसे भरल्याने ( अंदाजे दहा ते पंधरा हजार *) लाखांमधला खर्च आपल्या खिशातून होत नाही आणि ते ही कॅशलेस पध्दतीने.
3. कंपनी आता साधारणतः कमीतकमी तीन लाखांचा व्यक्तिगत मेडिक्लेम देते. विचार करा की तीन लाख रुपये खर्च करण्याची क्षमता नसणार्यांनी काय करायचं जर प्रसंग उभा राहीलाच तर ! वार्षिक सहा हजार प्रमाणे तीन लाख पुर्ण होण्यास अंदाजे पंन्नास वर्ष लागतील. तुम्हाला येत्या पंन्नास वर्षात कोणत्याही कारणासाठी हाॅस्पीटलचा तीन लाख खर्च होणारच नाही याची गॅरंटी असेल तर अजिबात काढू नका मेडिक्लेम. आणि जर नसेल तर त्वरीत काढा.
4. सैनिक देशाच्या सीमेवर उभा असतो बंदूक घेउन. ज्याच्या भीतीने परकीय आक्रमण टळतात. जर पंन्नास वर्ष हल्ला झालाच नाही तर सैनिकाचा पगार वाया गेला असं म्हणलं तर चालेल का ?
5. भारतात प्रायव्हेट कंपन्याच मेडिक्लेम क्षेत्रात उत्तम सर्व्हिस देत आहेत.रेलिगेर हेल्थ इंश्योरेंस ही भारतातील एक विश्वसनीय कम्पनी आहे. आपल्या आसपासची टाॅप हॉस्पिटल्स त्यांच्याशी टाय-अप आहेत.
शेवटी एक सांगायचे तर आपली तरतूद आपणच करायची असते. ऐनवेळी सगळी सोंगं आणता येतात पण पैशांचं सोंग आणता येत नाही.
त्यासाठी आजच त्वरीत भेटा.
अनिकेत मोरे
9822708844