DAPCU Osmanabad

DAPCU Osmanabad National AIDS Control Programme (DAPCU)

26/03/2018
राज्यस्तरीय अधिकारी मंडळ जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे भेट देणार आहे, त्या निमित्त रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचार...
16/09/2016

राज्यस्तरीय अधिकारी मंडळ जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे भेट देणार आहे, त्या निमित्त रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सकाळी ७ : ३० ते ९:०० पर्यंत श्रम दान केले व डॉ माले सर यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयीन परिसर स्वच्छ केला.

जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण समिती, उस्मानाबाद ची बैठक श्री उद्धव घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आज दि ७ जुलै २०१६ रोजी...
07/07/2016

जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण समिती, उस्मानाबाद ची बैठक श्री उद्धव घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आज दि ७ जुलै २०१६ रोजी पार पडली. या बैठकीस अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे, डॉ वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ कुलदीप मिटकरी, जिल्हा माता बाळ संगोपन अधिकारी, डॉ शिवाजी फुलारी, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ सुरेश करंजकर, आरएमओ, डॉ आनंद सोपल, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा स ), डॉ राहुल वाघमारे, वैद्यकीय अधीक्षक, स्त्री रुग्णालय, उस्मानाबाद, श्री शेळके, महिला बालकल्याण पर्यवेक्षक, शिक्षण अधिकारी, श्री गणेश काकडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (डापकु), श्री महादेव शिनगारे, जिल्हा पर्यवेक्षक, (डापकु) आदी उपस्थित होते.

☝ एकच लक्ष-२ कोटी वृक्ष ☝ एकच लक्ष-२ कोटी वृक्षवृक्ष वल्ली आम्हां सोयरीं -संत तुकाराम ( lyrics )वृक्ष वल्ली आम्हां सोयरी...
29/06/2016

☝ एकच लक्ष-२ कोटी वृक्ष
☝ एकच लक्ष-२ कोटी वृक्ष

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं -संत तुकाराम ( lyrics )

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ।।

येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ।।

आकाश मंडप पृथुवी आसन ।
रमे तेथें मन क्रीडा करी ।।

कंथाकुमंडलु देहउपचारा ।
जाणवितो वारा अवसरु ।।

हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
करोनि प्रकार सेवूं रुची ।।

तुका म्हणे होय मनासी संवाद ।
आपुला चि वाद आपणांसी ।।

-संत तुकाराम

वृक्ष प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.
सारे वृक्ष माझे बांधव आहेत.
त्या कोटी कोटी वृक्षांवर माझे प्रेम आहे.

या सृष्टीतील विविध वृक्षांचा मला अभिमान आहे. 🌿🌱🌴🌳🌲🎄🌾या वृक्षांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून...

"१जुलै,२०१६रोजी"

मी माझ्या अंगणात, मोकळ्या जागेत, शाळेच्या आवारात, रस्त्याच्या कडेला, गायरानात, गावठाणात...
वृक्ष लागवड 🌳करील आणि त्या प्रत्येक वृक्षाचे संरक्षण करील.

मी व माझे वृक्षप्रेमी बांधव यांच्या सहकार्याने राज्यामध्ये २कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम यशस्वी करण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.

वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन यातच माझे हित सामावले आहे.

☝ एकच लक्ष-२ कोटी वृक्ष

आज दि. १४ जून २०१६ जागतिक रक्त दाता दिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे  गेल्या अनेक वर्षा पासून जिल्हा...
23/06/2016

आज दि. १४ जून २०१६ जागतिक रक्त दाता दिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे गेल्या अनेक वर्षा पासून जिल्हा रुग्णालयातील रक्त पेढीस अविरतपणे रक्त दान करणाऱ्या रक्तदात्यांचे आणि रक्त दान शिबिराचे आयोजक यांचा रक्त पेढी, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद मार्फत भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद, डॉ . धंनजय पाटील, अति. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद, डॉ सचिन देशमुख, वैद्यकीय अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी, डॉ भास्कर साबळे, रक्त संक्रमण अधिकारी, श्री गणेश काकडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, डापकू (HIV) विभाग, जि. रु. उस्मानाबाद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री संतोष पोतदार, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, जि. रु. उस्मानाबाद यांनी केले. सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

आज दि. २१ जून २०१६ आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी...
21/06/2016

आज दि. २१ जून २०१६ आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फुर्त पणे योग प्राणायाम करून योगदिन साजरा केला. या कार्यक्रमाचे उद्घाटन उस्मानाबाद चे निवासी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद यांनी योगा या वर सविस्तर माहिती दिली. यावेळी डॉ. राहुल वाघमारे, वैद्यकीय अधीक्षक, स्त्री रुग्णालय, उस्मानाबाद, डॉ सचिन देशमुख, वैद्यकीय अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी, मेट्रॉन श्रीमती शेख, डॉ. पल्लवी कोठाळकर, आयुष विभाग प्रमुख, जि. रु. उस्मानाबाद, श्री गणेश काकडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, डापकू (HIV) विभाग, जि. रु. उस्मानाबाद, श्री अविनाश धरणे, लेख लिपिक, जि. रु. उस्मानाबाद, श्री दिनेश शिंदे, NCD विभाग, जि. रु. उस्मानाबाद, उपस्थित होते. सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

जागतिक रक्तदाता दिन कार्यक्रम (१४ जून २०१६)उस्मानाबाद :येथील जिल्हा रुग्णालयात मंगळवारी जागतिक रक्तदाता  दिनानिमित्त रक्...
18/06/2016

जागतिक रक्तदाता दिन कार्यक्रम (१४ जून २०१६)
उस्मानाबाद :येथील जिल्हा रुग्णालयात मंगळवारी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यात १३ दात्यांनी सहभाग नोंदविला.याचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एकनाथ माले यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.माले यांनी रक्तदानाचे महत्त्व विषद करून रक्तदान करण्याचे आवाहन केले.तसेच उपस्थितांपैकी काही महिलांनी आपल्या कुटुंबांतील व्यक्तींनी केलेल्या रक्तदानाबद्दलचे अनुभव कथन केले.यावेळी सदर महिलांसह रक्तदात्यांचाही डॉ माले, डॉ.देशपांडे, डॉ.धुमाळ, डॉ.भास्कर साबळे, डॉ.सौ .दापके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे आज दि ३१ मे २०१६ रोजी सकाळी १०:०० वा.  राजमाता पुण्यश्लोक रणरागिणी अहिल्यादेवी होळकर या...
31/05/2016

जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे आज दि ३१ मे २०१६ रोजी सकाळी १०:०० वा. राजमाता पुण्यश्लोक रणरागिणी अहिल्यादेवी होळकर यांची २९१ वी जंयती साजरी करण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांतजी नारनवरे यांचे हस्ते राजमाता पुण्यश्लोक रणरागिणी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून साजरी करण्यात आली. या वेळी व्यासपीठावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, वैद्यकीय अधीक्षक (स्त्री रुग्णालय) डॉ. राहुल वाघमारे, सहाय्यक मेट्रन श्रीमती शेख आणि जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
ती सत्ताधारी होती,पण ती सिंहासनावर नव्हती...ती राजकारणी होती, पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हत...ती पेशव्यांशी निष्ठावंत होती...पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती...ती व्रतस्थ होती, पण ती संन्यासिनी नव्हती...जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता,हुकमत हा सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा-तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले... तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछ्त्रे, धर्मशाळांचे रुप घेतले...तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरामंदिरांतून घुमले...मात्र ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती...तिला माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या...
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना मानाचा मुजरा....!
इतिहासावर स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटविणा-या `महाराणी' - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
अहिल्याबाई होळकर किंवा अहिल्यादेवी होळकर (इ.स. १७२५ ते इ.स. १७९५) या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत. त्यांना पुण्यश्लोक या पदवीने संबोधित करण्यात येते. कारण त्यांनी केलेले सामाजिक कार्य आजही अनेकांसाठी आदर्शवत असेच ठरले आहे. घरचा आणि राज्याचा कारभार पाहण्यात हुशार असलेल्या अहिल्याबाई होळकरांचे साम्राज्य मध्यप्रदेशात असले तरी त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. धनगर असलेले माणकोजी शिंदे-पाटील यांची अहिल्या नावाची ही मुलगी लहानपणापासूनच धाडसी होती. तसेच राज्यकर्त्यांना आवश्यक असणारे सर्व गुण तिच्याजवळ लहानपणापासूनच होते.
बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षांच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले. अहिल्यादेवीचे पती खंडेराव होळकर यांचे सन १७५४ मध्ये, कुम्हेरच्या लढाईत निधन झाले. १२ वर्षांनंतर, तिचे सासरे मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. अहिल्यादेवीने आपल्या साम्राज्याचे तुंगांपासून रक्षण केले. त्यांनी लढाईत स्वत: सैन्याचे नेतृत्व केले आणि अनेक लढाया जिंकल्या. त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. त्या न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या, परराज्याशी सलोख्याचे संबध रहावे म्हणून त्यांनी पंधरा राज्यात आपले वकील नेमले होते.इतर राज्यातील नऊ वकील होळकर राज्याच्या दरबारात होते. मातोश्री अहिल्याबाईंनी निर्माण केलेल्या प्रशासन व्यवस्थेत प्रजेची उन्नती व विकास, सामाजीक शांतता, सुव्यवस्था,समता व ममत्व, न्याय, स्वातंञ्य या मुलभूत मानवी मूल्यांचा प्रत्यक्ष आस्वाद त्या काळात जनता घेत होती, हे आजच्या प्रशासनाला फार मोठे आव्हान होते.
अहिल्यादेवी होळकर या होळकर घराण्याच्या. होळकर घराणे हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील सातारा जिह्यातील फलटण तालुक्यातील होळ या गावचे. घराण्याचे मूळपुरुष मल्हारराव होळकर यांना छत्रपतींनी माळवा प्रांताची सुभेदारी दिली. त्यांनी इंदौर संस्थानाची स्थापना केली. याच घराण्यातील पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर स्वतचे राज्य स्वबळावर मिळवून राज्यभिषेक करून घेणारा एकमेव राजा `महाराजा यशवंतराजे होळकर'. तसेच भारतामध्ये रेल्वे चालू करण्यासाठी ब्रिटीशांना कर्ज देणारे तुकोजीराजे होळकर हे याच घराण्यातले. दिल्लीतील `रायसीना' हा भूभाग होळकरांच्या अधिपत्याखाली होता. याच रायसीना ग्राममध्ये `होळकर उद्यान' होते. आज याच `रायसीना होळकर इस्टेट'मध्ये आपल्या देशाचे राष्ट्रपती भवन, संसद भवन, केंद्रीय सचिवालय आदी भव्य वास्तू दिमाखाने उभ्या आहेत. प्रजासत्ताक दिनादिवशी राष्ट्रपती भवनावरती `होळकरांचा राजेशाही झेंडा' डौलाने फडकतो. तसेच राष्ट्रपतींच्या आगमन प्रसंगी प्रथम येणारे घोडदळ होळकरांचा राजेशाही झेंडा डौलाने मिरवत आणते. होळकरशाहीचे एकूण २२० वर्षे २२ दिवस राज्य होते. या दरम्यान होळकर घराण्याचे महापराक्रमी, रणझुंजार, शूर दानशूर, कर्तव्यतत्पर, रणसम्राट १४ राजे-महाराजे होऊन गेले. आणि त्यानंतर १६ जून १९४८ साली होळकरशाहीचे भारत देशात विलीनीकरण झाले.
मराठ्यांच्या इतिहासात अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले. त्यामधील होळकर घराण्यातील अहिल्याबाईंचे नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे. माळवा प्रांताचा कारभार त्यांनी बांधला. त्या मल्हारराव होळकरांच्या सून होत. मुलाचे मृत्यूनंतर मल्हाररावांनी त्यांना सती जाऊ दिले नाही. यानंतर अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकाळात सती परंपरा व हुंडाबळी परंपरा बंद केल्या. स्त्री असूनही तिच्यात अहंकाराची भावना मुळीच नव्हती. विलक्षण धर्मवेडा बरोबरच त्यांच्यात परधर्म सहिष्णुता होती. पराकाष्ठेचा धर्मभोळेपणा असूनही आपल्या प्रजेच्या कल्याणाखेरीज दुसरे विचार मनाला शिवू दिले नाहीत.
जगात राण्या-महाराण्या झाल्या असल्या तरी त्या शेवटी कर्तृत्वाने म्हणा कि कोणा महाराजाची पत्नी होती म्हणून म्हणा प्रसिद्ध आहेत आणि त्या इतिहासावर स्वतःचा असा स्वतंत्र ठसा उमटवू शकलेल्या नाहीत. याला जगात अपवाद असणारी एकमेव महाराणी म्हणजे अहिल्यादेवी होळकर. यात कसलीही अतिशयोक्ती नाही. होळकर घराण्याचा कट्टर शत्रू माल्कम आपल्या मध्यप्रदेशातील आठवणींत म्हणतो, यसर्व प्रकारच्या मर्यादा पेशव्यांपासून ते हिंदू सनातन्यांनी घातलेल्या असूनही अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीने २८ वर्षे प्रजेच्या हिताचे उत्कृष्ट प्रशासन केले त्याला जगात तोड सापडणार नाही. माळव्यातीलच नव्हे तर जिथे तिचा प्रत्यक्ष कारभारही नव्हता अशा हिंदुस्थानातील सर्वच प्रजा तिला दैवी अवतार मानायची. याचे कारण म्हणजे अहिल्याबाईंची प्रजानिष्ठा, आत्मशुद्धता आणि सर्वांच्या कल्याणासाठीची अविरत धडपड होय!ङ्क
अहिल्यादेवी होळकर यांनी भारतभरात अनेक मंदिरे, घाट बांधले वा त्यांचा जीर्णोद्धार केला. महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यात द्वारका, गुजरात, काशी, वाराणसी, उज्जैन, जगन्नाथपुरी, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, बद्रीकेदार, नाशिक व परळी वैजनाथ, जेजुरी खंडोबा तसेच अनेक जोतिर्लिंग यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने उध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. त्यांच्या स्मरणार्थ, इंदौर विद्यापीठास त्यांचे नाव दिलेले आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना भारताच्या `कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट' म्हणून ओळखतात. (१७२५ - १७९५, राज्य कालावधी १७६७-१७९५). अहिल्यादेवी होळकर ह्या भारताची, माळवा साम्राज्याची, होळकर घराण्याची तत्वज्ञानी राणी म्हणून ओळखली जाते
अशा थोर समाजसुधारक, प्रजानिष्ठा, उत्कृष्ट प्रशासन, तत्वज्ञानी, शूर, दानशूर, महापराक्रमी, महाराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी अभिवादन !
या महाराष्ट्राच्या पवित्र मातीत जन्म घेऊन, अवघ्या भारतीय उपखंडावर सलग २८ वर्षे लोककल्याणकारी राज्य चालवलेल्या विश्वरत्न राष्ट्रमाता, लोकमाता, राजमाता, पुण्यश्लोक, रणरागिणी अहिल्यादेवी होळकर यांना २९१ व्या जंयतीनिमित्त त्रिवार वंदन व सर्वांना कोटी-कोटी शुभेच्छा !!!

"भारत स्वच्छता अभियान" अंतर्गत डापकू कार्यालयाची अंतर्गत व परिसर स्वच्छता आज रोजी दि २६ मे २०१६ सकाळी करण्यात आली.
26/05/2016

"भारत स्वच्छता अभियान" अंतर्गत डापकू कार्यालयाची अंतर्गत व परिसर स्वच्छता आज रोजी दि २६ मे २०१६ सकाळी करण्यात आली.

मा. जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांच्या अध्यक्षेतेखाली नार्सिंग स्कूल, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे  दि. 30 मार्च 2016 ...
30/03/2016

मा. जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांच्या अध्यक्षेतेखाली नार्सिंग स्कूल, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे दि. 30 मार्च 2016 रोजी 4:00 PM वा. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिति बैठक पार पडली. या वेळी सदस्य सचिव तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एकनाथ माले सर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राधाकिशन पवार, ACS डॉ सुरेश करंजकर व डॉ धनंजय पाटील, ADHO डॉ शिवाजी फुलारी, DRCHO डॉ कुलदीप मिटकरी, ARTC नोडल ऑफिसर डॉ सुजितकुमार रणदिवे, जिल्हा क्षय रोग अधिकारी डॉ टी एन गोमसले,
शिक्षाण अधिकारी श्री जोशी, माहिती अधिकारी श्री दीपक चव्हाण, DPM डॉ नागेश गाडेकर, डेपो श्री गणेश काकडे, ART MO डॉ जाधव एच जि, जिल्हा पर्यवेक्षक श्री महादेव शिनगारे, सुजित जाधव इ सदस्य उपस्थित होते.

15/03/2016

लग्न आधी एचआयव्ही टेस्ट करावी

लग्न आधी एचआयव्ही टेस्ट करावी
15/03/2016

लग्न आधी एचआयव्ही टेस्ट करावी

Address

Marwad Galli, Civil Hospital
Osmanabad
413501

Alerts

Be the first to know and let us send you an email when DAPCU Osmanabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to DAPCU Osmanabad:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram