02/03/2023
*रकतमोक्षण भाग २ -कपिंग थेरपी*
आपल्या शरीरातील मांस व स्नायु यांचे दुखणे हि फार सहजतेने दुर्लक्ष करायची गोष्ट झालीये. कधिही रूग्ण पहिल्या अवस्थेत चिकित्सा करायला येत नाही व मग शेवटी एमआरआय किंवा सिटी स्कॅन सारख्या तपासण्या करतं आपला वेळ व पैसा घालवतो.
खरे तर हि लक्षण निर्माण होण्याची 2 प्रमुख कारणं आहेत.
*1) आहारीय कारण* :- यामध्ये प्रामुख्याने व्हिटामिन बी 12 कमी असणे तसेच कॅल्शियम व ड जिवनसत्वाची कमी आढळते.
जेव्हा आहारात पालेभाज्या , मोड आलेली कडधान्ये, मांसाहार , दुध , अंडी असे पदार्थ घेतले जात नाहीत तेव्हा ह्या घटकांची कमतरता जाणवते तर काही रूग्णात हे आहारीय घटक सेवन करूनही त्यांच्या शरीरात ह्या घटकांचे शोषण कमी होते अश्यावेळी योग्य चिकीत्सा घेणे नितांत गरजेचे असते.
*2)जीवनशैलीजन्य कारणे* :- यामध्ये चुकीची जीवनशैली ज्यात पाठ वाकवून पोक काढून सतत बसणे. ऑफीस जाॅब मंडळी यामध्ये अधिक चूका करतात तसेच सतत दुचाकी प्रवास , व्यायामाचा पूर्ण अभाव यामुळे पाठ कंबर दुखणे , अकडणे , लचकणे हि लक्षणे निर्माण होतात.
सतत नाईट ड्युटी व पूढच्या दिवशी झोपणे यामुळे शरीरावरती ऊनच न पडल्याने ड जीवनसत्व मिळतच नाही व त्याच्या अभावात आहारातील कॅल्शियम सुद्धा वापरला व शोषला न जाणे हि लक्षणे दिसतात म्हणून आयुर्वेद मसाज , शेक व अश्था पद्धतिने कपिंग थेरपीचे काही सेटिंग्ज छान परीणाम दाखवतात. आमच्या रूग्णालयात हि सुविधा उपलब्ध आहे.
देव्हारे क्लीनिक
नागपुर