04/10/2021
*प्रसिद्ध नागार्जुन विहार परिसर मनसर/ रामटेक येथे 20 बेड चे नागार्जुन चॅरिटी कोविड केयर सेन्टर मनसर ची स्थापना।*
एकेकाळी भारतीय बौद्ध संस्कृतीचा वारसा असणारे शहर मनसर ता. रामटेक येथे नागार्जुन विहार परिसरात बोधिसत्व नागार्जुन स्मारक संस्था एवं अनुसंधान केंद्र मनसर नागपुर, समता सैनिक दल मुख्यालय दीक्षाभुमी आणि समता आरोग्य प्रतिष्ठान नागपुर च्या वतीने द नागार्जुन चैरिटी कोविड केअर सेंटर मनसर ची स्थापना दिनांक 03.10.2021 ला करण्यात आली. कोविड केअर स्थापनेच्या उद्घाटन समारंभात उद्घाटक पूज्यनीय भदन्त आर्य नागार्जुन सुरैई ससाई, अध्यक्ष बोधिसत्व नागार्जुन स्मारक संस्था एवं अनुसंधान केंद्र मनसर नागपुर असून अध्यक्ष मा. डॉ. स्मृतिताई संजय रामटेके ह्या होत्या. मा.डॉ. कमलताई गवई, सदस्य डा. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, मा.डॉ. सिद्धार्थ गायकवाड़, विभागीय आयुक्त समाज कल्याण मा. प्रा. जावेद पाशा, बहुजन विचारवंत, आयु. अमित गडपले, सचिव, बोधिसत्व नागार्जुन स्मारक संस्था व अनुसंधान केंद्र मनसर नागपुर आणि इंदोरा बुद्धविहार समिती प्रामुख्याने कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन मा. विश्वास पाटील यांनी केले आणि प्रास्ताविक ऍड. स्मिता कांबळे यांनी केले.
आदरणीय भन्तेजी यांनी आपले विचार सांगतांना नागार्जुन विहार परिसरात स्थापित झालेले कोविड सेन्टर मुळे परिसरातील गरीब जनतेला याचा फार लाभ होईल आणि उपचाराअभावी त्यांना जीव गमवावा लागणार नाही असे बोलून समता सैनिक दलामार्फत होत असलेल्या अभिनव वैद्यकीय सेवेचे कौतुक केले. डा. स्मृती रामटेके आणि प्रा. जावेद पाशा यांनी कोविड मुळेच नाही तर इतर आजारांमुळे ही गरीब जनतेची होणारी लूट आणि होरपळ या वर चिंता व्यक्त केली आणि लवकरच समता सैनिक दलामार्फत एक मोठे हॉस्पिटल समाजाला मिळेल अशी आशा व्यक्त केली. डा. कमल गवई यांनी बाबासाहेबांच्या विचारातील समता सैनिक दल आकार घेत असल्याचे गौरवाउद्गार काढले. कोविड केयर सेन्टर निर्माण करणे करिता आणि कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता समता सैनिक डा. महेंद्र कांबळे, संकेत शेम्बरकर, अरुण भारशंख, राज सुखदेवे, अजय बागडे, टारझन ढवळे, रितेश देशभ्रदार राजेश लांजेवार, आनंद तेलंग, अनिल रामटेके, प्रफुल मेश्राम सुखदास बागड़े, नंदकिशोर रंगारी, प्रज्वल बागडे, सुलभ बागडे, विनोद बन्सोड, सुरेखा ताई शेम्भरकर, दिशु कांबळे, विभावरी गजभिये, उषा बौद्ध यांनी मोलाची मेहनत घेतली.