06/10/2025
☘️विरेचन कर्म महोत्सव ☘️
🔶पत्ता - श्री विश्वबालाजी आयुर्वेद पंचकर्म केंद्र, नांदेड.
राॅकहिल स्टडी पॉईंट खाली, फरांदे शोरूमच्या बाजुला पुर्णा रोड नांदेड.
📲 संपर्क - 7775055424 /9511730654
🌼 तज्ञ डाॅक्टर - डॉ गणेश हाके
(एम.डी आयुर्वेदाचार्य, पंचकर्म तज्ञ)
शाखा - नांदेड, यवतमाळ, उमरखेड.
🌿 विरेचन कर्म म्हणजे काय?
विरेचन म्हणजे औषधांच्या साहाय्याने पचनसंस्थेतील व शरीरातील दोषांचे (विशेषतः पित्तदोषाचे) शुद्धीकरण करून त्यांना गुदद्वाराद्वारे बाहेर काढण्याची क्रिया.
हि प्रक्रिया पित्तदोष, रक्तदोष व काही प्रमाणात कफदोष दूर करण्यासाठी केली जाते.
---
🔹 विरेचन कर्माचे उद्दिष्ट
1. शरीरातील पित्तदोषाचे शोधन (शुद्धीकरण)
2. पचनसंस्थेचा त्रास कमी करणे
3. त्वचारोग, रक्तविकार, पांडुरोग, आमवात इ. रोगांवर उपचार
4. शरीर हलके, स्वच्छ व निरोगी ठेवणे
---
🕉️ विरेचनाची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया
१️⃣ पूर्वकर्म (तयारी टप्पा)
रुग्णाला थेट विरेचन देत नाहीत. त्याआधी खालील तयारी आवश्यक असते —
स्नेहपान (आंतर व बाह्य) – औषधी तुप 4-5 दिवस दिले जातात.
स्वेदन (घाम आणणे) – शरीरातील दोष मृदू करण्यासाठी व बाहेर काढणे सोपे होण्यासाठी औषधी वाफ देतात.
🕒 कालावधी – 4 ते 5 दिवस
---
२️⃣ प्रधानकर्म (मुख्य प्रक्रिया)
सकाळी रिकाम्या पोटी विरेचन औषध (विरेचक द्रव्य) दिले जाते.
काही वेळात शौचास जावेसे वाटते आणि पित्त, आम व दोषांचे शुद्धीकरण होते.
४ ते १२ वेळा पर्यंत शौच होऊ शकते (रुग्णाच्या प्रकृतीनुसार).
🕑 कालावधी : १ दिवस
३️⃣ पश्चातकर्म (उपचारानंतरची काळजी)
विरेचनानंतर लगेच नेहमीचे अन्न घेता येत नाही.
संसर्जन क्रम पाळला जातो म्हणजे हालके अन्न देवुन पाचक अग्नी वाढवला जातो.
पहिला दिवस: भाताची पेज (मांड),
दुसरा दिवस: मुग + भाताचे पाणी जड.
तिसरा दिवस: पातळ खिचडी
चौथा दिवस : पातळ खिचडी
पाचवा दिवस : साधी मुगदाळ खिचडी
सहावा दिवस : नियमीत जेवन
विश्रांती, थंड वातावरण, राग, श्रम, उपवास, सूर्यप्रकाश टाळावा.
---
⚕️ विरेचनाने लाभ होणारे रोग
पित्तविकार (उष्णता, आम्लपित्त, उलटी)
त्वचारोग (सोरायसिस, पित्तज विकार, एक्झिमा)
पांडुरोग (अॅनिमिया)
अॅलर्जी, रक्तदोष
संधिवात, आमवात, हिपॅटायटिस
वजन नियंत्रण, चेहऱ्यावरील पित्तदोषयुक्त मुरूम
🌼 विरेचनाचे फायदे
✅ वारंवार होणारे अम्लपित्त कमी होते
✅ त्वचा स्वच्छ, चमकदार, केस गळणे कमी होते
✅ पचन सुधारते
✅ मन शांत राहते
✅ रोगप्रतिकारशक्ती वाढते
✅ शरीर हलके, ताजेतवाने वाटते
✅ वजन कमी होते
✅ जीर्ण हाडीताप, सोरायसीस व अन्य त्वचारोगावर उपयोगी.
✅ ह्रदयरोग, यकृत विकार, हायपरटेंन्शन , मुळव्याध, जंत, विकारांवर उपयोगी.