Krishna ENT Hospital, Nashik

Krishna ENT Hospital, Nashik The best Ear nose throat laser endoscopy hospital Nashik

15/03/2021

Give the best hearing to child at the earliest for better future

Happy youth day
13/08/2020

Happy youth day

ENT CHECK UP CAMP AT CHALISGAON ON 5 APRIL 2020 AT OMKAR DIAGNOSTICS LAXMI NAGAR CHALISHAON time 10 am to 2 pm
11/03/2020

ENT CHECK UP CAMP AT CHALISGAON ON 5 APRIL 2020 AT OMKAR DIAGNOSTICS LAXMI NAGAR CHALISHAON time 10 am to 2 pm

Snoring and sleep apnoea related diseases evaluation and treatment camp with 50% discount on 13 march 2020 at Omkar's Kr...
09/03/2020

Snoring and sleep apnoea related diseases evaluation and treatment camp with 50% discount on 13 march 2020 at Omkar's Krishna ENTHospital
Sharanpur Link Rd, Near Canada Corner signal, opposite Adgaonkar jewellers , above ICICI bank ,Nashik,
for appointment
0253 257 4009
https://maps.app.goo.gl/ZaKug5975bDmLFFX7

Snoring , Sleep apnea and related discords check up camp with 50% discount in sleep study And DISE
09/03/2020

Snoring , Sleep apnea and related discords check up camp with 50% discount in sleep study And DISE

Sleep apnoea and related disorder check up camp on 13 march 2020 with 50% discount on sleep study And DISE
09/03/2020

Sleep apnoea and related disorder check up camp on 13 march 2020 with 50% discount on sleep study And DISE

आपल्या पंचेंद्रियांपैकी एक महत्त्वाचे इंद्रिय म्हणजे कान. कान हे श्रवणाचे काम तर करतातच, पण आपले एक सर्वसाधारण संतुलन सा...
02/03/2020

आपल्या पंचेंद्रियांपैकी एक महत्त्वाचे इंद्रिय म्हणजे कान. कान हे श्रवणाचे काम तर करतातच, पण आपले एक सर्वसाधारण संतुलन साधण्याचेही काम करतात. कान म्हणजे कानाची पाळ आणि त्यातून आत जाणारे छोटेसे छिद्र इतकेच बाहेर आपल्याला दिसते.

आपल्या पंचेंद्रियांपैकी एक महत्त्वाचे इंद्रिय म्हणजे कान. कान हे श्रवणाचे काम तर करतातच, पण आपले एक सर्वसाधारण संतुलन साधण्याचेही काम करतात. कान म्हणजे कानाची पाळ आणि त्यातून आत जाणारे छोटेसे छिद्र इतकेच बाहेर आपल्याला दिसते. पण आतही कानाची एक मोठी आणि क्लिष्ट अशी रचना असते. जोपर्यंत कानाचे काम सुरळीत सुरू असते, तोवर आपले कधी कानाकडे लक्षही जात नाही. ऐकू येतेय म्हणजे सगळे आलबेल, असा आपला सर्वसामान्य समज असतो. पण काही त्रास असे असतात की, ज्यांच्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते.

लहान मुलांमध्ये सर्दी आणि त्यातून कान वाहणे हे नेहमीच आढळून येते. तसे बघायला गेले, तर सर्दी म्हणजे अगदीच किरकोळ त्रास. सर्दीसाठी औषध नाही घेतले तर बरे व्हायला आठवडा लागतो आणि घेतले तर सात दिवस लागतात, असे गमतीने म्हटले जाते. पण बरेचदा असे नसते. लहान मुलांना सर्दी होऊन कान वाहणे सुरू झाल्यास याकडे दुर्लक्ष न करता लगेच कान-नाक-घसा तज्ज्ञाकडे दाखवायला हवे. कारण बरेचदा सर्दीमुळे कान व नाक यांना जोडणाऱ्या नलिकेतून (युस्टॅशियन ट्युब) संसर्ग कानात जातो. कानात पस तयार होतो आणि उपचार न झाल्यास कानाच्या पडद्याला छिद्र पडून कान वाहणे सुरू होते. कान फुटल्यावर उपचार झाले नाहीत, तर छिद्र कायमस्वरूपी राहते. मग ऐकायला कमी येते. वारंवार कान वाहण्याचा त्रास सुरू होतो. लहान मुलांमध्ये नाकाच्या मागच्या बाजूला अॅडेनॉइड्स असतात. नकारात्मक दबावामुळे कानात पाणी तयार होते. बहिरेपणा येतो. हे पाणी काढले नाही, तर कानाच्या पडद्याला आणि हाडाला नुकसान होऊ शकते.
कान वाहणे दोन प्रकारच्या आजारांमुळेही असू शकते. एका आजारात पडद्याला साधे छिद्र असते आणि अधूनमधून संसर्ग होऊन कान वाहतो. कान वाहण्याचे प्रमाण खूप जास्त असते. या प्रकारात ऐकायला कमी येणे, इतकाच तोटा नसतो. त्यामुळे या प्रकाराला वैद्यकशास्त्रात ‘सेफ टाइप ऑफ ओटायटिस मीडिया’ म्हणजे ‘सुरक्षित प्रकारचा मध्यकर्ण शोध’ असे म्हणतात. दुसऱ्या प्रकारात कान वाहण्याचे प्रमाण कमी असते. पण त्या द्रवपदार्थाला घाण वास असतो. कधीकधी ते रक्तमिश्रितही असते. याव्यतिरिक्त कानाचे हाड सडण्याचीही प्रक्रिया सुरू झालेली असते. उपचार झाले नाहीत, तर जीवाला धोका होऊ शकतो. म्हणजे मेंदूला अॅब्सेस होऊ शकते किंवा मेनिन्जायटिस होऊ शकतो. म्हणजेच मेंदूमध्ये कानाचा जो भाग असतो (लॅबरिथ) त्याला संसर्ग होऊ शकतो. वैद्यकशास्त्रात याला ‘अनसेफ टाइप ऑफ ओटायटिस मीडिया’ म्हणजे ‘असुरक्षित प्रकारचा मध्यकर्ण शोध’ असे म्हणतात.

‘सेफ ओटायटिस मीडिया’मध्ये नवीन पडदा लावता येतो. त्याला टिम्पॅनोप्लास्टी म्हणतात. याबरोबरच आपल्या कानात एक हाडांची साखळी असते. दीर्घकाळ कान वाहिल्यामुळे ती खराब झाली असेल, तर नीट करता येते. त्याला ऑसिक्युलोप्लास्टी म्हणतात. ‘अनसेफ ओटायटिस मीडिया’मध्ये मॅस्टॉइडेक्टॉमी करतात. यामध्ये सडलेले हाड काढून संसर्ग दूर करतात. कान कोणत्याही प्रकारे वाहत असला तरी, त्याचे निदान गरजेचे ठरते. निदानानुसार योग्य उपचार करून घ्यायला पाहिजे.
डॉ. मुकेश मोरे
नाक-कान-घसा तज्ज्ञ नाशिक

नाक-कान-घसा तज्ज्ञ
अध्यक्ष कान नाक घसा तज्ञ संघटना (एआओआय) नाशिक

जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने 4 फेब्रुवारी 2020कर्करोग हा एक गंभीर विकार आहे आणि यामध्ये रोगाच्या सुरुवातीला रुग्णा...
04/02/2020

जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने 4 फेब्रुवारी 2020
कर्करोग हा एक गंभीर विकार आहे आणि यामध्ये रोगाच्या सुरुवातीला रुग्णाला कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. कर्करोग जर सुरुवातीच्या अवस्थेत असेल, तर प्रभावी उपचारांद्वारे त्यावर मात करता येते. प्राथमिक प्रतिबंध, लवकर निदान उपचार आणि पुनर्वसन हे कर्करोगाविरुद्धच्या लढाईतील मुख्य घटक आहेत. या लेखात आपण कर्करोगाची लक्षणे आणि प्राथमिक प्रतिबंध याबाबत जाणून घेऊ या.
लक्षणे ः
थकवा : हे लक्षण प्रामुख्याने रक्ताचा, पोटाचा किंवा मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग यामध्ये दिसून येते. कर्करोगामुळे शरीरातील हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होते आणि थकवा जाणवतो. भरपूर झोप घेतल्यानंतर आणि मनसोक्त आराम केल्यानंतरही थकवा जात नसेल, तर दुर्लक्ष करू नका.
वजन कमी होणे : वजन लक्षणीय कमी होणे, हे लक्षण पचनेंद्रियासंबंधित अवयवांच्या कर्करोगात आढळते.
फोड किंवा गाठ : शरीरातील कुठल्याही भागात आलेली गाठ किंवा फोड बरी होत नसल्यास दुर्लक्ष करू नका.
असाधारण किंवा अनियंत्रित रक्तस्राव : रक्ताची उलटी होणे, हे जठर, यकृत या अवयवांच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. शौचातून रक्त पडणे हा मोठय़ा आतडय़ांच्या कर्करोगाचा संकेत असू शकतो. खोकल्यातून रक्त पडणे, हे फुप्फुसांच्या कर्करोगाचे आणि लघवीतून रक्तस्राव हे मूत्राशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
स्तनांतील बदल : स्तनांचा बदललेला आकार, गाठ, स्तनांवरील एखादा भाग आजुबाजूच्या उतींपेक्षा कठीण होणे ही स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात.
मासिक पाळीच्या समस्या : उतारवयात मासिक पाळी थांबल्यावर अचानक जास्त रक्तस्राव होणे, असह्य़ पोटदुखी, कंबरदुखी ही गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत.
सततचा खोकला : सर्दी-खोकला होणे ही सामान्य बाब आहे. मात्र, हा त्रास खूप काळ होणे, त्याबरोबर आवाजात बदल, दम लागणे, अन्न गिळताना त्रास होणे ही लक्षणे असतील, तर गळ्याच्या कर्करोगाचा किंवा फुप्फुसांच्या कर्करोगाचा संभव असतो.
लघवी करताना त्रास होणे : वाढत्या वयानुसार लघवीला सारखे जाणे, नकळत लघवी होणे हे त्रास प्रोस्टेट ग्रंथींच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात.
बद्धकोष्ठता किंवा शौचाच्या सवयीतील बदल : हा मोठय़ा आतडय़ाच्या कर्करोगाचा संकेत असू शकतो.
त्वचेवर ठिपके किंवा त्वचेचा रंग बदलणे : त्वचेचा रंग बदलणे, अस्तित्वात असलेल्या तिळाच्या आकारात वाढ होणे, ही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
प्राथमिक प्रतिबंध-
* धूम्रपान, तंबाखू, गुटखा व मद्यपान या व्यसनांपासून दूर राहा.
* उतारवयात कर्करोगाचा धोका वाढत जातो म्हणूनच कर्करोगाची पडताणी करण्यासाठी असणाऱ्या चाचण्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे करा. चाळिशीनंतर स्तनांच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी दरवर्षी मॅमोग्राफीचा तपास करणे आवश्यक आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान लवकर करण्यासाठी पॅप स्मिअरची तपासणी नियमितपणे करू शकता.
* अतिनील किरणोत्सारांमुळे होणाऱ्या कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी १० ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळा. उन्हापासून त्वचेचे संरक्षण करा. नियमितपणे सनस्क्रिनचा वापर करा.
लसीकरण -
‘हेपाटायटिस बी’मुळे यकृताचा कर्करोग होऊ शकतो. या विषाणूंचा संसर्ग होऊ नये यााठी लसीकरण करणे आवश्यक आहे. ह्य़ूमन पॅपिलोमाच्या विषाणूंमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. त्याचा प्रतिबंध करण्यासाठीही लस उपलब्ध आहे.
गर्भधारणा न होण्यासाठी उपलब्ध असलेल्या गोळय़ांचा वापर वयाच्या ३५ वर्षांनंतर टाळा. रजोनिवृत्ती काळात हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेत असलेल्या स्त्रियांना संभाव्य धोक्याची आणि लाभांची माहिती असणे आवश्यक आहे. या हार्मोनमुळे स्तनाचा, गर्भाशयाचा कर्करोग तसेच रक्तगुठळीचा धोकाही वाढतो.
रेझर आणि सुयांचा सहवापर टाळा. असुरक्षित संभोग टाळा. या कारणांमुळे हेपटायटिस बी, हेपटायटिस सी आणि एचआयव्ही या विषाणूंचा संसर्ग होऊन त्यांच्यामुळे होणाऱ्या कर्करोगाचा धोका वाढतो.
स्तनपान करण्यामुळे स्तनांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
मुलींचे लग्न कमी वयात करणे टाळा. कारण दीर्घकाळ असलेल्या जंतुसंसर्गामुळे व गर्भाशयातील घावामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

Address

SHARANPUR LINK Road
Nashik
422002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krishna ENT Hospital, Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Krishna ENT Hospital, Nashik:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category