13/10/2021
आता सणासुदीचे दिवस येत आहेत वातावरण उत्साहाने भरून जात आहे॰
आता बहुतेक जण हौसेने आपल्या घराचे, कार्यालयाचे नूतनीकरण करतील त्यासाठी ते उत्तमोत्त्म दर्जेदार साहित्य आणि कारागीर वापरण्यावर भर देतील. त्या साठी भरपूर खर्चही करतील. त्यामुळे आपल्याला ही किती छान उत्साही वाटेल आणी आपल्या कडे येणार्यातना ही छान वाटेल !!!
सणा-वारा साठी नवीन कपडे ते तर हवेतच, आणि आपणा ते घेऊच !!!
पण त्या पेक्षा फार फार महत्वाच्या असलेल्या आपल्या स्वतःच्या शरीराच्या आणि मनाच्या नूतनीकरणाकडे कडे ही आपण लक्ष देऊ या !!!
सणाचे सेलेब्रेशन जोरदार करायचे असेल, जीवनाचा आनंद भरपूर घ्यावयाचा असेल तर आपले शरीर आणि मन उत्तम स्थितीत असलेच पाहीजे नाही का?
आपण आपल्या शरीरातील चयापचय क्रियांमुळे ज्या अशुद्धी, त्याज्य पदार्थ, Toxins, निर्माण होत असतात त्यांना नाहीसे करणे आपण नियमित पणे केले पाहिजे
आपण आपले मन, जे काळज्या चिंता भय भीती आजारपणाचे दडपण या मुळे त्रासून गेलेले आहे आणि आपले शरीर ही त्या मुळे अशक्त दुर्बल झाले आहे, त्या मनाचे आणि शरीराचे सबलीकरण आणि नूतनीकरण करून
त्या ठिकाणी आरोग्य, आनंद, शांतता कशी निर्माण करायची ते शिकले पाहिजे. आणि हे अगदी सोपे आहे.
त्या साठी आपण ब्रह्मविद्या शिकली पाहिजे आणि ब्रहमविद्येत शिकविले जाणारे श्वसनाचे आणि मनाचे सोपे व्यायाम करून अगदी कमी वेळात आणि कमी खर्चात आपण हे साध्य करू शकतो. आपले जीवन अधिक संपन्न समृद्ध आणि आरोग्य पूर्ण आणि सर्वार्थाने यशस्वी करू शकतो.