11/09/2025
वजन कमी करायचं म्हणजे मोठा त्याग, कठोर डाएट आणि जिममध्ये तासंतास घाम गाळणं…
असं वाटतं ना? पण खरं तर फक्त एक लहानसा बदल पुरेसा असतो 💛
थेंबे थेंबे तळे साचे!!!
ही म्हण वापरून अगदी जुनी झालीय. But yes...Old is gold.
वजन कमी करायचं म्हटलं की आपल्या डोक्यात लगेच १० किलो,१५ किलो असे मोठे टार्गेट्स येतात. वजन कमी करताना तुमचं monthly टार्गेट नको, weekly टार्गेट ठेवा. एका आठवड्यात वजन फक्त तुमच्या body weight च्या १% नी कमी झालं तरी perfect आहे.
उदा. – जर वजन ९० किलो असेल तर आठवड्यात साधारण ९०० ग्रॅम कमी होणं हेच safe आहे.
जास्त कमी करायचं म्हटलं तर मोठा calorie deficit लागतो. Deficit जास्त असेल तर बॉडीला nutrition कुठून मिळणार? Fat loss पेक्षा muscle loss होईल, energy कमी होईल…आणि त्यासोबतच येतात problems – loose skin, hair fall, weakness.
१० किलो,१५ किलो कमी करण्याचे टार्गेट म्हणजे Unrealistic गोल आहेत. तुमची प्रेरणा लगेचच नष्ट होणार.... तुमसे ना हो पायेगा असं आपलं आपल्याला माहित असते.म्हणून खूपच वजन कमी करून लगेच चवळीची शेंग होता येत नाही हे आधी स्वीकारा!!
मग आता सेट करूया स्वतःसाठी एक इवले टार्गेट.
ते म्हणजे – इंटरनेट, यूट्यूब, इन्स्टा, नुसते सल्ले..
वजन कमी करायचंय? मग स्वतःला हा सोप्पा प्रश्न विचाराः "मी अशी एक कोणती सवय आहे, जी मी लगेच बदलू शकेन? ह्यापैकी काही जमते का पहा...म्हणजे जमवाच.
बाहेरचं खाणं आठवड्यातून एकदाच करायचं
दररोज 30 मिनिटे चालायचे किंवा युट्यूब वर beginner व्हिडिओ बघून घरच्या घरी पंधरा मिनिटं हलकं व्यायाम करायचा.
८००० ते १०००० स्टेप्सचे टार्गेट ठेवायचे.
प्रत्येक जेवणात carbohydrates सोबत प्रोटीन आणि भाज्या पण add करायच्या. जेवणाची सुरुवात सलाड किंवा कोशिंबीरने करायची.
अल्कोहोल घेत नसालच 🤨
घेत असाल तर हळूहळू बंद करा!!
अजून एक महत्वाचं....ह्यासाठी सोमवार किंवा उद्यापासून हे मुहूर्त काढण देखील बंद करा.. सिंघममध्ये जयकांत शिखरे ने काय सांगितले लक्षात ठेवा ...अभी के अभी.
ह्यांमुळे तुम्ही पैसे आणि कॅलरी सुधा वाचवू शकाल.
small is Beautiful!!
लक्षात ठेवा, वजन १० वर्षात वाढलंय तर ते २–३ महिन्यांत कमी होणार नाही. आतापासून तुम्ही एक बदल केला, तर पुढच्या सहा महिन्यात तुम्ही ९ किलो हलके असाल – आणि त्याहूनही जास्त सशक्त आणि समाधानी!
एक किलो कमी करता करता, तुमच्यातलेच नवे तुम्ही समोर याल ! हलके फुलके, स्वतःवर प्रेम करणारे, स्वतःची काळजी करणारे..मग सुरू करूया एक सुंदर प्रवास?
©Dt. Smita Kale
M.Sc. in food & Nutrition
P.G.D. in Dietetics
9823049877