Shri Guruji Rugnalaya

Shri Guruji Rugnalaya Welcome to the official Shri Guruji Rugnalaya page. Shri Guruji Rugnalaya is a public charitable hospital located in Nashik, Maharashtra.

गुडघेदुखी आता सहन करण्याची गरज नाही. आधुनिक पद्धतीने सांधेरोपण करून वेदनामुक्त, सक्रिय जीवनाकडे पुन्हा वाटचाल सुरू करा. ...
23/02/2026

गुडघेदुखी आता सहन करण्याची गरज नाही. आधुनिक पद्धतीने सांधेरोपण करून वेदनामुक्त, सक्रिय जीवनाकडे पुन्हा वाटचाल सुरू करा. आजच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

20/02/2026

This patient, originally from Varanasi and currently working in Maharashtra, came to us in need of urgent medical care.

He did not possess a Maharashtra Ration Card or an Ayushman Card from Uttar Pradesh, making him ineligible for free treatment schemes.
The total medical bill was approximately ₹2,00,000. Despite financial challenges, he voluntarily contributed ₹50,000 with sincerity and gratitude.

Understanding his circumstances, our hospital stepped forward with compassion and bore the remaining cost to ensure he received the treatment he deserved.
Because healthcare is not just about treatment — it’s about humanity, care, and standing by those in need. 💛

07/02/2026

Sharing a story of strength, hope, and recovery ❤️
From a critical heart condition to a successful recovery — this journey reminds us that expert care, timely treatment, and strong willpower can truly change lives.
Grateful to be part of stories where science meets compassion and healing becomes possible.

[Heart recovery,Cardiac care success,
Patient recovery story. Critical heart patient recovery, Life after heart surgery, Healing journey]

प्रिय मित्रांनो...चार फेब्रुवारी..आज कर्करोग दिन...या दिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या कशा? तर या दिवशी तुम्ही दिलेली लढाई आ...
04/02/2026

प्रिय मित्रांनो...
चार फेब्रुवारी..
आज कर्करोग दिन...
या दिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या कशा?
तर या दिवशी तुम्ही दिलेली लढाई आठवायची.
जेव्हा तुम्हाला समजले की तुम्हाला कर्करोग झाला आहे त्याच दिवसापासून तुमची त्याच्याविरुद्ध लढाई सुरू झाली.
मी तर तुमच्या कर्करोगाच्या गरजेनुसार तुम्हाला कोणते उपचार गरजेचे आहेत ते केले...
पण या काळात तुम्हाला औषधाच्याही पलिकडे खूप काही गरजेचे होते ते म्हणजे धैर्य..प्रेम आणि आत्मविश्वास..
तुम्ही तो मिळवला.
तुमच्या परिवाराने तुम्हाला प्रेम दिले आणि काळजी घेतली.
औषधांचा overdose होऊ नये याची काळजी आम्ही घेतली..त्याच सोबत तुमचे मनोबल वाढण्यासाठी लागणारे प्रेम आणि विश्वास याचा overdose मात्र व्हावा यासाठी पण प्रयत्न केले.
कोणतीही लढाई लढल्याशिवाय जिंकता येत नाही मग कॅन्सरची लढाई सुद्धा लढावी लागेल आणि जिंकावीच लागेल हे तुम्हाला आता
इतर जे काही नवीन आहेत या लढाईत उतरलेले त्यांना सांगायचे आहे.
त्यांच्यात नवीन आशा निर्माण करायची आहे.
हे काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एकत्र करायचे आहे.
काळजी घ्या..स्वस्थ रहा..मस्त रहा...
आपलाच
डॉ.गिरीश बेद्रे
कर्करोग विभाग प्रमुख
श्रीगुरुजी रुग्णालय नाशिक

*श्रीगुरुजी रुग्णालयाचे समाजकार्य मोठ्या प्रमाणावर - श्री नरेंद्र गोलिया*  श्रीगुरुजी रुग्णालय सातत्याने समाजासाठी चांगल...
26/01/2026

*श्रीगुरुजी रुग्णालयाचे समाजकार्य मोठ्या प्रमाणावर - श्री नरेंद्र गोलिया*

श्रीगुरुजी रुग्णालय सातत्याने समाजासाठी चांगले कार्य करत आहे. मी हे कार्य "नाशिक मानव सेवा संघ" आणि सेवा संकल्प समितीच्या माध्यमातून जवळून पाहिले आहे. या माध्यमातून मलाही या कार्यात सहभागी होता आले असे प्रतिपादन ऋषभ(रिषभ) इन्स्ट्रुमेंटचे संचालक श्री.नरेंद्र गोलिया यांनी केले. श्रीगुरुजी रुग्णालयात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला, या कार्यक्रमात श्री नरेंद्र गोलिया प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की रुग्णसेवेच्या पवित्र कार्याबरोबरच श्रीगुरुजी रुग्णालयाने विविध आजारांसाठी, आजार होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात, विविध वैद्यकीय विषयात संशोधन कार्य करावे असे प्रतिपादन देखील त्यांनी केले, आणि रुग्णालय हे काम नक्कीच करू शकेल याची मला खात्री आहे.

श्रीगुरुजी रुग्णालय हे अनेक लोकांचे श्रद्धास्थान बनलेले आहे. लोकांना रुग्णालयाकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्यांना येथे मिळत असलेल्या सेवेबद्दल समाधान देखील लाभत आहे. समाजाकडून अशी प्रशंसा होत आहे तरी रुग्णालयातील सर्वांनी आपल्या कामामध्ये परिपूर्णता कशी येईल, यासाठी आपले योगदान कसे असावे याचा नेहमी विचार करावा आणि त्याप्रमाणे आपली कृती करावी असे आवाहन रुग्णालयाचे अध्यक्ष श्री. प्रवीण बुरकुले यांनी या प्रसंगी केले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व भारतमाता पूजन करण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. सुरुवात क्रिश बेद्रे याच्या देशभक्तीपर गाण्याने झाली. या वेळच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हाऊस किपींग च्या टीम ने पहिल्यांदा आपल्या कलेद्वारे सामाजिक संदेश दिला. यामध्ये त्यांनी बेसिक लाईफ सपोर्ट, हात धुण्याचे महत्व व कचऱ्याची योग्य विल्हेवाट हे विषय अनोख्या पद्धतीने उत्कृष्टपणे मांडले.

यानंतर सेवांकुर भारत मध्ये विशेष सेवाकार्य करणाऱ्या डॉक्टरांचा, सर्वोत्तम उपस्थिती असलेल्या कर्मचाऱ्यांचा व सर्वात जास्त गुडवर्क कार्ड प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्रीगुरुजी रुग्णालयामध्ये नुकतीच जिरियाट्रिक ओपीडी सुरु करण्यात आली; त्या अनुषंगाने "जिव्हाळा"च्या जेष्ठ नागरिक विशेषांकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी रुग्णालयाचे कार्यवाह श्री. प्रकाश भिडे यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन डॉ. ऋत्विज दातार यांनी केले. कार्यक्रमास बहुसंख्येने हितचिंतक, डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.

🇮🇳 A healthy heart builds a stronger nation. This Republic Day, let’s pledge to care for our hearts and our Bharat. ❤️
26/01/2026

🇮🇳 A healthy heart builds a stronger nation. This Republic Day, let’s pledge to care for our hearts and our Bharat. ❤️

आईचे आरोग्य म्हणजे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य!सुरक्षित मातृत्व आणि मानसिक आरोग्य जपून आनंदी जीवन फुलवूया.२३ जानेवारी – Men...
23/01/2026

आईचे आरोग्य म्हणजे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य!
सुरक्षित मातृत्व आणि मानसिक आरोग्य जपून आनंदी जीवन फुलवूया.
२३ जानेवारी – Mental Health Awareness Day

15/01/2026
13/01/2026

ज्यांनी आयुष्यभर आमची काळजी घेतली,
आज त्यांची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष बाह्यरुग्ण विभाग –
दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी.

डॉ. अनुज तिवारी
जेरियाट्रिक व जनरल मेडिसिन तज्ञ एम.बी.बी.एस, डी.एन. बी (इंटर्नल मेडिसिन) पी.जी.डी.जी.एम. (जेरीऑंट्रीक्स), एफ.जी.आय.डी. (इन्फे विशेयस डिसीज)

डॉ. द्युती मित्तल

जेरियाट्रिक व जनरल मेडिसिन तज्ञ एम.बी.बी.एस, एम.डी (इंटर्नल मेडिसिन) पी.जी.डी.जी.एम. (जेरीऑंट्रीक्स)

Every dose carries hope. Every smile tells a healing story.Happy National Pharmacist Day 💊🙂
12/01/2026

Every dose carries hope. Every smile tells a healing story.
Happy National Pharmacist Day 💊🙂

05/01/2026

From challenge to recovery—another success story added. Proud to be part of this healing journey.

( )

Address

Gangapur Road, Anandwalli Chowk
Nashik
422013

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Guruji Rugnalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shri Guruji Rugnalaya:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category