18/04/2026
✨ एक अविस्मरणीय क्षण! ✨
ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आयु .उत्तम कांबळे सर यांनी आज सुजय नेत्र सेवाला सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी त्यांचा नवा ग्रंथ 'काळाराम मंदिर सत्याग्रहः विद्रोहाकडून क्रांतीकडे' सप्रेम भेट दिला.
हा ग्रंथ म्हणजे इतिहासाचे एक महत्त्वपूर्ण पान. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या विद्रोही चळवळीपासून क्रांतीपर्यंतचा प्रवास अत्यंत प्रभावीपणे मांडणारा हा ग्रंथ प्रत्येकाने वाचायलाच हवा.
कांबळे सर, आपल्या या अमूल्य भेटीसाठी व ज्ञानदानासाठी मनःपूर्वक आभार! 🙏
#उत्तमकांबळे #काळारामसत्याग्रह #मराठीसाहित्य #सुजयनेत्रसेवा