Pankaj Tagde

Pankaj Tagde Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pankaj Tagde, Nagpur.
(1)

( सामाजिक कार्यकर्ता)
PG in Medical and psychiatric social worker, MBA in Human Resource management, BE in mechanical engg, Diploma In Sanitary Health Inspector

KTS सामान्य रुग्णालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी
23/02/2026

KTS सामान्य रुग्णालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त दिनांक 23 फेब्रुवारी रोजी  KTS जिल्हा सामान्य रुग्णालयात  संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन ...
23/02/2026

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त दिनांक 23 फेब्रुवारी रोजी KTS जिल्हा सामान्य रुग्णालयात संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकिस्तक आदरणीय डॉ. पुरुषोत्तम पटले सर तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. तृप्ती कटरे मॅडम यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण आणि दिपप्रज्वलन करून त्यांना अभिवादन केले तसेच इतर उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी पण अभिवादन केले. मान्यवरांनी सदर कार्यक्रमानिमित्त संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर त्यांच्या कार्यावर आपले मनोगत व्यक्त करून प्रकाश टाकला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले सर यांनी गाडगेबाबा यांनी सांगितलेले स्वच्छतेचे महत्व आरोग्य संस्था व कर्मचारी तसेच समाजाने आपल्या दैनंदिन जीवनात अवलोकन करून आपली संस्था तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवावा आणि आपले आरोग्य सुधारण्यावर भर द्यावा असे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक या रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय पंकज तागडे यांनी केलं. या कार्यक्रमाला रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 डॉ. गुरुप्रसाद खोब्रागडे, प्रशासकीय अधिकारी प्रीती मोहगावकर ,समाजसेवा अधीक्षक मनोविकृती दिलीप ब्राह्मणकर, आस्थापनेतील कार्यालय अधीक्षक संतोष भार्गवे, हेमंत बघेले, रोहन चव्हाण, लिपिक मंगेश चेलुरवार ,निलेश कुऱ्हाडे ,नंदेश मांडवकर, प्रिया बडोले, अमोल राठोड ,प्रसाद , अप्पाराव, लायंदाताई लाडे , सुजित इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

सिकलसेल , शासकीय आरोग्याच्या योजना मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम .
21/02/2026

सिकलसेल , शासकीय आरोग्याच्या योजना मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम .

KTS रुग्णालयात शिवजयंती साजरी.
21/02/2026

KTS रुग्णालयात शिवजयंती साजरी.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज KTS जिल्हा सामान्य रुग्णालयात महाराजांना मानवंदना अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमा...
19/02/2026

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज KTS जिल्हा सामान्य रुग्णालयात महाराजांना मानवंदना अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमानिमित्त गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकिस्तक आदरणीय डॉ. पुरुषोत्तम पटले सर तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. तृप्ती कटरे मॅडम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करून त्यांना अभिवादन केले तसेच इतर उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी पण अभिवादन केले. मान्यवरांनी सदर कार्यक्रमानिमित्त शिवरायांच्या जीवनावर त्यांच्या कार्यावर आपले मनोगत व्यक्त करून प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक या रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय पंकज तागडे यांनी केलं.🙏🙏

स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, ...
19/02/2026

स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणाऱ्या राजाला म्हणजे राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏

जिल्हा प्रशासकीय इमारत गोंदिया येथे आज सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मार्फत योजना सामाजिक न्यायाच्या यावर विशेष श...
11/02/2026

जिल्हा प्रशासकीय इमारत गोंदिया येथे आज सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मार्फत योजना सामाजिक न्यायाच्या यावर विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. तिथे KTS समाजसेवा विभागाच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांना आरोग्याच्या योजना आणि कार्यक्रम याविषयी जनजागृती आणि मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हा प्रशासकीय इमारत गोंदिया येथे आज सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मार्फत योजना सामाजिक न्यायाच्या यावर विशेष श...
11/02/2026

जिल्हा प्रशासकीय इमारत गोंदिया येथे आज सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मार्फत योजना सामाजिक न्यायाच्या यावर विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. तिथे KTS समाजसेवा विभागाच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांना आरोग्याच्या योजना आणि कार्यक्रम याविषयी जनजागृती आणि मार्गदर्शन करण्यात आले.

आज गोंदिया तहसील कार्यालय मार्फत आयोजित दिव्यांग बांधवांसाठी आयोजित विशेष शिबिर मध्ये विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थित रा...
28/01/2026

आज गोंदिया तहसील कार्यालय मार्फत आयोजित दिव्यांग बांधवांसाठी आयोजित विशेष शिबिर मध्ये विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून दिव्यांग बांधवांना शासकीय योजना इत्यादी विषयी मार्गदर्शन केले.

स्वातंत्र्यापूर्वी फक्त काही ठराविक लोकांना मतदानाचा अधिकार होता..भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना मत देण्याच्या अधिका...
25/01/2026

स्वातंत्र्यापूर्वी फक्त काही ठराविक लोकांना मतदानाचा अधिकार होता..भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना मत देण्याच्या अधिकार प्रदान केला आणि खऱ्या अर्थाने समता देशात प्रस्थापित केली. सुदृढ लोकशाहीसाठी आपण कोणत्याही प्रलोभनाला बळी न ठरता आपल्या पूर्वजांनी केलेल्या सत्कार्यामुळे , संघर्षामुळे आपल्याला लाभलेल्या या अधिकाराचा आपण प्रामाणिकपणे वापर केला पाहिजे. नी लोकशाही मजबूत केली पाहिजे.
राष्ट्रीय मतदार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏

मार्गदर्शन आणि समुपदेशन कार्यक्रम
18/01/2026

मार्गदर्शन आणि समुपदेशन कार्यक्रम

KTS सामान्य रुग्णालयाच्या आवारात सिकलसेल जनजागृती अरुणोदय मोहीम उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्या...
15/01/2026

KTS सामान्य रुग्णालयाच्या आवारात सिकलसेल जनजागृती अरुणोदय मोहीम उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे सर, या जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. पुरुषोत्तम पटले सर, डॉ. सुवर्णा हुबेकर, डॉ. जयस्वाल (RMO), समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय श्री. पंकज तागडे आदी उपस्थित होते. ही मोहीम संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात घरोघरी जाऊन ग्रामीण भागात सिकलसेल जनजागृती, निदान, उपचार इत्यादी कार्य करेल.

Address

Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pankaj Tagde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram