30/08/2019
स्व. वैद्यराज बंडु धनराज पाटील फाऊंडेशन तर्फे कोल्हापुर, सांगली येथील पूरग्रस्तांना आर्थिक मदत
पाचोरा ✒ प्रतिनिधी
येथील स्व. वैद्यराज बंडु धनराज पाटील फाऊंडेशन तर्फे कोल्हापुर, सांगली येथे पावसाने घातलेल्या थैमानात अनेक घरची घर उध्वस्त झाली आहेत. अनेक परिवारांचे संसार उपयोगी वस्तु पुरात वाहून गेले आहेत. तर काही नागरिकांचा यात दुर्दैवी मृत्यू ही झाला आहे. त्यांचे कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी स्व. वैद्यराज बंडु धनराज फाऊंडेशन ने संचालक मंडळाची बैठक घेतली. या बैठकीस फाऊंडेशनचे अध्यक्ष सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णु बी. पाटील, सचिव डॉ. अविनाश पाटील, सदस्या विद्या मनोज पाटील, सुनिता अविनाश पाटील, गं.भा. विमलबाई मधुकर पाटील, अरुण नाना पाटील, गं.भा. पुष्पा वसंत पाटील हे उपस्थित होते. बैठकीत कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. मदतीच्या धनादेशाची माहिती तहसिलदार कैलास चावडे यांना देवुन सदरचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. स्व. वैद्यराज बंडु धनराज पाटील फाऊंडेशनचे परिसरात कौतुक केले जात आहे.