21/11/2025
नवी मुंबईतील वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. सकाळी थंडी, दुपारी ऊन आणि रात्री थंडी प्रदूषण याचा त्रास अस्थमाच्या रुग्णांना होत आहे. वातावरणातील बदलामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे, छातीत कफ होणे, या प्रकारचा त्रास अस्थमाच्या रुग्णांना होतो. त्यामुळे बरेच दिवस खोकल्याचा त्रास कमी न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
डॉ. प्रतीक तांबे, फिजिशियन