11/03/2026
महिला आरोग्य जनजागृती कार्यक्रम – मनःपूर्वक आभार 🙏
Vi-Reva Social Foundation chya vatine काल आयोजित केलेल्या महिला आरोग्य जनजागृती कार्यक्रमाला अत्यंत उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अनेक पालकांनी WhatsApp द्वारे संदेश पाठवून कार्यक्रमाबद्दल आभार व्यक्त केले आणि अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम पुढेही करत राहा असे प्रोत्साहन दिले.
त्यांच्या या शब्दांमुळे मनापासून आनंद झाला. या कार्यक्रमातून मुलींच्या आयुष्यात आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि त्यांना याचा नक्कीच फायदा होईल, असे अनेक पालकांनी सांगितले. त्यामुळे पुढेही असे उपयुक्त कार्यक्रम आयोजित करण्याची आम्हाला नवी प्रेरणा मिळाली.
या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल
डॉ. ज्योती गणेश पवार मॅडम यांचे मनःपूर्वक आभार.
तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित राहून प्रोत्साहन दिल्याबद्दल
श्री. गणेशभाऊ जांभुळकर (सरपंच),
सौ. दिपालीताई शरद जांभुळकर (उपसरपंच),
सौ. ऐश्वर्या वाघमारे (नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या, मुळशी),
श्री. सचिन आबा जांभुळकर (ग्रामपंचायत सदस्य),
सौ. पल्लवीताई गोगावले (ग्रामपंचायत सदस्या)
तसेच उपस्थित राहून कार्यक्रमाला पाठिंबा देणाऱ्या सर्व मान्यवरांचे आणि सज्जन बांधवांचे मनःपूर्वक आभार.
आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच असे सामाजिक उपक्रम शक्य होतात.
मनःपूर्वक धन्यवाद! 🙏