25/11/2025
ताण म्हणजे नक्की काय? ताणाची व्याख्या तरी कशी करावी? What is stress?
99% लोकांना ताण आहे पण 99% लोकांना ताण म्हणजे नक्की काय हे माहीत नाही. ज्या समस्येचे स्वरूपच नीट समजले नाही तर तिची कारणे कशी शोधावीत? अशा समस्येवर उपाय सापडणे तर अजूनच कठिण काम असते.
ताण म्हणजे नक्की काय हे जरी माहित नसले तरी ताणाचा निचरा कसा होते याची बहुतेकांना कल्पना असते. प्रेशर कुकरमध्ये प्रेशर वाढल्यावर कुकर फुटू नये म्हणून कुकरची शिट्टी होते. त्याच प्रमाणे मनातील ताण वाढत गेला की त्याचा निचरा चिडून किंवा रडून होतो आणि मनातील ताण तात्पुरता कमी होतो.
आता आपण ताणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करू. रडणे चिडणे कशामुळे होते? मनाविरूद्ध काही घडू लागले की मनुष्याचे रडणे-चिडणे सुरू होते. पण कुठलीही गोष्ट मनाविरूद्ध घडण्याआधी मनाने ती गोष्ट तशी घडावी अशी अपेक्षा केलेली असते. मनाने तशी अपेक्षाच केली नाही तर मनाविरूद्ध घडणे अशक्य आहे. म्हणजे आपल्या ताणाच्या मुळाशी आपल्याच मनाच्या अपेक्षा असतात. मनाच्या अपेक्षा पुर्ण होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली की मनामध्ये निर्माण होणाऱ्या अगतिकतेलाच ताण असे म्हणतात.
अपेक्षा ताणाच्या मुळाशी असतात. पण अपेक्षा कुठुन जन्माला येतात? How stress is directly proportional to expectations?
अपेक्षा जन्माला येतात असमाधानातून!
पण मग हे असमाधान कुठून जन्माला येते?
असमाधान जन्माला येते नकारात्मक विचारसरणी मधून! आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, इ. पैकी काहीही परिपुर्ण नाही. त्यात जशा चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईट गोष्टी ही आहेत. या दोन्हींपैकी काय पहायचे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही सर्वांना आहे. सकारात्मक गोष्टी पाहिल्या तर मन समाधानी होते. नकारात्मक गोष्टी पाहिल्या तर मनात असमाधान निर्माण होते. असे असतानाही बहुतेक वेळा आपण नकारात्मक विचार करणे स्विकारतो.
आपण आत्मघाती नकारात्मक विचार करून असमाधान आणि ताण का स्विकारतो?
याचे कारण आपल्या मेंदूतील हॕप्पी हॉर्मोन्सच्या पातळीत दडलेले असते. आपल्या मेंदूतील सेरेटोनीन, इंडॉर्फिन, आॕक्सिटोसीन आणि डोपामिन हे चार हॕप्पी हॉर्मोन्स असतात. त्यांची पातळी चांगली असेल तर सतत मनात सकारात्मक विचार येतात.
👉 अजून माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी Like, Share आणि Subscribe करा!
अधिक माहितीसाठी संपर्क करा –
डॉ. गोपालकृष्ण गावडे,
सिटी फर्टिलिटी सेंटर, सिंहगड रोड, पुणे.
+९१-८६६९९९३३३६
+91-8669993336
https://cityfertilitycentre.com/
https://youtu.be/DuVzXDY65n4?si=XRf9ho8rv_uQiREu