25/06/2018
५००० दंड हा विषय बाजूला ठेवून.. तुमच्या अंतकरणाला विचारून बघा.. जे लिहीले आहे ते पटतंय का
बेकायदा प्लास्टिक बाळगणाऱ्याला 5,000 दंड काय झाला......
जिकडे तिकडे हाहाःकार झाला...
जोक काय.....
पहिली विकेट पडली...
व्यवस्थेचे धिंडवडे काय?
बरंच काही ऐकू यायला लागलं..!
"वारे जनता"...!
नक्की घाबरताय कशाला .? दंडाला की बदलाला...?
आज प्रत्येक गोष्टीत प्लास्टिक चा वापर होतो 100 गोष्टीं मध्ये 80 गोष्टी प्लास्टिकच्या असतात.
ज्या इतक्या घातक आहेत, की जगभरातील देशांना प्रश्न पडलाय की...
या सहजा सहजी नष्ट न होणाऱ्या, पर्यावरणाला घातक असलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्याचं करायचं काय...?
प्लास्टिकच्या वापराला विनाकारण बंदी का आणेल कुणी...?
कापड...कागद यांवर बंदी आहे का हो...?
नाहीये ना...?
कारण ते नष्ट होऊ शकतं..पर्यावरणाला घातक ठरणारं नाहिये...!
परंतु, प्लास्टिक जाळलं तरी नष्ट होत नाही.
प्लास्टिक आहे तसं जमिनीत गाडलं, तरी वर्षानुवर्षे तसंच राहतं ...!
यामुळे पर्यावरणाचं नुकसान किती होतंय ते माहितीये का कुणाला???
" प्रदूषणावर 3-3 पानं निबंध लिहिले ना आपण...?"
कि नुसतेच लिहिले...
त्यावर काही विचारच नाही केला????
बदलावं म्हटलं की..
थट्टा मस्करी सुचते आपल्याला...!
इथे कोणती गोष्ट आपण गंभीरपणे स्विकारतोय का आपण ?
तर नाही ! आजिबात नाही..!!
"प्लास्टिक" बंद केलं तर, मटण कसं आणायचं,
कुक्कर घेऊन जायचं का..??
व्वा.....👏🏻👏🏻
हसले सगळे...
झालं..संपलं ...
जोक होता...!
सुपिक जमीन नापीक झाली...
बोललं का कुणी.?
नद्या नाले तुंबले.....
गाई-वासरांच्या... इतर जनावरांच्या पोटात किलोने प्लास्टिक सापडलं....
बोललं का कुणी??
कधीतरी प्रत्येक शहरातल्या कचरा विघटन करणाऱ्या जागेत जाऊन बघा...
कळेल अवस्था....काय आहे ते...!
सतत जळत असतं..
ते पूर्ण नष्ट होत नाही.
त्या वर लिहिलं का हो कुणी...?
"किलो भर मटण"
आठवलं फक्त...!
यावर उपाय काय...?
तर,
माहिती नाही ..
पर्यायी व्यवस्था काय..?
तर,
माहिती नाही...
नाही...
आम्हांला काय करायचंय..?
फक्त एक पोस्ट कॉपी पेस्ट करायची...
ज्यावर 50 जण हसले की आम्ही खुश....!
आपण कधीच बदलणार नाही का?
मुळात आपल्याला घाणीत तोंड खुपसून बसायची सवय लागलीये ना...
तीच घातक ठरतीये...!
स्वतः बदलू नका...।
फक्त पोस्ट करा...
" माझा देश बदलतोय"