Dilasa Care Center (Old Age)

Dilasa Care Center (Old Age) Dilasa care center offers all medical care and treatment for paralysis, bedsores, coma, fracture cerebral palsy, drug-addict and many other treatments.

27/10/2025
दीपोत्सव..!! 🪔या दिवाळीला काही ही plan नव्हता, अनुज अचानक आला आणि लगेच त्याने "दीपोत्सव " ची संकल्पना मांडली. पण अगदी दो...
27/10/2025

दीपोत्सव..!! 🪔
या दिवाळीला काही ही plan नव्हता, अनुज अचानक आला आणि लगेच त्याने "दीपोत्सव " ची संकल्पना मांडली. पण अगदी दोन दिवसात सर्व कसे Arrange करायचे. हाही प्रश्न चुटकीसरशी सुटला. कारण, सुदैवाने आयुष्यात काही माणसे ही देवदूतासारखी सतत तुमच्यासोबत असतात.. जी तुम्हाला का.? ऐनवेळेस कसे शक्य आहे.? असे काहीही न विचारता, ठीक आहे, होऊन जाईल, असे म्हणतात आणि तसे करुनही दाखवतात.
यात अग्रक्रमाने नंबर येतो, तो उदय पाटील म्हणजेच आमचा लाडका बापू आणि त्याचा मेलोडियस करावोके क्लबच्या सर्व मेंबरचा. तसेच अनुज व अवनिशचे मित्र कंपनी, जे सदैव एका हाकेवर दिलासाच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान देतात.
सरतेशेवटी आमचा स्टाफ ज्यांच्याशिवाय कोणताच कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही. या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
Last but not least, आमचे दिलासा आणि दिलासा राम जानकीतील आजी आजोबा, ज्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी आम्ही सदैव हे सर्व खटाटोप करत असतो.. त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाशिवाय हे कार्यक्रम यशस्वी होऊच शकत नाहीत. त्यांचेही मनापासून आभार.

अंधाराकडून तेजाकडे,निराशेकडून आशेकडे,दुःखाकडून सुखाकडे,आजाराकडून आरोग्याकडे,अशा सर्वांगीण समृद्धीचा सण आहे दीपावली! येत्...
19/10/2025

अंधाराकडून तेजाकडे,
निराशेकडून आशेकडे,
दुःखाकडून सुखाकडे,
आजाराकडून आरोग्याकडे,
अशा सर्वांगीण समृद्धीचा सण आहे दीपावली!
येत्या २० ऑक्टो. ला दिलासात आणि २३ ऑक्टो. ला दिलासा राम जानकीत, तेथील आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी आणि दिवाळीचा खरा आनंद निर्माण करण्यासाठी आपण दीपोत्सव ह्या नावाने कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
गाणी-गप्पा, फराळ, फटाके असा भरगच्च कार्यक्रम आहे.
आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप - खूप सार्‍या हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद.🪔

निरोप तरी कसा घ्यावा?बाप्पा हे १०दिवस तुझ्या सान्निध्यात कसे गेले कळलेच नाही. तुझ्या आगमनाने सर्व चिंता, आजार, दुःखे, नि...
07/09/2025

निरोप तरी कसा घ्यावा?
बाप्पा हे १०दिवस तुझ्या सान्निध्यात कसे गेले कळलेच नाही. तुझ्या आगमनाने सर्व चिंता, आजार, दुःखे, निराशा कोठे पळून गेले ते कळलेच नाही. प्रत्येक क्षण हा अगदी चैतन्याने - उत्साहाने भारलेला होता. रोज सकाळ - संध्याकाळ तुझी आरती म्हणतांनाची तल्लीनता आता परत एका वर्षानेच अनुभवायला मिळणार.
प्रत्येक वर्षी तुला निरोप देतांना अंतःकरण जड होते. आपल्या लाडक्याच्या हातात निरोपेवेळी दही देतांना आणि
तहान लाडू व भूकलाडू बांधून देतांना काळीज हेलावते..
आणि परत ओढ लागते ती, पुढील वर्षीच्या तुझ्या आगमनाची.
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या.

गणपती बाप्पा मोरया ! सर्वांचा विघ्नहर्ता, सर्वांचा सुखकर्ता अशा बाप्पाचे आगमन झालेले आहे. एकाकीपण, व्याधींनी ग्रस्त, आजा...
27/08/2025

गणपती बाप्पा मोरया !
सर्वांचा विघ्नहर्ता, सर्वांचा सुखकर्ता अशा बाप्पाचे आगमन झालेले आहे.
एकाकीपण, व्याधींनी ग्रस्त, आजारांनी त्रस्त झालेल्या आजी - आजोबांच्या चेहऱ्यावर बाप्पाच्या आगमनाने छानसे हास्य फुलविले. प्रत्येकजण आपला त्रास विसरून बाप्पाच्या पूजेत आणि आरतीत रममाण झाले. टाळ - चिपळया ह्यांच्या नादात सर्व अगदी देहभान विसरले.
"गणपतीचा महिमा हा अगाध,
सर्वांच्या सुखाचा कारक."
गणपती बाप्पा मोरया.

दिलासा, गेल्या 20 वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना, ज्यांच्या नातेवाईकांना त्यांना सांभाळणे काही कारणास्तव शक्य...
23/05/2025

दिलासा, गेल्या 20 वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना, ज्यांच्या नातेवाईकांना त्यांना सांभाळणे काही कारणास्तव शक्य नाही, वा जे पूर्णपणे निराधार आहेत, जे पोलिसांकडून दिलासात दाखल झाले आहे, अशा शारिरीक व मानसिक व्याधिग्रस्त रुग्णांना सांभाळतो.
अर्थात, सर्वस्व वाहून घेतलेले कर्मचारीवर्ग आणि समाजातील काही दानशूर व्यक्तिमत्त्व यांच्या सहकार्यातून दिलासा आपले कार्य इनामेइतबारे पार पाडत आहे.
अशात जर, एखाद्या प्रतिष्ठित संस्थेकडून ज्यावेळेस पुरस्कृत केले जाते, तो दुग्धशर्करा योग ठरतो.
दि. 21 मे 2025 रोजी, "दिलासा केअर सेंटरचे" संस्थापक सदस्य, श्री. सतिश जगताप यांना, "कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था" यांच्यामार्फत "राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले.
असे पुरस्कार म्हणजे, आतापर्यंत केलेल्या कामाची पावती असते. तसेच ह्या पुरस्कारांसोबत आपले कार्य अधिक चांगल्या पद्धतीने करण्याची जबाबदारीही वाढते.
कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे मनापासून आभार.

कोण म्हणतंय आयुष्य निरस आहे. आयुष्याची मजा घेता आली पाहिजे, आयुष्य वेगवेगळ्या आठवणींच्या धाग्याने विणता आले पाहिजे.वेळ प...
14/03/2025

कोण म्हणतंय आयुष्य निरस आहे.
आयुष्याची मजा घेता आली पाहिजे, आयुष्य वेगवेगळ्या आठवणींच्या धाग्याने विणता आले पाहिजे.
वेळ पडली तर, ज्याच्यावर नाराज आहोत, त्याच्या नावाने शिमगा करता आला पाहिजे, ज्याने मनातील कोंडलेल्या भावनांना वाट मिळेल. सर्व नकारात्मक भावना होळीत जळून जातील व भावनांना नविन धुमारे फुटतील.
आयुष्यातील सर्व नकारात्मकता जाळून नविन ऊर्जेने आयुष्यातील सकारात्मकतेचा स्विकार करण्यासाठीच दिलासा प्रतिष्ठान संचलित, दिलासा केअर सेंटर आणि दिलासा राम जानकी होम इथे होळी उत्साहात साजरी करण्यात आली.

18/10/2024
गणपती बाप्पा मोरया गेल्या १४ वर्षात बाप्पा दिलासात नियमित येत आहेत. आणि आम्हां सर्वांचे आयुष्य उत्साह व आनंदाने भरत आहेत...
07/09/2024

गणपती बाप्पा मोरया
गेल्या १४ वर्षात बाप्पा दिलासात नियमित येत आहेत. आणि आम्हां सर्वांचे आयुष्य उत्साह व आनंदाने भरत आहेत.
गणपतीची आरास आजपर्यंत एकदाही repeat झाली नाही. गणपती आयच्या आधि महिनाभर देखावा काय असावा, इथून तर तो कसा उभारावा याची जय्यत तयारी सुरु होते.
शाडू मातीचा गणपती तर ठरलेला असतो, यावर्षी बाप्पा सोबत १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन करवायचे ठरले मग महिनाभर आधि शाडू माती आणून, भिजवून "मिट्टी फाउंडेशन" च्या मोरे बंधूंच्या मार्गदर्शनाखाली ज्योतिर्लिंग बनविले.
राजू भाऊ, रोहन, दुर्गा भाऊ, ओम, अनुज, अवनिश, नागले बाबा, अलि भाई, श्रुती आणि दिलासाचा सर्व कर्मचारीवृंद अशी सर्व team सज्ज झाली.
आणि आज गणपती बाप्पाची सांग्रसंगित, सर्व विधिवत स्थापना झाली.
आपण सर्वांनीही बाप्पा सोबतच १२ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी दिलासात नक्की यावे.
गणपती बाप्पा मोरया.

26/07/2024

Raju Kaka's incredible journey from illness to independence....✨

Address

Nashik

Opening Hours

Monday 7am - 10pm
Tuesday 7am - 10pm
Wednesday 7am - 10pm
Thursday 7am - 10pm
Friday 7am - 10pm
Saturday 7am - 10pm
Sunday 7am - 10pm

Telephone

+919422258756

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dilasa Care Center (Old Age) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram