06/10/2025
आज अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा . कोजागिरी पौर्णिमा ही शरद ऋतूत साजरी केली जाणारी पौर्णिमा असल्या मुळे शरद पौर्णिमाही म्हटल्या जाते.
हा काळ शरद ऋतूची सुरुवात असल्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला आरोग्याच्या दृष्टीने महत्व आहे.
शरद ऋतू हा पित्ताचा प्रकोप काळ म्हणून ओळखला जातो. या दिवसात निसर्गाप्रमाणेच शरीरातही उष्णतेचे प्रमाण वाढलेले असते.
शरद ऋतूमध्ये मानवी आरोग्य सांभाळणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच नवरात्री मध्ये व्रत- वैकल्यांचा सल्ला दिला जातो तर त्यानंतर येणार्या पौर्णिमेला कोजागिरी साजरी केली जाते. निसर्गासोबत शरीरातील उष्णता कमी करण्याची क्षमता चंद्र- चांदण्यांच्या शीतल छायेमध्ये आहे. म्हणूनच या दिवशी चंद्राच्या छायेमध्ये अधिकाधिक वेळ राहण्याचा सल्ला दिला जातो.
दुध हे नैसर्गिकरित्या थंड प्रकृतीचे आहे. त्यामुळे चंद्राच्याप्रकाशाच्या सानिध्यात दूध आटवून पिण्याची संकल्पना पुढे आली. चंद्र-चांदण्याची शीतलता आणि दुधाचा थंडावा शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. शरदानंतर येणारे हेमंत व शिशिर हे थंडीचे ऋतू आहेत. हिवाळ्यात हाडांना कॅल्शिअम आणि स्निग्धता मिळण्यासाठी दूध व दुधावरची साय ही अत्यंत महत्वाची असते. दूध हे पित्त नाशक असते त्यामुळे शरदातील वाढलेले पित्त त्यामुळे कमी होते. मूळतः केवळ चंद्रप्रकाशात दूध आटवून पिणे आणि चंद्र-चांदण्याची सावलीत राहणे, हा कोजागिरी मागील मूळ हेतू आहे.
या ऋतू मध्ये शरीरातील उष्णता संतुलित रहावी, ती कमी होऊन सदी, पडसे, दमा, इ. श्वसनसंस्थेचे आजार होऊ नये म्हणून दुधात विविध मसाले टाकतात. जसे..दालचिनी,जायफळ, केसर वापरतात. तसेच बेदाणा,चारोळी,सुकामेवा, साखर,इ. थंडावा टिकवण्यासाठी व चवीसाठी टाकतात. सुकामेव्यामुळे ऊर्जा ही मिळते.
आपणास व आपल्या कुटुंबास कोजागरी पौर्णिमेच्या आरोग्यदायी व हार्दिक शुभेच्छा!
डॉ.जन्नावार भास्कर विष्णू , आयुर्वेद तज्ञ
B.A.M.S(Ayurvedacharya), M.Sc.(Herbal Med.), P.G.P.Panchkarm(Pune),Fellow Keralian Panchkarma(AVS Kottakkal,Kerala).
पंचकर्म ,केरळीय चिकित्सा व हर्बल मेडीसीन विशेषज्ञ
श्री समर्थ आयुर्वेद हॉस्पिटल & रिसर्च सेंटर,कलामंदिरमागे,सोमेश कॉलोनी,नांदेड.
मोबाईल: 9421971777, 8788554373
See less
Comments