Ksh*tij Multispeciality Homoeopathic Clinic & Research Center

  • Home
  • India
  • Nashik
  • Ksh*tij Multispeciality Homoeopathic Clinic & Research Center

Ksh*tij Multispeciality Homoeopathic Clinic & Research Center Homoeopathic Clinic

09/03/2022

Cp...

*‬'पाळी'* वर इतकी सुंदर कविता पण होऊ शकते?
*II सखी II*

ती आली आयुष्यात अन् मी मोठी झाले
अवखळ मुलीची एकदम बाई झाले

नको वाटायचे तिचे येणे
सगळ्यात असून दूर बसणे

सण नाही वार नाही
तिचे येणे ठरलेले
अन् तिच्या येण्याने माझे बेत उधळलेले

बरोबर महिन्याने यायची,
येण्याआधी आठ दिवस चाहुल द्यायची
इतकी सवय झाली तिची
की नाही आली वेळेवर तर मी चिडायची
सगळे तिचे नखरे सहन केले
तिने नाचवले तशी नाचले

तिनेच एकदा न येऊन सांगितले गुपित
आई होशील आता गर्भ रुजलाय कुशीत
तेवढाच काय तो दुरावा बारा महिन्यांचा
पण नंतर आलीच परत भाग होऊन आयुष्याचा

इतकी वर्षे चाललेय तिच्या सोबत
कधी कंटाळा दाखवला नाही
आता मात्र काय झालेय तिचे
मनातलं काही सांगत नाही
नसलं मनात तर येत नाही दोन दोन महिने
मी मात्र सैरभैर तिच्या न येण्याने
कशासाठी ही चिडचिड कोणालाच कळत नाही
कशासाठी ही कासावीशी माझे मला वळत नाही

कधीमधी येत राहून ती मला चिडवणार
तिच्याच मनासारखे वागून ती मला ताटकळवणार

ती यायला लागली तेव्हा सोहळा केला होता आईने
तिच्या जाण्याची हुरहुर मात्र सोसतेय मी एकटीने

एक वेळ अशी येईल तिचे येणे बंद होईल
एक कप्पा आयुष्यातला कायमचा दूर होईल
होईन मी मुक्त बांधिलकीतून म्हणून वाजवावीशी वाटतेय टाळी
तुमचीही परिस्थिती नाही माझ्यापेक्षा वेगळी

वाचताना गालात हसाल
ही तर माझीच कहाणी म्हणाल
येते मनाने जाते मनाने ही
बंधन कसले पाठवत नाही
येताना तारुण्यपण देते
जाताना म्हातारपणाची चाहूल देते

*अशी ही एकमेव मैत्रीण खाशी,*
*जरी असल्या आपल्या बारा राशी!!* 🤗🤗🤗🤗

CP

04/01/2022

#मधुमेह अर्थ साखरेचा आजार आपल्याला जडल्यास त्याची लक्षणे ओळखून त्वरित तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या व त्यावर विशिष्ट पथ्ये पाळत उपचार घ्या.

These medicines are just for suggestion.Kindly consult homoeopath for correct medicine and dose!
03/01/2022

These medicines are just for suggestion.
Kindly consult homoeopath for correct medicine and dose!

🤔 उष्माघात टाळण्यासाठी काय करावे?सध्या राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे उन्हाची तीव्रता चांगलीच जाणवत आहे. या वाढत्‍य...
29/04/2019

🤔 उष्माघात टाळण्यासाठी काय करावे?

सध्या राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे उन्हाची तीव्रता चांगलीच जाणवत आहे. या वाढत्‍या उन्हाने नागरिक हैराण झाले आहेत. त्‍यामुळे उष्माघाताची लागण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? ते पाहुयात...

1.) डिहायड्रेशनमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे. शक्यतो फ्रिजमधले थंडगार पाणी पिणे टाळावे.

2.) नियमित सब्जा घातलेले पाणी प्या. यामुळे शरीराला थंडावा मिळत राहील.

3.) उन्हातून एसीत किंवा एसीतून लगेच उन्हात जाऊ नका. कारण शरीराला झटकन बदललेल्या तापमानाशी जुळवून घेणे कठीण जाते.

4.) गडद रंगाचे कपडे जास्त उष्णता शोषून घेतात. त्यामुळे शक्यतो फिकट रंगाचे कपडे, सूती कपडे वापरावेत.

5.) उन्हात फिरताना पांढरा स्कार्फ किंवा डोक्याला पांढरा रुमाल बांधूनच घराबाहेर पडा.

6.) दही, ताकाचा आहारात समावेश करा. तेलकट तूपकट वर्ज्य करुन हलका आहार घेत रहा.

7.) लिंबूपाणी, कोकम सरबत किंवा कैरीचे पन्हे पिण्यावर भर द्यावा.

8.) कलिंगड, ताडगोळा, खरबूज, जाम अशी फळे भरपूर खावीत. यामुळे, आरोग्याला फळांतील नैसर्गिक जीवनसत्त्वे थेट मिळतील.

शक्यतो दुपारच्या उन्हात घरा बाहेर पडणे टाळा पण जर टाळता येणार नसेल, तर किमान वरील गोष्टी दुर्लक्षित करू नका. कारण उष्माघात शरीराला आतून कमकुवत बनवतो हे लक्षात ठेवा...

जुलाब, ताप, अति थकवा असे त्रास अंगावर काढू नका... आपल्या डॉक्टरांना दाखवून घ्या...

सौजन्य ~ डॉ. हर्षदा मो. देशपांडे,
डॉ. मोहिनीराज स. देशपांडे.
शाखा १ - क्षितिज होमिओ केयर, दत्त चौक, विजय नगर - राणा प्रताप चौक रोड, सिडको, नाशिक.
शाखा २ - दीर्घायु होमिओपॅथीक क्लिनिक, निबे मोटर्स जवळ, पांडुरंग चौक जवळ, खोडे नगर, नाशिक.

10th april...                                         World HOMEOPATHY Day                        Today is not a special...
10/04/2019

10th april...

World HOMEOPATHY Day
Today is not a special day to anyone. There is no holiday , no red marks on calender .

But today is a very special day to us because its a day from where the journey started.

Dr. Hahnemann and every great legend who made sacrifices for the good of Homoeopathy are finally paying off.

Every practitioner of Homeopathy who believed in this science now having respect, fame, money and everything which is well deserved.

The patient are now much interested and satisfied with treatment and making it as a first choice of treatment. Their beliefs says all.

This is not a ordinary day....

This is a day of victory...
This is a day of sacrifice...
This is a day of begining of new era in healing...

This is World Homoeopathy Day
And...

🙏PROUD TO BE A HOMOEOPATH 🙏

Regards -
Dr. Harshada &
Dr. Mohiniraj S Deshpande...

Happy world homoeopathy day to all.....
09/04/2019

Happy world homoeopathy day to all.....

जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...~ दीर्घायु मल्टीस्पेशालिटी होमिओपॅथीक क्लिनिक व रिसर्च सेंटर...Live Long...Liv...
07/04/2019

जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

~ दीर्घायु मल्टीस्पेशालिटी होमिओपॅथीक क्लिनिक व रिसर्च सेंटर...
Live Long...
Live Healthy...

Thank you for being part of our special event. It means a lot to us..
07/04/2019

Thank you for being part of our special event. It means a lot to us..

Address

Nashik
422009

Opening Hours

Monday 11am - 2pm
Tuesday 11am - 2pm
Wednesday 11am - 2pm
Thursday 11am - 2pm
Friday 11am - 2pm
Saturday 11am - 2pm
6pm - 8pm
Sunday 6pm - 8pm

Telephone

+919403595934

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ksh*tij Multispeciality Homoeopathic Clinic & Research Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram