04/12/2025
आज दिनांक 4 12 2025 रोजी दत्त जयंतीचा उत्सव चैतन्य व उत्साहात पार पडला.
डॉ प्रसाद जोशी यांचे सुश्राव्य किर्तन यावेळी झाले.
याप्रसंगी नारायणरत्न प पू श्री प्रकाशराव प्रभुणे महाराज यांनी प प श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्ट, जागतिक मुख्य केंद्र नाशिक येथे भारत प्रचार प्रसार प्रमुख पदाची घोषणा केली.
श्री लौकिक प्रभुणे यांनी परम पूजनीय प्रभुणे महाराजांचे आशीर्वाद घेत अनेक साधकांच्या साक्षीनं पदभार स्वीकारला.
शक्तिपाताचार्य परमपूजनीय श्री नारायणकाका ढेकणे महाराज यांचा पादुका प्रचार व प्रसार दौरा भारतभर करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
विशेष म्हणजे या पादुका परमपूजनीय नारायणकाका ढेकणे महाराज आपल्याबरोबर पाद्यपूजेसाठी घेऊन जात असत.