08/06/2021
दुःख , व्यथा
मित्रानो नमस्कार ,
आपण मागील लेखात व्यथा कशा निर्माण होतात ते बघितले , आपण आपल्यावर आलेली दुःखाची परिस्थिती ,मनाशी घट्ट पकडुन बसतो आणि त्याच त्याच अवस्थेमध्ये सतत वावरत असतो. ह्या सर्व नकारात्मक विचारांचा आपल्या मनावर , शरीरावर खोल वर परिणाम होत असतो .
"हिल युअर लाइफ " ह्या पुस्तकामध्ये ह्या बद्दल सखोल माहिती आपल्याला मिळेल .
मग ! कसं काय बाहेर पडायचं ह्या सर्व परिस्थितीमधून , चला बघुयात !
आपण ज्या परिस्थिती मध्ये आहोत , व्यथे मध्ये आहोत त्याला कुरवाळत न बसता , त्याच्यामुळे जो अनुभव आपल्याला मिळाला आहे , त्याकडे सजग होऊन , त्याची कुठल्याही प्रकारची तुलना न करता , सतर्क राहून त्या गोष्टीपासून अलिप्त होऊ , आपल्या सतर्क विचारांची पद्धती , धारणा , आपली सर्व मते बदलून आपल्या मूळ आनंदी स्वरूपाला येण्यास सुरुवात करू
आपल्याच बाबतीत का असं घडते ?? कारण आपण ज्या पद्धतीची विचारधारणा निर्माण करतो , त्या पद्धतीची स्पंदने , वलय आपण स्वतःभोवती निर्माण करतो आणि ती परिस्थिती , माणसं आपल्याकडे आकर्षित करत असतो .
"अहंकार " हि त्यामधील एक उणीव आहे , त्यामुळे विचारांकडे सतर्क राहून त्या गोष्टीपासून दूर राहून , चांगल्या गोष्टी आत्मसात करणे महत्वाचे आहे .
जेव्हा एखादी गोष्ट आपापल्या मनाविरुद्ध होते तेव्हा ती मला नको ! अशी भावना आपण सतत निर्माण करत असतो , सतर्क वृत्तीने त्या चाचपडायला सुरुवात करू ! मनामध्ये कोणते विचार घोंघावत आहेत , आपण त्या सर्व विचारांकडे सतर्कपणे बघायला सुरुवात करू , आपण मनात काय धरून ठेवलय , त्यांनी कोणत्या प्रकारची भावना आपल्या मनात निर्माण होती हे सर्वात महत्वाच आहे .
आपण सर्व व्यथेची परिस्थिती पूर्णपणे स्वीकारू , त्याच्या मध्ये प्रेमाचा ओलावा निर्माण करू , त्याचा अभ्यासपूर्वक स्वतःमध्ये बदल करू , त्या व्यथेची चर्चा न करता , त्याला पूर्णपणे प्रेमाने स्वीकारू , सर्व उणीव दूर करून , व्यथे पासून पूर्णपणे मुक्त होऊयात .
व्यथेमुळे कोणत्या प्रकारची ऊर्जा निर्माण करत आहोत हे महत्वाचे ,सतर्क बदल करून , आपल्या विचारांशी सजग राहून ,सतत स्वतःच्या विचारांमध्ये बदल करूयात .
आपल्या जवळील सर्व सुख आणि आशीर्वाद ह्याचा पूर्णपणे स्वीकार करून , व्यथे ला रामराम करूयात .....
मस्त राहा , छान राहा , आनंदी राहा
रोहित केसकर
हीलिंग थेरपिस्ट
९४२३०३२३५८