Poona Super-Speciality Clinic

Poona Super-Speciality Clinic Unique super-speciality polyclinic at North Pune.

Visiting consultants Super-specialist from various specialties like Gastroenterology, Rheumatology, Neurology, and Dermatology.

जाणून घ्या थायरॉईड ग्रंथी बद्दल सर्व माहिती !डॉ. हर्षल एकतपुरे (एंडोक्रिनॉलॉजिस्ट अँड डायबेटिस तज्ज्ञ)
22/08/2020

जाणून घ्या थायरॉईड ग्रंथी बद्दल सर्व माहिती !
डॉ. हर्षल एकतपुरे (एंडोक्रिनॉलॉजिस्ट अँड डायबेटिस तज्ज्ञ)

We are happy to announce Endocrinology & Diabetes services at our clinic byDr. Harshal Ekatpure, MD, DNB(endocrinology)
22/08/2020

We are happy to announce Endocrinology & Diabetes services at our clinic by
Dr. Harshal Ekatpure, MD, DNB(endocrinology)

22/08/2020

We are happy to announce Endocrinology & Diabetes services at our clinic by
Dr. Harshal Ekatpure, MD, DNB(endocrinology)

29/07/2020

Viral Hepatitis is common reason for liver injury. In this concise video Dr Sunil Vyankatrao Pawar explains A to Z about Viral Hepatitis you always wanted to know.
यकृत इजा होण्यामागील सामान्य कारण व्हायरल हेपेटायटीस आहे. या छोट्या व्हिडिओमध्ये डॉ सुनील पवार आपण जाणून घेऊ इच्छित असलेल्या व्हायरल हेपेटायटीस विषयी माहिती देत आहेत.

"स्केलरोडर्मा"इसवी सन १७५२ साली रॉयल नेपल्स रुग्णालयातील एका इटालियन डॉ. कार्लो कर्झिओ नावाच्या वैद्यकाकडे पॅट्रिझिया गॅ...
23/06/2020

"स्केलरोडर्मा"

इसवी सन १७५२ साली रॉयल नेपल्स रुग्णालयातील एका इटालियन डॉ. कार्लो कर्झिओ नावाच्या वैद्यकाकडे पॅट्रिझिया गॅलिएरा नावाची साधारण १७ वर्ष वयाची शेतकरी मुलगी आली. सदर मुलीचा त्रास काही वेगळाच होता. संपूर्ण शरीराची त्वचा लाकडासारखी कडक आणि काळी पडायला लागली होती. तिच्या कपाळ, मन तसेच डोळ्याच्या भवती त्वचा अगदी घट्ट होती, तसेच तोंडात घट्टपणा आणि मानेवर कडकपणा होता. तिला तोंड उघडणे आणि डोळ्यांची उघडझाप करणे देखील दुरापास्त होते. त्याकाळी उपलब्ध असलेल्यावैद्यकशास्त्राच्या कुठल्याच पुस्तकात किंवा नियतकालात अशा प्रकारच्या रुग्णाचे वर्णन नव्हते. रक्तातील अशुद्ध घटकामुळे हा आजार झाला असावा असा कयास बांधत, डॉ. कर्झिओ यांनी तिला औषध म्हणून पारा आणि बाष्पयुक्त स्नान घेण्याचा सल्ला दिला. साधारण एका वर्षानंतर पॅट्रिझियाची त्वचा पूर्ववत झाली. या एका नाविन्यपूर्ण दुर्मिळ आजाराच्या यशस्वी उपचारांची माहिती रॉयल नेपल्स रुग्णालयाच्या प्रमुखांनी "रॉयल अकादमी ऑफ पॅरिस" ला पत्राद्वारे कळविली आणि इसवी सण १७५५ ला नियतकालात प्रकशित करण्यात आली. ह्या नावीनयपूर्ण कार्याच्या सन्मानार्थ डॉ. कार्लो कर्झिओ यांच्या नावाने संयोजी ऊतक च्या आजरांवर संशोधनासाठी संस्था उभी करण्यात आली. कालांतराने इतर अनेक वैद्यकांनी आणि त्वचारोग तज्ज्ञांनी सारखी लक्षणे असलेल्या रुग्णाची महिती प्रकाशित केली. इसवी सण १८३६ साली एका डॉ. फॅन्टोनेटि नावाच्या दुसऱ्या इटालियन वैद्यकाने सारख्या लक्षणे असेलेल्या महिलेच्या आजाराचे वर्णन करण्यासाठी "स्केलरोडर्मा" हा शब्दप्रयोग केला. तेव्हापासून आजतागायत वैद्यकशास्त्रात हा शब्द रूढ आहे. तर हा शब्द "स्क्लेरोसिस" म्हणजे "कडकपणा" आणि आणि "डर्मा" म्हणजे "त्वचा" असा दोन शब्दांपासून बनला आहे.

नंतर झालेल्या संशोधनात हा आजारत फक्त त्वचाच नाही तर शरीरातील इतर अवयव (विशेषतः फुफुस, मूत्रपिंड आणि पचनसंस्था) देखील प्रभावित होतात असे दिसून आले. आणि १९४५ सालापासून सदर आजारासचे नामकरण "systemic sclerosis" असे करण्यात आले.

हा आजार दुर्मीळ असल्याने अजूनही फारसे संशोधन झालेले नाही. सदर आजराबद्दल फार तपशीलवार माहितीचा समावेश वैद्यकीय अभ्यासक्रम आणि प्रक्षिशक्षणात नसल्याने निदान लवकर होत नाही. वैद्यकीय क्षेत्र एकाहून एक यशस्वी शिखरे सर करताना देखील स्केलरोडर्मा ह्या दुर्मिळ आजारावर फार प्रभावी औषध शोधता आलेले नाही. ह्या दुर्मिळ आणि असाध्य आजाराबद्दल जागरूकता आणि संशोधन व्हावे यासाठी जगभरातील रुग्ण आणि आप्तेष्ट यांनी "scleroderma foundation" ची स्थापना केली आहे. दर वर्षी हि संस्था संशोधनासाठी एक दशलक्ष डॉलर्स रक्कमेचा निधी उभा करते तसेच रुग्णांना ह्या आजारासोबत जुळवून जगण्यास मदत करते. जून महिना जगभरात "स्केलरोडर्मा जागरूकता महिना" आणि २९ जून "जागतिक स्क्लेरोडेरमा दिवस" म्हणून पळाला जातो. मागील दोन दशकात ह्या आजारावरील उपचारात काही प्रमाणात प्रगती झाली आहे. पुढील दशकात वैद्यकीय क्षेत्राने हे असाध्य शिखर देखील सर करावे हि आशा.

डॉ. अभिषेक झंवर

सांधेविकार तज्ज्ञ

रुबी हॉल क्लिनिक आणि पुणा सुपर स्पेशिअलिटी क्लिनिक,

पुणे

९३५६२०७५३६

(Photo source: https://www.sclerodermaliving.com/)

23/06/2020

पांढरी कावीळ (हिपॅटायटीस बी): समज आणि गैरसमज

माझ्याकडे बरेच रुग्ण HBsAg reactive असा रिपोर्ट घेऊन येतात. रुग्णांना काहीसुद्धा त्रास नसतो. हि तपासणी हेल्थ कॅम्पस मधे, कॉर्पोरेट चेकअप मधे किंवा ऑपरेशनच्या अगोदर केलेली असते. रुग्ण google वरून ह्याबद्दल वाचतो. इंटरनेट मध्ये यकृत कायस्वरूपी निकामी (cirrhosis) होणार आणि यकृताचा कर्करोग होणार असं काहीतरी वाचतात आणि घाबरून जातात. दुसरीकडे यकृत कायस्वरूपी निकामी झालेल्या रुग्णाची चौकशीअंती असे समजते कि त्यांची तपासणी बऱ्याच वर्षांपूर्वी पॉसिटीव्ह होती. योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे सुचवून देखील काहींही लक्षण नसल्याने दुर्लक्ष केले गेले असते.

तर कुठल्या रुग्णाला उपचारांची गरज आहे ह्याबद्दल आपण माहिती घेऊ.

हिपॅटायटीस बी हा एक प्रकारचा विषाणू आहे. जो यकृताच्या पेश्यामधे जाऊन राहतो आणि इजा करु शकतो. सहसा यकृताचे लक्षणे म्हणजे डोळे पिवळे होणे , पोटात पाणी भरणे इ. खूप वर्षांनी येतात. त्यामुळे ह्या आजाराला पांढरी कावीळ असेही म्हंटले जाते. साधारण पंधरा वर्षांच्या अगोदर ह्या आजारावर फार प्रभावी औषधी उपलब्ध नव्हते. साधारण २००६ सालच्या सुमारास कमी दुष्परिणाम असणारी प्रभावी औषधी उपलब्ध झाली आणि २०११ साली अत्यंत प्रभावी औषध विकसित करण्यात आले. अगदी काही वर्षांपूर्वी कुठल्याही लक्षणे नसलेल्या रुग्णांना कुठलाही औषध न घेण्याचा सल्ला दिला जायचा. पण वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे लक्षण नसणाऱ्या काही विशिष्ट रुग्णांवर उपचार शक्य झाले. अश्या रुग्णांच्या उपचाराने यकृताला होणारी इजा रोखता येणे शक्य झाले.

भारतात हिपॅटायटीस बी चे प्रमाण दर शंभर माणसामागे आठ असे आहे. हे प्रमाण इतर विकसित देशांपेक्षा जास्त आहे. भारतात राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत हिपॅटायटीस बी ची लस देणे २००७ साली सुरु करण्यात आले. म्हणून २००७ च्या अगोदर जन्म झालेल्या व्यक्तींनी जर लस घेतली नसेल तर चाचणी करणे आवश्यक आहे.



ह्या विषाणूचा संसर्ग झाल्यास साधारण ५०-७० टक्के रुग्णांना काहीही लक्षणे नसतात. असे १०० रुग्ण असतील तर त्यापैकी ७० ते ८० रुग्णांना सहसा भविष्यामध्ये काही त्रास होण्याची शक्यता कमी असते. उरलेल्या २० ते ३० रुग्णानाच्या यकृताला इजा होउ शकते. लक्षणांशिवाय देखील विषाणू शरीरात पसरतो आणि यकृताला इजा करतो. अश्या रुग्णांचे यकृत कालांतराने पूर्णपणे निकामी होऊ शकते. यकृताला काही इजा नाही ना? विषाणूचे प्रमाण शरीरात किती प्रमाणात आहे ? ह्यासाठी रक्त , सोनोग्राफी ,फाइब्रोस्कन तपासण्या करून घेणे गरजेचे आहे. ह्यामध्ये रुग्णाला औषधांची गरज असल्यास ती दिली जातात. तपासण्यांमध्ये इजेचे निदान आणि तीव्रता ह्यावर देखरेख ठेवता येते. त्यामुळे सर्व रुग्णांचे ३ महिन्याला आणि काही विशिष्ट रुग्णांचे ६ महिन्यांनी तपास केली जातात.

ह्या विषाणूचा संसर्ग शारीरिक संबंधामुळे, दूषित रक्त संक्रमणामुळे आणि गरोदर मातेकडून होणाऱ्या बाळाला होऊ शकतो. घरामध्ये एका व्यक्तीस हा आजार असल्यास इतरांना देखील असू शकतो त्यामुळे घरी सर्वांची HBsAg तपासणी करून घेतली पाहिजे. ज्यांना हा संसर्ग नसेल त्यांना हिपॅटायटीस बी ची लस देण्यात येते जेणेकरून हा आजार त्यांना भविष्यामध्ये होणार नाही. महत्वाचं म्हणजे ह्या आजाराची अत्यंत प्रभावी औषधे उपलब्ध आहेत.

आपल्याला एखादा आजार त्याची लक्षणे येण्याअगोदरच जर कळाला आणि त्यामुळे फक्त रुग्णालाच नाही तर त्याच्या पूर्ण कुटुंबाला फायदा होत असेल तर ह्यापेक्षा चांगलं काहीही असू शकत नाही. नाही का? म्हणून पांढरी कावीळ ची भीती आणि दुर्लक्ष दोन्हीही टाळा. २००७ पूर्वी जन्म झालेल्या सर्वानी तपासणी करून लस किंवा औषधांची गरज आहे कि नाही हे जाणून घ्या.

डॉ. सुनील पवार

यकृत आणि जठरांत्र रोग तज्ज्ञ,

पुणा सुपर सस्पेशियालिटी क्लिनिक,

पुणे

९३५६२०७५३६

Do you need to visit a super-specialist? We have Gastroenterologist, Rheumtologist, Dermatologist and Neurologist availa...
28/05/2020

Do you need to visit a super-specialist?
We have Gastroenterologist, Rheumtologist, Dermatologist and Neurologist available under one roof.

Address

Poona Super Speciality Clinic, Office 105, Above Dorabjee, Town-Square Shopping Complex, Viman Nagar
Pune
411014

Opening Hours

Monday 8:30am - 10pm
Tuesday 8:30am - 10pm
Wednesday 8:30am - 10pm
Thursday 8:30am - 10pm
Friday 8:30am - 10pm
Saturday 8:30am - 10pm

Telephone

+919356207536

Alerts

Be the first to know and let us send you an email when Poona Super-Speciality Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Poona Super-Speciality Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram