Dhanvantari Ayurved Speciality Clinic.

Dhanvantari Ayurved Speciality Clinic. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dhanvantari Ayurved Speciality Clinic., Medical Center, N/9/E/1/1, near State Bank ATM, Maharanapratap Chowk, New CIDCO, Nashik.

23/09/2019

| *वो जीना भी क्या जीना है यारों ?*
आजकाल ऑर्गन डोनेशन बद्दल बरेच काही बोलले जाते. जनमानसात त्याचा इतक्या प्रचंड प्रमाणात अवेअरनेस तयार झाला आहे की, बर्याच लोकांनी ऑर्गन डोनेशनचे फॉर्मही भरून दिले आहेत. ही बाब नक्कीच स्वागतार्ह आणि तितकीच कौतुकास्पदही आहे. त्यामुळे आता गरजू रुग्णांना त्याचा नक्कीच लाभ होणार आहे. ही सर्व या प्रकरणाची एक बाजू झाली. आता जरा दुसऱ्या बाजूचा विचार करू यात.
अवयव प्रत्यारोपण हे रूग्णांसाठी वरदान आहे हे आपण पाहतो. त्यामुळे पीडित रुग्णांना नवे जीवन मिळते हे खरे असले तरी ते इतके सहज आणि सोपे असते काय? अवयव प्रत्यारोपणानंतर जीवन जगण्यावर आलेले निर्बंध पाहिले तर नक्की " वो जीना भी क्या जीना है यारों " असेच म्हणावे लागेल. मानवी शरीरात कोणत्याही अवयवाचे प्रत्यारोपण केले की तो रोपण केलेला अवयव आणि रूग्णाचे शरीर यात एक संघर्ष सुरू होतो. रुग्ण शरीर त्या अवयवाला एखाद्या *फॉरीन बॉडी* प्रमाणे ट्रिट करते. त्यामुळे त्या रुग्णाची प्रतिकारशक्ती रोपित केलेल्या अवयवावर हल्ला करून त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करते. हे सर्व टाळण्यासाठी त्या रुग्णाला आयुष्यभर प्रतिकारशक्ती घटविणारी ( इम्युनो सप्रेसंट ) औषधी सेवन करावी लागतात. जी प्रतिकारशक्ती आपला विविध आजारांपासून बचाव करते ती घटल्याने विविध व्याधी होण्याची संभावना वाढते. तसे होवू नये म्हणून खाणेपिणे तसेच फिरणे या सर्वच गोष्टींवर अनेक निर्बंध येतात. म्हणजे एकूणच आयुष्य अळणी होवून जाते. मग अशा जगण्याला *क्वॉलिटी लाईफ* म्हणता येईल का?
याचा अर्थ अवयव प्रत्यारोपण करूच नये का? असा नक्कीच नाही. फारच गरज पडली तर ते गरजेचे आहे. पण ती वेळ आपणा कोणावरही येवू नये यासाठी योग्य काळजी घेतली तर ते नाही का शहाणपणाचे ठरणार? आपले अवयव आपल्याला शेवटपर्यंत चांगली सेवा देत राहावेत अशी आपण जेंव्हा अपेक्षा करतो तेंव्हा त्यांची काळजी घेणे तसेच वेळोवेळी त्यांची सर्व्हींसिंग करणेही तेवढेच गरजेचे असते. तेंव्हा मित्रांनो, थोडे सजग व्हा. निसर्गाने आपल्याला दिलेल्या या शरीराची यथायोग्य निगा राखण्याइतपत जागरुक व्हा.
निसर्गाने दिलंय हे
शरीररुपी दान
मानवा राख त्याचा
योग्य तो मान
शेवटी तात्पर्य काय तर
*_जींदगी लंबी नही बडी होनी चाहिए_* ।
डॉ. अजय गुजर.

06/06/2019

⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡
" शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी " असे एक संतवचन आहे. आपणा सर्वांना ते त्याच्या अर्थासकट ज्ञात आहे. पण त्याचे व्यापक स्वरूप मात्र आपण लक्षात घेत नाही.
कोणतेही बीज असो ते शुद्ध असले की, त्यापासून निर्माण होणारी फळे ही रसाळ आणि गोमटी असतात. या संतवचनात " " रसाळ " हा शब्द फळांसाठी योजला आहे तर " गोमटी " हा शब्द प्राणीमात्रांसाठी योजला आहे. याचाच सरळ आणि सोपा अर्थ असा होतो की, बीजांमध्ये नवनिर्मितीची क्षमता असते. हे सर्व नैसर्गिक असूनही आपण बी यांना आपल्या जीवनातून हद्दपार करायला निघालो आहोत.
बाजारात जी फळे " सिडलेस " या प्रवर्गात उपलब्ध असतात त्यांना आपण प्राधान्याने निवडतो. अन्नधान्याच्या बाबतीत तर बहुतांश मंडळी आजही अनभिज्ञ आहेत. पूर्वी शेतकरी जे अन्नधान्य शेतात पिकवित असत त्यातीलच एखादी गोणी बीयाणं म्हणून काढून ठेवत असत. परंतु सध्या मात्र त्यांना दरवर्षी बीयाणे खरेदी करावे लागते. कारण त्या बीयाणांपासून जे धान्य आपल्याला मिळते ते पुनश्च बीयाणे म्हणून वापरता येत नाही. ते धान्य अन्न म्हणून उपयोगात येत असले तरी त्यामध्ये नवनिर्मितीची क्षमता नसते. म्हणून शेतकऱ्यांना दरवर्षी नवीन बीयाणं खरेदी करावे लागते. मग मित्रांनो, थोडा विचार करा, असे धान्य, भाज्या आणि फळे खावून आपली म्हणजेच प्राणीमात्रांची फळे गोमटी कशी बरे निपजतील? अशा सर्व गोष्टी नित्य सेवन केल्यावर आपल्या शरीरात बनणाऱ्या बीजावर आणि त्याच्या नवनिर्मिती क्षमतेवर परिणाम होणार नाही काय? त्यामुळेच अलीकडे फार मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या वंध्यत्त्वाचे हे पण एक कारण असू शकते या मताशी तुम्ही सहमत आहात का?
डॉ. अजय गुजर.

07/11/2018

Have a sparkling Diwali

28/11/2017

अनेक वर्षे बदामाचा ढोल पिटल्यानंतर आता हळूच सांगितले जात आहे की, ‘बदाम खा, पण फक्त कॅलिफोर्नियाचे.’ असे काय पोषण या बदामांतून मिळत- जे आपल्याकडच्या बदामांमधून मिळत नाही? बदामांतून मिळणाऱ्या रक्तवर्धक लोहाचे प्रमाण आहे ५.०९ मि. ग्रॅ.! तर आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या तीळांतून त्याहून अधिक म्हणजे ९.३ मि. ग्रॅ. आणि हळिवांमधून तर तब्बल १०० मि. ग्रॅ. लोह मिळते.

बदामाइतकीच अत्यावश्यक मेदाम्ले कलिंगडाच्या बियांमधून मिळतात. तीळांतून तर ती अधिक संतुलित स्वरूपात मिळतात. शेंगदाण्यांमधून- ३.९० मि. ग्रॅ. आणि तीळांतून तर १२.२० मि. ग्रॅ.! हाडांना पोषक कॅल्शियम बदामांमधून मिळते २३० मि. ग्रॅ., तर तीळांमधून तब्बल १४५० मि. ग्रॅ.! महत्त्वाचं म्हणजे १०० ग्रॅम तीळ दिवसभरातून खाता येतील, पण १०० ग्रॅम बदाम खाणार कसे? आणि खाल्ले तरी पचवणार कसे? तरीही प्रत्येकाने ‘मूठभर बदाम खा!’ असे जाहिरातींमधून सांगितले जाते. मग ते तुम्हाला पचोत वा बाधोत!

अ‍ॅन अ‍ॅपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे?

हेच सफरचंदाबाबतही! प्रचारामध्ये किवी आणि सफरचंदामधून मिळणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वाच्या अलौकिक गुणांचे वर्णन केले जाते; जे बऱ्याच अंशी खरे आहे. मात्र, प्रत्यक्षात या फळांमधून ‘क’ जीवनसत्त्व (Vitamin C) किती मिळते? सफरचंदामधून मिळते केवळ एक मि. ग्रॅ.! परदेशी सफरचंदामधून जरा बरे म्हणजे दहा मि. ग्रॅ.! तर किवीमधून मिळते ६३.९६ मि. ग्रॅ. इतके.

त्या तुलनेत आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या भारतीय फळांमधून कितीतरी अधिक ‘क’ जीवनसत्त्व मिळते. जसे- चिंच १०८ मि. ग्रॅ., काजू फळ १८० मि. ग्रॅ., पेरू २१२ मि. ग्रॅ. आणि आवळा तब्बल ६०० मि. ग्रॅ.! रक्तवर्धक लोह, रक्तवाहिन्या व चेतातंतूंना पोषक मॅग्नेशियम, स्नायूंना (पर्यायाने हृदयस्नायूंना) पोषक पोटॅशिअम, रोगप्रतिकारशक्तिवर्धक आणि प्रजननक्षमतासंवर्धक जस्त वगैरे अनेक पोषक घटकांची एतद्देशीय फळांशी तुलना करता किवी व परदेशी सफरचंद भारतीय फळांसमोर उभेसुद्धा राहू शकत नाहीत.

ब्रोकोलीमधून काय मिळते?

ब्रोकोलीमधून आपल्या आरोग्याला उपकारक असे काय मिळते- जे आपल्या भाज्यांमधून मिळत नाही? कोथिंबीर (४८०० मायक्रो ग्रॅम), अळू-पान (५९२० मायक्रो ग्रॅम) आणि माठ (८३४० मायक्रो ग्रॅम) यांच्याहून पावपटीपेक्षाही कमी (६२३ मायक्रो ग्रॅम) बीटा-कॅरोटिन ब्रोकोलीमधून मिळते. रक्तनिर्मितीमध्ये आवश्यक फॉलिक अ‍ॅसिड ब्रोकोलीपेक्षा (६३ मायक्रो ग्रॅम) कितीतरी अधिक पालक, माठ व टाकळ्यामधून मिळते.

विविध जीवनसत्त्वे आणि लोह, जस्त आदी खनिजे, प्रथिने आदी सर्वच पोषक घटक पुरविण्यात ब्रोकोली भारतीय भाज्यांपेक्षा बरीच कमजोर आहे. मग लोक का खरेदी करतात ब्रोकोली? ५६ हून अधिक प्रकारच्या पालेभाज्या आणि ४४ हून अधिक प्रकारच्या फूल-फळभाज्या ज्या भारतात पिकतात, तिथल्या लोकांनी परकीय भूमीत उगवणारी, खुडल्यानंतर बर्फात साठवलेली आणि कोणतेही विशेष पोषणमूल्य न देणारी ब्रोकोलीसारखी भाजी का खावी?

भारतीयांना ओट्सची गरजच काय?

ओट्ससारखे अमेरिकेमध्ये घोडे व डुकरांचा खुराक म्हणून वापरले जाणारे धान्य कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त म्हणून खाण्याचा सल्ला दिला जातो. पण मुळात जिथे कोलेस्टेरॉलचा रक्तवाहिनी चिंचोळी होण्याशी आणि पर्यायाने हार्ट अटॅकशी संबंध शंकास्पद आहे, तिथे ओट्स का खायचे? ज्या देशात तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, जव पिकतात, त्यांनी आपल्या मातीत न पिकणारे धान्य का म्हणून खायचे? महत्त्वाचे म्हणजे ओट्समधून आपल्याकडील या धान्यांपेक्षा फार पोषक तत्त्वे मिळतात असंही नाही. ओट्सपेक्षा (३६१) अधिक आरोग्यदायी उष्मांक बाजरीतून (३८९) मिळतात. ओट्सहून (११) अधिक चोथा बाजरीमधून (११.३) मिळतो. भारतीयांना अत्यावश्यक असणारी कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आदी तत्त्वे ओट्सहून जास्त बाजरी किंवा नाचणीमधून मिळतात.

तांदळामुळे नव्हे, तर रिफाइण्ड तांदळामुळे भारतीय स्थूल होत आहेत. जे पुरवणारा अन्नपदार्थ म्हणजे आपला वरण-भात. महत्त्वाचे म्हणजे वरण-भात, दाल-रोटी, भाजी-भाकरी, दोसा-सांभार खाताना तुम्ही डाळी, भाज्या, औषधी व पाचक मसाले यांसोबत ते धान्य खाता. आणि तेही संपूर्णत: नैसर्गिक स्वरूपात.

याउलट, ओट्समधून मिळणारे पोषण एकांगी असते. ओट्स आपल्यासमोर येतात तेव्हा तो विविध कृत्रिम प्रक्रिया केलेला एक पदार्थ असतो; ज्यातून साखर, मीठ, प्रिझव्‍‌र्हेटिव्हज सुद्धा आपल्या पोटात जातात. जे विविध आजारांना आमंत्रण देऊ शकतात. आपण नाचणी, बाजरी अशा देशी धान्यांचे सेवन वाढवले तर त्यांचा खपही वाढेल आणि त्यांचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात आपला थोडा हातभार लागेल. ओट्स खाऊन अमेरिकेची भर करण्यापेक्षा हे कधीही चांगलेच. नाही का?

गुण सांगता.. दोषांचे काय?

याशिवाय अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओट्स, सीरियल्स, ऑलिव्ह तेल, किवी आदी पदार्थाचे गुण काय आहेत, याचा बराच गवगवा केला जातो. परंतु त्यांचे दोष काय, हे कधीच सांगितले जात नाही. सफरचंदाने होणारा मलावरोध आणि मलावरोधजन्य विकृती, शरीरात वाढणारे शीतत्व व शीतत्वजन्य विकार, किवीच्या आंबटपणामुळे होणारे घशाचे विकार, ओट्समुळे मंदावणारी आतडय़ाची पुर:सरण गती, पचनाचे विकार व मलावरोध, ओट्समधील फायटिक अ‍ॅसिडमुळे आतडय़ांमधून कॅल्शिअम, जस्त व लोहाच्या शोषणामध्ये येणारा अडथळा, ब्रेकफास्ट सीरियल्समुळे स्थूलत्व आणि स्थूलत्वजन्य अनेक विकृतींचा धोका, शरीरात वाढणारा कोरडेपणा व रूक्षत्वजन्य विकृती, बदामामुळे होणारी कठीण मलप्रवृत्ती, ऑलिव्ह तेलामुळे होऊ शकणारे पित्तविकार- या सर्व आरोग्यसंकटांकडे भारतीयांनी काणाडोळा करावा काय?

आपल्या उत्पादनांचे ढोल पिटताना या अन्नपदार्थाचे हे आरोग्यधोके का सांगितले जात नाहीत?

त्याला आर्थिक पैलूसुद्धा आहे. २०१५-१६ या वर्षांत परदेशी सफरचंदे खरेदी करण्यासाठी भारताला तब्बल १७५५ कोटी रुपये मोजावे लागले. या वर्षी ऑलिव्ह तेलाची भारताची खरेदी १३,५०० टनांवर जाईल अशी अपेक्षा आहे. ऑलिव्ह तेलाच्या लीटरमागे अगदी वीस टक्के- म्हणजे २०० रुपये फायदा आहे असे गृहीत धरले तरी १३,५०० टन तेल विकले गेल्यास दोन अब्ज सातशे कोटी रु. इतका फायदा विक्रेत्यांना होईल.

आजमितीस भारतीयांना एक कोटी १७ लाख टन खाद्यतेल लागते. त्यातला केवळ ०.१ टक्क्याहून कमी वाटा ऑलिव्ह तेलाचा आहे; जो वाढविण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले जात आहेत. भारतीयांना ज्याची गरज नाही अशा ऑलिव्ह तेलाचा आपल्या खाद्यतेलांच्या सेवनातील हा वाटा जर दहा टक्क्यांवर गेला तर परकीय देशांना त्यातून होणाऱ्या नफ्याचा आकडा किती प्रचंड असेल याची कल्पनाच केलेली बरी.

सकाळचा नाश्ता, रोजच्या जेवणासाठी लागणारे खाद्यतेल, जेवणातील प्रमुख धान्य, भाजी, फळे, सुकामेवा असे सगळेच अन्नपदार्थ जर आपण अमेरिका व युरोपमधून आयात करणार असू, तर त्याचा आपल्या देशाचा आर्थिक ताळेबंद आणि एकंदर अर्थिक स्थैर्यावर काय व किती विपरीत बोजा पडेल याची कल्पनासुद्धा करता येणार नाही. परकीय खाद्यान्नातून देशाचे होणारे हे अर्थिक नुकसान व भारतीयांच्या आरोग्याला संभवणारे धोके समाजासमोर येणे म्हणूनच अगत्याचे आहे.

आज जग जवळ आले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांतील अन्नपदार्थाचा चवीमध्ये बदल म्हणून आनंद घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र, तो आपल्या नित्य सेवनाचा आहार बनला तर आरोग्याची पार वासलात लागेल, हे नक्की. आयुर्वेदानुसार, जो आहार देशसात्म्य आहे- अर्थात निसर्गत: तुमच्या प्रदेशामधील आहे, तोच तुमच्या आरोग्याला अनुकूल आहे. आपल्या गुणसूत्रांना सर्वस्वी परक्या प्रदेशांमध्ये पिकलेले अन्नपदार्थ आपल्या आरोग्याला पूरक होण्याची शक्यता नाहीच; उलट, ते बाधक ठरेल. तसेच विविध आजारांनाही कारणीभूत ठरेल.

आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा की, याच पाश्चात्त्यांनी आपल्या बापजाद्यांना लाल तांदूळ सोडून पांढरा, रिफाइण्ड तांदूळ खायला शिकवले; जे आता पांढरा तांदूळ आरोग्याला कसा घातक आहे, हे पटवून लाल तांदळाचे गुणगान गाऊ लागले आहेत. याच पाश्चात्त्यांनी दातांवर मिठाचे मंजन करणाऱ्या आपल्या पूर्वजांना अडाणी ठरवून टुथपेस्टने दात घासायला शिकवले. आणि आता त्याच टुथपेस्टमध्ये मीठ आहे का, म्हणून विचारताहेत.

यांनीच आपल्या मागच्या दोन पिढय़ांना वनस्पती घी खायला घालून रोगी बनवले आणि नंतर वनस्पती घी कसे घातक आहे, ते सांगू लागले. यांनीच खोबरेल तेलामुळे कोलेस्टेरॉलचा व हार्ट अटॅकचा धोका बळावतो असे सांगितले; आणि आज तेच खोबरेल तेलाचे प्राशन कसे दीर्घायुष्य देते, हे सांगत आहेत. यांनीच गूळ खाल्ल्यामुळे कृमी होतात, असे सांगून भारतीयांना साखरेची चटक लावली; आणि आता साखरेमुळेच अनेक रोग होतात, असे ते म्हणू लागले आहेत. ज्या पाश्चात्त्यांची आहारासंबंधीची मते हरघडी बदलत असतात, त्यांच्या सल्ल्यावर, आहारावर विश्वास ठेवायचा कसा? तोही आयुर्वेदासारखी संपन्न आरोग्य परंपरा व समृद्ध आहार-संस्कृती ज्यांना लाभली आहे त्या देशवासीयांनी?

10/11/2017

नमस्कार मित्रांनो,
सर्वप्रथम आपणा सर्वांना हेमंत ऋतूच्या शुभेच्छा.
आपली भारतीय संस्कृती खरोखरच खूप अवर्णनीय आहे.
पूर्वीच्या काळी आपल्या देशात शिक्षणाचा फारसा प्रसार नव्हता तरी देखील बऱ्याचशा गोष्टी धार्मिक तसेच सणांचे विविध उपक्रम या सदराखाली लोकांच्या अंगवळणी पडतील अशी त्यांची योग्यप्रकारे रचना आपल्या संस्कृतीने करून ठेवली आहे. आरोग्यासंबंधीच्या काही गोष्टी ज्यांना आपण आता हेल्दी टीप्स म्हणतो त्यासुद्धा याच पद्धतीने जनसामान्यांच्या सवयीच्या करून ठेवल्या आहेत. परंतू दु:ख या गोष्टीचे वाटते की, आधुनिकीकरणाच्या नावाखाली आपण आपल्याच चांगल्या गोष्टींना तिलांजली देत आहोत.
एका उदाहरणाने ही वस्तुस्थिती आपण समजून घेवू.
दीपावली हा आपल्या हिंदू संस्कृतीमधला सर्वात मोठा सण आहे. आपण सर्वच जण हा सण बऱ्यापैकी एंजॉय करत असतो. या उत्सवातील एक दिवस म्हणजे " नरक चतुर्दशी". या दिवशी आपण सर्वच जण पहाटे लवकर उठून अभ्यन्ग स्नान करत असतो. सुर्योदयापूर्वी सुवासिक तेलाने सर्वांगाचे स्नेहन करून नंतर सुवासिक उटण्याने स्नान केले नाही तर आपण नरकात जातो अशी जनमाणसात मान्यता आहे. आता ही गोष्ट खऱ्या अर्थाने साक्षर लोकांच्या पचनी पडणे शक्यच नाही. मग आपल्या पूर्वजान्नी असे का म्हटले असेल असा प्रश्न नक्कीच मनात येतो. थोडा सखोल विचार केला तर त्याचे उत्तरही मिळते. आता अभ्यंग स्नानाचाच विचार करून आपण पुढे जावू. दीपावली सोबतच थंडीची चाहूल लागायला सुरुवात होत असते. हिवाळा म्हटला की, आजकालची बाजारपेठ गरम कपडे आणि कोल्ड क्रिम्स, बॉडी मॉइस्चराइझर्स आदी गोष्टींनी सजायला लागते कारण थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर्ससारख्या गरम कपड्यांची आणि त्वचेच्या रुक्षतेपासून बचाव करण्यासाठी बॉडी लोशंस सारख्या गोष्टींची आवश्यकता आपल्याला असते. थंडीच्या दिवसात आपली त्वचा कोरडी पडत असल्यामुळे त्वचेला अतिरिक्त स्निग्धता मिळण्याची आवश्यकता असते अन्यथा विविध त्वचाविकार होण्याची शक्यता असते. ते होवू नये म्हणून आणि पूर्वीच्या काळी सहज उपलब्ध असलेला स्निग्ध असा पदार्थ म्हणजे तेल म्हणून अभ्यंगासाठी तेल असा निर्देश आपल्या आप्त मंडळींनी आपल्याला दिलेला आहे. थंडीच्या पूर्णच कालखंडात आपली त्वचा रुक्ष राहात असल्यामुळे संपूर्ण सिझन स्नेहन करणे संयुक्तीक असते. त्याची सुरुवात नरक चतुर्दशीपासून करावी ही त्यातील अपेक्षा. मग ही आरोग्याशी निगडीत गोष्ट अगदी निरक्षर लोकांच्याही गळी उतरावी म्हणून नरकाचा बागुलबुवा.
मित्रांनो, विविध बॉडी लोशन्स वापरू नका असे मला म्हणायचे नाहीये. पण चांगले काय असे जर मला कोणी विचारले तर माझे उत्तर असेल ----------- स्नेहन.
कारण स्नेहनाने ( अंगाला तेल लावून मसाज केल्याने) केवळ त्वचेचे मॉइस्चरायझिंगच होत नाही तर तिचे एकूणच आरोग्य सुधारून ती अधिकाधिक व्याधीक्षम होण्यास मदत होते. आपण सर्वांनीही या गोष्टीमागील शास्त्रीय गाभा लक्षात घ्यावा आणि ही हेल्दी टीप आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.
शुभं भवतू |

19/09/2017

दरवर्षी पावसाळ्यात विविध रानभाज्या आपल्या आसपास उगवलेल्या आढळून येतात. या भाज्या चवीला रुचकर असतातच; तसेच त्या पौष्टिक आणि औषधीसुद्धा असतात. अशाच काही रानभाज्यांची माहिती आज आपण पाहू
टाकळा :
- ही वनस्पती पावसाळ्यात उगवते व ऑक्टोवर ते डिसेंबर या कालावधीत तिला फुले येतात.
- टाकळा ह्या वनस्पतीला उग्र वास किंवा दुर्गंधी असला तरी टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात.
- टाकळ्याच्या पानांची भाजी सर्व प्रकारच्या त्वचारोगात देतात तर त्याच्या बिया वाटून लेप त्वचेवर लावतात.
- तसेच भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते.

आंबुशी :
- पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला आंबुशी ही नाजूक वनस्पती उगवलेली पाहावयास मिळते.
- ही महाराष्ट्रात सर्वत्र आढळते.
- आंबुशी गुणाने रूक्ष व उष्ण आहे. ही वनस्पती पचनास हलकी असून, भूक वाढीसाठी उपयुक्त आहे
- तसेच कफ, वात आणि मूळव्याध यात आंबुशी गुणकारी आहे

मायाळू :
- मायाळू ही बहुवर्षायू वेल असून, या वनस्पतीची बागेत, अंगणात, परसात तसेच कुंडीत लागवड करतात.
- मायाळूचे वेल कोेकणात सर्वत्र आढळतात.
- मायाळूची कोवळी पाने भाजीसाठी वापरतात.
- रक्ताची किंवा पित्ताची उष्णता अतिशय वाढल्यास मायाळूची भाजी देतात.
- गुणधर्माने ही भाजी थंड स्वरूपाची आहे.
- मायाळूची भाजी पालकाप्रमाणे जिरण्यास हलकी आहे.

करटोली :
- करटोलीची वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम घाट व पश्‍चिम महाराष्ट्र परिसरात आढळतात.
- करटोलीला जून ते ऑगस्ट महिन्यात फुले व त्यानंतर फळे तयार होतात.
- करटोलीच्या फळांची भाजी कारल्यासारखीच असून, पावसाळ्याच्या अखेरीस ही भाजी बाजारात काही ठिकाणी येते.
- करटोली हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.

कपाळफोडी :
- ही वेलवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळते.
- या वनस्पतीची वेल महाराष्ट्रातील जंगले, शेत आणि ग्रामीण भागात आढळते.
- सांधेसुजीवर पंचांग पाण्यात किंवा दुधात वाटतात व लेप करतात. यामुळे ठणका कमी होतो व सूज उतरते.
- कानदुखीत तसेच कानफुटीत कानात घालतात. यामुळे कानदुखी थांबते म्हणूनच या वनस्पतीला कानफुटी असेही नाव आहे.

शेवळा :
- शेवळा ही वर्षायू, कंदवर्गीय वनस्पती आहे.
- महाराष्ट्रामध्ये शेवळा वनस्पती कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र व अकोला येथील जंगलात आढळते.
- शेवळ्याचा कंद औषधात वापरतात. याच्या कंदाची पाने दूध आणि साखरेबरोबर वाजीकरणासाठी देतात.
- शेवळ्याचे कंद व कोवळी पाने भाजीसाठी वापरतात.

मोरशेंड :
- ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती पावसाळ्यात सर्वत्र आढळते.
- शेतात, जंगल परिसरात, रस्त्यांच्या कडेने, ओसाड पडीक जमिनीवर, गावांत, गावाबाहेर सर्वत्र वाढलेली आढळते.
- मोरशेंड वनस्पतीच्या कोवळ्या पानांची भाजी करतात.
- या भाजीच्या सेवनामुळे रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण कमी होऊन सांध्यांची सूज कमी होते.

नळीची भाजी :
- नळीची भाजी ही वनस्पती तळी व तलावांच्या शेजारी, काठांवर, पाणथळ, ओलसर जमिनीवर, दलदलीच्या ठिकाणी वाढलेली आढळते.
- महाराष्ट्रात ही वनस्पती सर्वत्र आढळते. या वनस्पतीचे वेल जमिनीवर पसरत वाढतात.
- नागिणीच्या उपचारात ही वनस्पती वापरली जाते. तसेच कावीळ, श्‍वासनलिका दाह व यकृतविकारात या वनस्पतीचा वापर करतात.

आघाडा :
- आघाडा ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात जंगलात, ओसाड, पडीक जमिनीवर, रस्त्यांच्या कडेने, शेतात सर्वत्र आढळते.
- प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय प्रदेशात भारतात, महाराष्ट्रात सर्वत्र ही वनस्पती आढळते.
- या वनस्पतीची मुळे, पाने, फुले, फळे (पंचांग) औषधात वापरतात.
- अंगातील जास्त चरबी कमी होण्यासाठी आघाड्याच्या बिया उपयुक्त आहेत.
- जेवण्यापूर्वी आघाड्याचा काढा दिल्यास पाचक रस वाढतो, तर जेवणानंतर दिल्यास आम्लता कमी होते.
- रातांधळेपणात आघाड्याच्या मुळाचे चूर्ण देतात.

भुईआवळी :
- भुईआवळी ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून, 20 ते 50 सें.मी.पर्यंत उंच वाढते.
- भुईआवळी ही वनस्पती "इफोरबिऐसी' कुळातील म्हणजेच एरंडाच्या कुळातील आहे.
- याची पाने, कोवळी खोडे व फांद्या भाजी करण्यासाठी वापरतात.
- फ्ल्यूसारख्या थंडी-तापाच्या आजारात, तसेच वरचेवर सर्दी-खोकला, ताप येणे अशा लक्षणांत ही भाजी नियमितपणे खावी.

Old is always gold.
19/09/2017

Old is always gold.

19/09/2017

Hello friends,
Welcome to my page. With this page I will share my views and tips related to health. I take this opportunity to request you to react on my posts or activities. Your suggestions are also welcome.
Dr. Ajay Gujar.

Address

N/9/E/1/1, Near State Bank ATM, Maharanapratap Chowk, New CIDCO
Nashik
422009

Telephone

+919420594225

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhanvantari Ayurved Speciality Clinic. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dhanvantari Ayurved Speciality Clinic.:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category