Svasti Ayurved

Svasti Ayurved Our clinic provides Ayurvedic treatment which helps relieve lots of ailments for the long term.

15/06/2023

==== सुवर्ण लेहन ====

क्लिनिकमधे सध्या पालक मुलांच्या तक्रारी घेऊन येतात ह्याची immunity वाढत नाही,अभ्यासात हुशार नाही, लक्षात रहात नाही, वरचेवर आजारी पडते, एका जागी बसत नाही, खूप चिडचिड, हट्टीपणा करतो, खूप बारीक आहे खाल्ले तरी अंगी लागत नाही इ.

बालकांच्या ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आयुर्वेद शास्त्राने तुमच्या मुलांना दिलेले उत्तम आरोग्याचे संरक्षक कवच म्हणजेच सुवर्ण लेहन होय.

---- सुवर्ण लेहन कशासाठी? ----

सध्याच्या खाण्यापिण्याच्या व जीवनशैलीतील बदलांचा सर्वात जास्त परिणाम कोणाच्या आरोग्यावर होत असेल तर आपल्या मुलांवर, येणाऱ्या पुढच्या पिढीवर जे उद्याचे भविष्य आहेत. पुढील पिढ्या उत्तमोत्तम,आरोग्यदायी, सुदृढ शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी त्यांचे आरोग्य जपणे हे आपले परम कर्तव्य आहे. त्यासाठी पालकांनी प्रयत्नपूर्वक काही गोष्टी अवलंबल्या तर त्यांचे आरोग्य उत्तम राखण्यात आपणास यश येईल यात शंका नाही.

मुलांना नित्य चांगला हितकर आहार विहार देण्याबरोबरच नित्य देऊ शकतो असे म्हणजे आयुर्वेद शास्त्रात वर्णन केलेले सुवर्ण लेहन होय.

---- सुवर्णलेहन म्हणजे काय? ----

सुवर्णलेहन किंवा सुवर्णप्राशन हा 16 संस्कारांपैकी एक संस्कार आहे. आयुर्वेदात काश्यप संहितेमध्ये याचे वर्णन आढळते ज्या मधे शुद्ध सुवर्ण भस्म औषधी तूपातून व मधातून चाटवले जाते. पूर्वी बाळ जन्मल्यानंतर त्याला सर्वात प्रथम सोने मधात उगाळून चाटवायची परंपरा होती, तर का? तर बालक जन्माला आल्यानंतर त्याच्या वातावरणात अचानक झालेला बदल हा त्याला आघाताप्रमाणे असतो तो बाहेरच्या जगात आल्यावर त्याचे त्या क्षणी ओजवर्धन, बलवर्धन करणे जरुरी असते व त्यासाठी सर्वात प्रथम बाळाला सुवर्ण चाटवले जाते.

---- सुवर्णच का? ----

सुवर्ण हे उत्तम बलकारक, उत्तम बुद्धीवर्धक ओजवर्धक, विषघ्न, नेत्रास हितकर, हृदयास हितकर, धीधृतीस्मृती उत्तम करणारे, सर्व रोगांचा नाश करणारे असे आयुर्वेदात सांगितले आहे. असे श्रेष्ठतम सुवर्ण जर आपण बालकांना नित्य दिले तर त्यांची उत्तरोत्तर बलवृद्धी, धीधृतीस्मृती वृद्धी शारीरिक व मानसिक विकास इ. लाभ दिसून येतातच. आयुर्वेदात अगदी गर्भधारणेपासून ते वृद्धावस्थेपर्यंत सुवर्णाचा उत्तम उपयोग करण्यास सांगितले आहे.

---- कसे द्यायचे? ----

व्यवहारात सुवर्णाचे औषधी प्रक्रियेने व अग्निसंस्काराने भस्म बनवून बुद्धिवर्धक तुपातून व मधातून उपयोग केला जातो.

---- कधी द्यायचे? ----

दर महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर हे उपाशीपोटी बालकांना चाटवले जाते. पुष्य नक्षत्र हे ज्ञानदेवता बृहस्पती देवतेचे नक्षत्र आहे ते अत्यंत मंगल कारक नक्षत्र आहे ज्यादिवशी प्रत्येक औषधींमधील कार्यकारी शक्ती श्रेष्ठ असते. नित्य प्रतिदिन, रोजही देऊ शकतो.

---- कोणाला द्यायचे? ----

जन्मापासून १६ वर्षांपर्यंतच्या मुलामुलींना.

---- किती द्यायचे? ----

प्रत्येक बालकाच्या वय, वजनानुसार ठरते.

---- सुवर्णलेहन चे फायदे काय? ----

१. बालकांच्या निरोगी शारीरिक व मानसिक वाढीसाठी उत्तम.
२. व्याधीक्षमत्व टिकवून ठेवून वरचेवर होणाऱ्या आजारांपासून उत्तम संरक्षण.
३. इंद्रियांना बल देणारे असल्याने उत्तम श्रवण शक्ती, वाक् शक्ती, दृकशक्ती प्रदान करणारे.
४. शरीराचे उत्तम पोषण करणारे असल्याने पोषण अभावी कमी वजन, अशक्तपणा, दीर्घकालीन आजार यामध्ये बलदायी म्हणून.
५. चुकीच्या आहाराचे किंवा औषधाचे विषवत् दुष्परिणाम घालवून पुन्हा आरोग्य प्रस्थापित करणारे.
६. धीधृतीस्मृती सुधारून अभ्यासात येणारे अडथळे, एकाग्रतेचा अभाव, लक्षात न राहणे चिडचिड, अस्थिरपणा यामध्ये लाभदायी. १ महिना नित्य नियमाने दिल्यास परम मेधावी बालक‌ होते तर ६ महिने नित्य दिल्यास श्रृतधर म्हणजे एकदा ऐकलेले स्मरणात राहते.
७. शरीराची कांती सुधारते.

ह्या व अशा अनेक पद्धतीने बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक व उत्तम आरोग्याचे कवच असलेल्या सुवर्ण लेहन संबंधी अधिक माहितीसाठी संपर्क साधा :

स्वस्ति आयुर्वेद चिकित्सालय
सुखानंद पोलिक्लिनिक
ऐश्वर्या रेसिडेन्सी १, जगताप चौक,
वानवडी, पुणे
फोन: ६३७-०६७-५१३६

Svasti Ayurved : Our Products & Services
28/05/2023

Svasti Ayurved : Our Products & Services

New Blog: आहार विधी विधान ~ Dietary LegislationAs Ayurved is a science of life, it elaborates every aspect of it in a pr...
28/05/2023

New Blog: आहार विधी विधान ~ Dietary Legislation

As Ayurved is a science of life, it elaborates every aspect of it in a precise manner. Today we are going to understand what are dietary legislations elaborated in Ayurved for healthy as well as unhealthy individuals. It is called Aahar Vidhi Vidhan. Diet if consumed this way will lead to healthy disease free life and thus will enhance the quality of life.

Let's check what are these:

1. Food should always be served hot while we consume it. It enhances taste, digestive fire, easily gets digested.

2. Food should have sufficient amount of oiliness in it. It improves your appetite, improves strength of body.

3. It should be consumed in a specific quantity as per once digestive fire. It balances the tridoshas and maintains ayu.
You should take the second meal only if your first meal is properly digested. Then only it will give proper nutrition to body and mind and increase ayu.

4. Do not consume food which when mixed with each other will harm your body after digestion. ( Eg. Milk and banana)

5. The place where you are going to consume your meal should be clean and quiet without any noise or irritating atmosphere (Do not eat food while watching TV)

6. Have meal with all cutlery in hand so that mind remains calm and quiet.

7. Do not rush through the meal. Chew every bite properly

8. Do not eat for longer duration more than 20 minutes.

9. Concentrate on your food consume it calmly without talking or laughing. It should be a mindful eating.

10. While consuming food have a gratitude towards it and consume food which is really beneficial for you which suits your prakriti, which will give you healthy benefits.

Let us begin mindful eating from now!

http://www.svastiayurved.com/blogs-aharvidhividhan.html

Address

Sukhanand Polyclinic, Aishwarya Residency 1, Near Ganesh Temple, Jagtap Chowk, Wanworie
Pune
411040

Opening Hours

Monday 10am - 2pm
5pm - 8:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Svasti Ayurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram