12/04/2021
अक्कल दाढ म्हणजे काय ? आणि का असते अक्कलदाढ त्रासदायक
-------------------
तोंडात येणारी शेवटची दाढ म्हणजे अक्कल दाढ. वयाच्या १७ ते २५ वर्षांपर्यंत अक्कल दाढ तोंडात येऊ लागते. कधी कधी २५ वर्षांनंतर सुद्धा ही दाढ अचानक येऊ शकते.
अक्कलदाढांच्या त्रासाची लक्षणे
--------------------
- हिरड्या आणि गालावर सूज येणे
- तोंड पूर्ण उघडताना त्रास होणे
- तोंडातून दुर्गंधी येणे
- तोंडामध्ये घाणेरडी चव राहणे
- चावताना दात दुखणे
उपचार
-------
भारतात दहापैकी किमान एका व्यक्तीला अक्कलदाढांचा त्रास होतो. अक्कलदाढांच्या त्रासावर औषधे फारशी उपयुक्त ठरत नाहीत. योग्य पद्धतीने अक्कलदाढा काढून टाकणे हाच या त्रासावरील सर्वांत प्रभावी उपाय आहे. अक्कलदाढा काढण्याचे काम सर्वच दाताचे डॉक्टर करू शकतात. परंतु, मुख शस्त्रक्रियांमध्ये निष्णात असलेल्या डॉक्टरांकडून या दाढा काढून घेतल्यास ते अधिक फायदेशीर ठरते. अक्कलदाढा काढण्याची प्रक्रिया वेदनादायक असते. या शस्त्रक्रियेमुळे दातांवर सूजही येते. परंतु, औषधे घेतल्यानंतर दोन ते तीन दिवसांत हा त्रास कमी होतो.
Contact - Gadam Dental Clinic
02186 - 224422 / 9420304422
Kamat Plaza, Opp. Maharaja Bakery,
Old Karad Naka, Karad Road,
Pandharpur