29/09/2020
*पलूस येथील बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वसतिगृह, कृष्णा येरळा सुत गिरणी जवळील सुसज्ज समर्पित कोविड हेल्थ सेंटर आजपासून रुग्णांच्या सेवेत*
पलूस प्रतिनिधी/
पलूस येथील अनेक दिवस झाले प्रलंबित असलेले कोविड सेंटर आज पासून रुग्णांच्या सेवेत रुजू झाले. उद्घघाटन राज्यमंत्री मा.डॉ. श्री. विश्वजीत कदम यांच्या हस्ते होणार होते परंतु कदम साहेब यांची प्रकृती ठिक नसल्याने रुग्णांची गैरसोय होऊ नये ह्या करीता स्थानिक पातळीवर उद्धघाटन करून घेण्याचे मंत्री साहेबांचे आदेश असून सदर समर्पित कोविड हेल्थ सेंटर हे सर्व सोईनी युक्त प्रशस्त १०० बेडचे हॉस्पिटल प्रशासनाच्या मदतीने पलूस येथील सूतगिरणी जवळ असणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात सुरू होत आहे. सद्यपरिस्थितीत तातडीची ५० बेडची व्यवस्था केली असून सर्व बेड्सना उपचार सुविधा सुरु करणार असून ८२ बेड्सना ऑक्सिजनची व १८ बेड्सना आयसोलेशनची सुविधा असे एकूण 100 बेड्स उपलब्ध करणार असल्याचे संबंधित डॉक्टर्स यांच्या कडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यातील इतर तालुक्यात अनेक कोविड सेंटर्स उभी राहिली असता अपवादात्मक पलूस तालुका पाठीमागे राहिला होता ही बाब राज्यमंत्री मा. डॉ. विश्वजीत कदम यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रशासनाबरोबर पलूस तालुक्यातील खासगी डॉक्टर्सना आवाहन केले होते सध्या वाढती रुग्ण संख्या,यामुळे होणारी रुग्णांची गैरसोय,त्यांच्या नातेवाईकांचे होणारे प्रचंड हाल, सामान्य लोकांची खाजगी हॉस्पिटलमध्ये जाण्याची आर्थिक क्षमता नसणे,या सर्व गोष्टींचा विचार करून पलूस मधील खाजगी डॉक्टरांनी एकत्र येऊन, प्रशासनाची मदत घेऊन सदरचे कोविड सेंटर सुरू केले आहे. सदरचे DCHC शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार व त्यांच्या सर्व अटींना अधिन राहून रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार मिळणे सहज शक्य होणार आहे.कोविड सेंटर मध्ये तज्ञ डॉक्टर्स ची टिम असणार आहे त्या बरोबर सदरचे कोविड सेंटर पलूस शहरा पासून जवळ असून प्रशस्त बिल्डिंग,पार्किंग व्यवस्था, डॉक्टर्स, सिस्टर्स,स्टाफ यांना राहायची व्यवस्था,पूर्ण हॉस्पिटलला सिक्युरिटी, सीसी टीव्ही, शुद्ध पाणी व्यवस्था,चहा नाष्टा जेवण व्यवस्था, रुग्णांना करमणुकी साठी टीव्ही, जिम, तात्काळ ॲम्बुलन्स ची व्यवस्था, रक्त लघवी तपासणीकरीता सुसज्ज प्रयोगशाळा, मेडिकल हे सर्व उपलब्ध असून डॉक्टरांच्या व रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी हॉस्पिटलला पोलिस बंदोबस्त असणार आहे समर्पित कोविड हेल्थ सेंटर चालू करण्यासाठी राज्यमंत्री मा. डॉ विश्वजीत कदम यांच्या सोबत मा. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, प्रांताधिकारी मा.श्री गणेश मरकड, तहसीलदार मा.श्री.राजेंद्र पोळ, नायब तहसीलदार मा.श्री.राजेंद्र पाटील, एक्झिक्यूटिव्ह इंजिनीयर रोकडे साहेब, पी.डब्ल्यू.डी.डेप्युटी इंजिनियर देसाई, शाखा अभियंता श्री यड्रावी आणि पलूस नगर परिषदचे मुख्याधिकारी सुमित जाधव या सर्व मान्यवरांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. श्री.अधिकराव पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रागिनी पवार यांनी सतत पाठपुरावा करून लागणाऱ्या सर्व शासकीय पूर्तता पूर्ण करून सदरचे DCHC सुरू करण्याकरिता मोलाची मदत केली आहे. त्याच बरोबर प्रशासन व खासगी डॉक्टर्स यांना एकत्रित आणत समर्पित कोविड हेल्थ सेंटर उभे करण्यासाठी विशेष प्रयत्न करीत डॉ.दिपक सरनाईक यांनी समन्वयाची भूमिका पार पाडली. सदरच्या DCHC मध्ये सेंटर प्रमुख म्हणून डॉ. किशोर पाटील(फिजिशियन) काम पाहणार आहेत. तसेच डॉ. किरण पाटील, डॉ. संग्राम जाधव, डॉ. सुशांत जगदाळे, डॉ. वर्षा भिसे, डॉ. मधुमती घुणकीकर, डॉ. मोनिका जगदाळे, डॉ. यज्ञश्री जाधव यांच्यासह 10 डॉक्टर्स काम पाहणार आहेत.
For contact:
1. Dr. Sangram Jadhav - 8600387700
2. Dr. Sushant Jagdale - 9325366270
3. Dr. Kishor Patil - 7770003366