14/10/2024
मोहटादेवीगडावर पाथर्डी निमा संघटना,श्री लक्ष्मीनृसिंह प्रतिष्ठान ,इंडो आयरीश हॉस्पिटल,नगर यांचे संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्यशिबिर संपन्न
पाथर्डी प्रतिनिधी- शारदीय नवरात्र महोत्सवात ६ व्या व ७व्या माळेच्या दिवशी मोहटादेवीगडावर उच्चांकी गर्दी असते.संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक येतात.पायी येणारे भाविक,घटी बसविलेल्या महिला भाविक यांच्यात चालण्यातून, उपवासातून येणारा अशक्तपणा, चक्कर, मळमळ ,पायाला गोळे येणे आदी तात्पुरत्या स्वरुपाचे विकार उद्भवत असतात.अशा विविध बाबींचा विचार करून पाथर्डी निमा संघटना,श्री लक्ष्मीनृसिंह प्रतिष्ठान व इंडो आयरीश हॉस्पिटल यांचे संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्यशिबिर आयोजित करण्यात आले होते.शिबिराचे उद्घाटन श्री.जगदंबादेवी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री.शशीकांत दहिफळे ,मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुरेश भणगे,लेखापाल श्री.संदीप घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यात सुमारे पाचशे रूग्णांची रक्तशर्करा, ई.सी.जी. तपासणीही करण्यात आली.रूग्णांना लागणारी औषधेही मोफत वाटण्यात आली. इंडोआयरीश हॉस्पिटल मधील डॉ दिलिप जोंधळे,डॉ प्रदिप कंठाळी,डॉ मिलिंद कोरडे, त्यांची टीम व इतर स्टाफ यांनी भाविकां- मधील गरजू रूग्णांची तपासणी केली.पाथर्डी तालुका निमा संघटना तसेच श्रीलक्ष्मीनृसिंह प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.श्रीधर देशमुख,निमाचे सचिव डॉ.सचिन गांधी,कोषाध्यक्ष डॉ.अमोल शिरसाठ, डॉ.सुहास उरणकर,व श्रीलक्ष्मी- नृसिंह प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी सदर शिबिरात सहभाग नोंदविला .मोहटादेवस्थान समिती मार्फत चहापान व भोजन व्यवस्था करण्यात आली.तसेच पाथर्डीतील श्री.लालकृष्ण पतसंस्थेचे चेअरमन श्री.अमोल गर्जे यांनी डॉक्टरांसाठी उत्तम निवास व्यवस्था ठेवली.