05/03/2024
#शौच_विचार_आणि_मानसिकता...
मागील काही वर्षाच्या चिकित्सालयातील अनुभवानुसार एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती नमूद करावीशी वाटली..ती एक समस्या म्हणून सध्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे...बहुतांश पुरुष वर्गात ही गोष्ट लक्षात आली...स्त्री वर्गात कोणाला जणवली असेल तर असू शकेल ...
मनुष्य जीवन आल म्हणजे अनेक गोष्टी चा रोज चा सामना हा आलाच या सगळ्यातून जात असताना मानसिक ताण तणाव हे रोज चे आलेच ,त्या अनुषंगाने तसा विचार ही आलाच व हा विचार करण्याची काही वेळ, काळ ,स्थळ अशी निश्चित नाही,कधी ही व केव्हा ही हे विचार येत असतात,यातील सगळ्यात ज्यास्त विचार करण्याची पुरुषांची जगा म्हणाल तर ती म्हणजे शौच मार्जन करण्याचे शौच्यालय होय....पुरुष मंडळी सगळ्यात ज्यात टेन्शन,ताण तणाव या विषयी चे चिंतन ज्यास्त करून शौचालयात गेल्यावर तिथे बसून करताना दिसतात.आपल्या आजू बाजूला अश्या अनेक व्यक्ती दिसतात की त्यांचे टेन्शन,ताण तणाव वाढले की शौचाला जाण्याचे प्रमाण देखील वाढलेले दिसते,पूर्वी ही एक सवय होते पण सध्याच्या काळात हा एक शरीरिक ,व मानसिक आजार होऊन बसला आहे,अश्या व्यक्ती या वारंवार टॉयलेट च्या visit करत असताना दिसतात ,पण वेग आलेला नसताना देखील जाऊन येतो म्हणायचे व बळजबरीने होत नसताना देखील शौच करण्याचा प्रयत्न करणे ही क्रिया सातत्याने सुरु असते ,त्यामुळे शौच्या शी संबंधित,किंवा जागेशी संबंधित मूळव्यध,भगंदर,सारखे विकार कधी उद्धभवतात हे कळून देखील येत नाही....वारंवार जाऊन देखील पोट व्यवस्थित असल्याची भावना,शाश्वती असते असे नाही.कारण लक्ष पोट साफ करणे यापेक्षा डोक्यातील विचारावर अधिक केंद्रित झालेले असते...
अनेक वेळा अशी सवय असल्येला ना हृदय विकाराचा धोका संभवताना दिसतो वारंवार बळजबरीने जोर देऊन पोट साफ करण्याच्या प्रयत्नाने ह्रदयावर जोर पडून अनेकांना ह्रदय विकाराचा झटका आलेला देखील बघायला मिळतो.
काही जणांमध्ये तर असे लक्षण दिसून येते की कोणते ही काम करायचे असेल, विशेषतः प्रवासाला दूर गावी जायचे असले तरी देखील प्रवासाला निघू , निघू पर्यंत 3 ,4 वेळा तरी टॉयलेट visit करावी लागते...या मध्ये अधिक करून बैठे काम करणारे,ऑफिस वर्क करणारे,व्यवसायिक ,हे मोठ्या प्रमाणात ग्रस्त असलेले दिसून येतात
या मध्ये देखील मानसिकता हा हेतू मोठ्या प्रमाणावर दिसत असतो.
या सारख्या रुग्णा मध्ये नुसती शारिरिक चिकित्सा करून चालत नाही,तर त्या सोबत मानसिक चिकित्सा देखील महत्वाची ठरते...
#आयुर्वेदिक_उपचार_सल्ला_व_अधिक_माहितीसाठी_संपर्क_करा.
डॉ.नितीन संपतराव पाटील (आयुर्वेदाचार्य)9890056343.
दीर्घायु जीवितम आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय व संशोधन केंद्र.
यश कॉम्प्लेक्स,शॉप नं 11,सेक्टर 8,आय डी बी आय बँकेच्या जवळ ,कळंबोली,ता:-पनवेल,रायगड,नवी मुंबई.