28/03/2020
Alert COVID19- सध्या काही दिवसापासून देशभरातील सर्व डेंटिस्ट ने उपचार बंद केले असून बहुतांश डेंटिस्ट हे फक्त फोन वर रुग्णांना सल्ले देत आहेत. यामुळे जनतेत त्याबद्दल गैरसमज नको म्हणून ही पोस्ट:
कोरोना विषाणूची लागण ही प्रामुख्याने थुंकी मधून अथवा शिंकण्याने होऊ शकते.. दातांच्या सर्व उपचारामध्ये आम्ही डेंटिस्ट प्रत्यक्षात तुमच्या तोंडात काम करत असतो. बहुतांश ट्रीटमेंट मध्ये पाण्याचा अथवा हवेचा फवारा वापरला जात असल्याने तोंडातील थुंकी ही त्याद्वारे हवेत उडते. याला आपण aerosol म्हणतो.. हा aerosol पुढील बरेच तास हवेत तसाच राहतो. यामुळे कोरोना बाधित व्यक्तीचे असे उपचार केल्यास डॉक्टर, असिस्टंट तसेच तुम्हा बाकीच्या रुग्णांना सुध्दा या एरोसोल मूळे कोरोना ची बाधा होण्याची शक्यता असते. उपचारा दरम्यान डेंटल चेअर, इन्स्ट्रुमेंट, टेबल ,खुर्ची तसेच आणि बऱ्याच ठिकाणी आमचा स्पर्श होतो . अशा वेळी कोरोना चे विषाणू अशा जागेवर राहून इतर रुग्णांना बाधा करू शकतात.
ह्या जागा जरी वेळोवेळी स्वच्छ केल्या जात असल्या तरी त्यावरील विषाणू १००% मेले आहेत हे खात्रीने सांगणे शक्य नाही. आणि हवेतील तयार झालेला ऐरोसोल तर काहीही करून निर्जंतुक नाही करता येत. त्यामुळे दांतोपचारामध्ये या विषाणू चा संसर्ग डेंटिस्ट, असिस्टंट व मुख्य म्हणजे पुढील अनेक रुग्णांना व्यायची शक्यता ही बाकीच्या डॉक्टर्स च्या दवाखान्या पेक्षा किती तरी पटींनी जास्त आहे.
कोरोना विषाणूची लक्षणे यायला बरेच दिवस लागत असल्याने जरी तुम्हाला तुम्ही निरोगी आहात असे वाटत असेल तरी तुम्ही या विषाणू चे कॅरियर असू शकता.. अशा वेळी तुमच्या फक्त तपासणी ने सुध्दा डेंटल चेअर, कन्सल्टिंग टेबल, खुर्ची, रिसेप्शन रूम मधील जागा तसेच इतर अनेक ठिकाणी हे विषाणू येऊन इतर रुग्णांना याची बाधा होऊ शकते.
देशभरात काही ठिकाणी रुग्णां द्वारे डॉक्टरला कॉरोना चा संसर्ग झाला आहे .हा विषाणू लवकर लक्षणे दाखवत नसल्याने अशा दवाखान्यात आलेल्या बाकी रुग्णांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होते..आणि डेंटल क्लिनिक.मध्ये ह्याचा धोका कितीतरी पटीने वाढतो त्यामुळे अशा वेळी दांतोपचार टाळणे हेच सुज्ञ ठरते.
याशिवाय उपचार करायचेच म्हटले तरी त्यासाठी आवश्यक इन ९५ मास्क, फेस शिल्ड, गाऊन ह्यांचा तुटवडा असल्याने ते प्रामुख्याने कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी झगडणाऱ्या डॉक्टरांना देण्यात येत आहेत त्यामुळे ते पण शक्य नाही.
बहुतांश दंतोउपचर हे टाळणे नाही पण औषधे घेऊन काही दिवस पुढे ढकलणे शक्य असते , आणि सध्याच्या स्थितीत तसे करणेच सर्वांच्याच हिताचे ठरेल.
त्यामुळे कृपया सर्वांच्याच हिताचा विचार करून डेंटिस्ट ना सहकार्य करावे. येत्या काही दिवसात तुम्हाला काही त्रास असल्यास आपल्या डेंटिस्ट शी फोन वर संपर्क साधावा... आम्ही शक्य त्या परीने तुम्हाला त्रास कमी करण्यास नक्कीच मदत करू अथवा औषधे सांगू..
त्यामुळे कृपया थोडे दिवस आम्हाला सहकार्य करावे. धन्यवाद.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
-डॉ.ऋषिकेश जोशी