27/10/2025
दीपोत्सव..!! 🪔
या दिवाळीला काही ही plan नव्हता, अनुज अचानक आला आणि लगेच त्याने "दीपोत्सव " ची संकल्पना मांडली. पण अगदी दोन दिवसात सर्व कसे Arrange करायचे. हाही प्रश्न चुटकीसरशी सुटला. कारण, सुदैवाने आयुष्यात काही माणसे ही देवदूतासारखी सतत तुमच्यासोबत असतात.. जी तुम्हाला का.? ऐनवेळेस कसे शक्य आहे.? असे काहीही न विचारता, ठीक आहे, होऊन जाईल, असे म्हणतात आणि तसे करुनही दाखवतात.
यात अग्रक्रमाने नंबर येतो, तो उदय पाटील म्हणजेच आमचा लाडका बापू आणि त्याचा मेलोडियस करावोके क्लबच्या सर्व मेंबरचा. तसेच अनुज व अवनिशचे मित्र कंपनी, जे सदैव एका हाकेवर दिलासाच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान देतात.
सरतेशेवटी आमचा स्टाफ ज्यांच्याशिवाय कोणताच कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही. या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
Last but not least, आमचे दिलासा आणि दिलासा राम जानकीतील आजी आजोबा, ज्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी आम्ही सदैव हे सर्व खटाटोप करत असतो.. त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाशिवाय हे कार्यक्रम यशस्वी होऊच शकत नाहीत. त्यांचेही मनापासून आभार.