Manoyog Psychological Counseling

Manoyog Psychological Counseling 20+yrs experience in counseling adults on marriage, sports, parenting, study skills, anger & stress management. IT sector expertise. Iyengar Yoga & Cricket.

One-on-One, Face-to-Face, Online-Video/Tele, Group counseling.

रागाचा बळी           ---------------------------पारंपल्ली गाव कर्नाटक मधलं..आज पुन्हा. TEENAGER'S  ANGER वर लिहिते आहे. ...
02/08/2025

रागाचा बळी
---------------------------

पारंपल्ली गाव कर्नाटक मधलं..
आज पुन्हा. TEENAGER'S ANGER वर लिहिते आहे.

20 जुलै 2025 ला 17 वर्षाची ताई आणि बारा वर्षाचा भाऊ घरी खेळत होते आणि खेळता खेळता मध्येच भावाने ताईचा मोबाईल घेतला व तो पटकन तिला हिसकावून घेता आला नाही. तो मोबाईल त्याने बघू नये म्हणून तिने जीवाचा आटापिटा केला, तेवढ्यात तिला जवळच पडलेला त्याचा बेल्ट दिसला, तर तिने तो बेल्टच त्याच्या गळ्याभोवती आवळला आणि गेला की भाऊ पाच मिनिटात..

हा accident च होता, intentional murder नव्हता, पण राग -संताप आणि mobile obsession मुळे हे घडलं..

इथे सर्वच भावना येतात .
मोबाईल भावाने घेतला तर insecurity, मोबाईल obsession म्हणजे मोबाईल पासून दूर न राहता येणे आणि राग व संताप.... माझा भाऊ ऐकत कसा नाही ते बघतेच... ही भावना. शिवाय आई वडिलांची parenting style पण महत्त्वाचीच..

पण तरी इथे आपला फोकस राग आणि संतापावर आहे.

अशा सगळ्या भावना आपल्याला कळल्या तर आपण आपल्या मुलांना पण शिकवू शकतो पण आपण आत्ता ANGER MANAGEMENT बद्दल जाणून घेऊया त्याच्या वर्कशॉप मधून...

कारण त्यामुळे असे प्रश्न कमी होऊ शकतात.

त्याकरता मी घेऊन आले आहे,

"ANGER MANAGEMENT "
ON LINE WORKSHOP.
चा पाच दिवसाचा ( रोज एक तास)

11 th August to 15 th August .

11.30 am to 12.30 pm.

fees--- Rs.599/-

Mobile No. 9423009360.

अपर्णा ठकार,
मानसशास्त्रीय समुपदेशक,
पुणे.

28/07/2025
27/07/2025

रागाचे घर
‐‐-------------------------------------

सोहम बऱ्याचदा शाळेतून आला की घाबरलेलाच असायचा, आता तरी तो कॉलेजला जातो ,पण घरी येताना मनात एक भीती असते आणि त्यामुळे झालेला अबोल स्वभाव हे घेऊन येतो.
त्याला आपला अबोल स्वभाव आवडत नाही पण बाबा पोलीस मध्ये IPS ऑफिसर आहेत आणि सोहम कुठेही गेला कॉलेज झाल्यावर की मग ते काहीतरी कारण काढून रागावतातच.

दहावीत मार्क कमी पडले ,लहानपणी बाबां शी क्रिकेट खेळताना चुकला तरी खूप रागवायचे .आता तर कारणच लागत नाही ,आईलाही नोकरीमुळे सोहमची बाजू ऐकायला आणि समजून घ्यायला वेळच नसतो .त्याची लहान बहीण सायली तिलाच तो सगळं सांगतो आणि शेअर करतो.

काल रात्री मात्र बाबा OUT OF CONTROL झाले होते. सोहम चे मित्र आणि मैत्रिणी पब मध्ये पार्टीला गेले .सगळे पहिल्यांदाच गेले आणि नेमकी पोलिसांची धाड पडली.
तरी सोहम badminton Tournament ला गेल्यामुळे त्यांच्याबरोबर नव्हता. असे कसे मित्र आणि मैत्रिणी तुझे असे म्हणून बाबा अतिशय रागावले. संतापात त्यांनी आईला ढकललं आणि सोहम वर हात उगारला आणि तर सोहमनी तो हात वरचेवर थांबवला मग तर ते अजूनच संतापले.

अशावेळी बाबा कुणाचच ऐकत नाही, आईलाही बोलू देत नाही, घरातले मग सगळे डिस्टर्ब असतात, अशावेळी सोहमला घर सोडून जावं असं वाटतं पण त्याची काही हिंमत होत नाही....
काय आपल्या घरी पण थोड्याफार फरकाने अशीच परीस्थिती आहे??

तर मग आपल्यासाठी च आहे हा ANGER MANAGEMENT चा कार्यक्रम नक्कीच करा.. व आपली नाती चांगली करा....

---ON LINE ---

ANGER MANAGEMENT WORKSHP ..

11th August to 15th August

11.30 am to 12.30 am

Fees..Rs.599/-

Google link वर्कशॉपच्या दिवशी सकाळी पाठवू.

अपर्णा ठकार,
मानसशास्त्रीय समुपदेशक,
पुणे.
M-94230-09360.

रागाचे व्यवस्थापनANGER  MANAGEMENT ----------------------------------------26 मे 2022 रोजी अमेरिकेतल्या टेक्सास प्रांतात...
22/07/2025

रागाचे व्यवस्थापन

ANGER MANAGEMENT
----------------------------------------

26 मे 2022 रोजी अमेरिकेतल्या टेक्सास प्रांतात एका अठरा वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या शाळेतील 19 लहान मुलांना आणि दोन शिक्षिकांना बंदुकीने उडवले. त्यावेळी संपूर्ण अमेरिका आणि सर्व जग हलून गेले ,हे कृत्य तो विद्यार्थी अत्यंत रागात असताना घडलं.

आपण म्हणजे भारतीय सर्व बाबतीत अमेरिकेची अगदीच नक्कल करतो .आजकाल पेपर उघडला तर अशीच कृत्ये आपले विद्यार्थी पण करताना दिसतात. परवाच म्हणजे 12 जुलै 2025 ला ला जळगावला "कल्पेश इंगळे" या नववीतल्या मुलाला त्याच्याच वर्गातील एका मित्राने काहीतरी भांडण झालं तर पिटून-पिटून मारून टाकलं

काय झालं आज कालच्या या मुलांना ?
का अशी रागाची लहर किंवा संतापाचा उद्रेक होतोय?
का त्यांना घरी व शाळेत आपल्या भावना हाताळायला शिकवत नाहीत?
किंवा घरात आई-वडील फार चिडके असून सतत घालून बोलतात का?

रागाचा हा उद्रेक आजकाल रस्त्यावर पार्किंगला जागा नाही मिळाली म्हणून ,कोणी हॉर्न वाजवला म्हणून ,कोणत्याही कारणाने बघायला मिळतो .त्याकरता पालकांनी आणि त्यांच्या मुला-मुलींनी आपापल्या रागाची कारणे जाणून घ्यायला हवी.

ते सांगायलाच मी येते आहे
ANGER MANAGEMENT चा WORKSHOP पाच दिवसाचा प्रत्येकी एक तासाचा असा वर्कशॉप
घेऊन.

तुम्हाला स्वतःला येणारा राग किंवा घरच्यांची होणारी चिडचिड व संताप हे सगळं कसं सावरायचं समजून घ्यायचं नात्यांमध्ये सामंजस्य निर्माण करायचं ते सगळं आपण जाणून घेऊया तर येत्या 11 ऑगस्ट पासून 15 ऑगस्टपर्यंत, पाच दिवस सकाळी "11.30 ते 12.30" हा वर्कशॉप तुम्ही नक्कीच अटेंड करू शकता.

अपर्णा ठकार,
मानसशास्त्रीय समुपदेशक
पुणे
9423009360

14/07/2025

नमस्कार मैत्रिणींनो ,
आपल्याला राग येतो किंवा घरातल्यांना राग येतो त्यावेळी आपण सगळे मनातून खूप डिस्टर्ब होतो .
आपलं कामात लक्ष लागत नाही. असं आपलं किंवा आपल्या घरातल्या कुणाचं नेहमी नेहमी होत असेल ,तर आपण माझा ☝🏻☝🏻वरचा
"अँगर मॅनेजमेंट" चा कोर्स नक्की करा .
तुम्हाला जीवनामध्ये खूप बदल जाणवेल, जो की सकारात्मक असेल.

व घरात खूप आनंदी वातावरण राहील..

19/03/2025

" सप्तपदी- तप्तपदी"

"REAL LIFE HERO"

कल्पेश ला (नाव बदलले आहे) समुपदेशनाला यायचे म्हणून त्यांनी दुपारची वेळ घेतली होती .त्याला समुपदेशनाला यायची घाई झाली होती.

कल्पेश हा आंध्र मधून अतिशय गरीब घरातून आलेला तरुण. त्याचं शालेय शिक्षण नवोदय विद्यालय मध्ये राहून झालं. आई-वडिलांची शेतात एक लहान झोपडी आहे, त्यात ते, व कल्पेश चे दोन भाऊ व एक लहान बहिण राहायचे .जरा मोठे झाल्यावर तीनही भावांची रवानगी शिक्षणाकरता नवोदय विद्यालयात झाली. बहीण तिथल्या सरकारी शाळेत शिकली.

नवोदय विद्यालय मध्ये त्यांचे वसतीगृह असतं व राहण्याची व खाण्या-पिण्याची योग्य सोय असते. त्यामुळे मुलांना शिक्षण आणि खाणे- पिणे मिळते, म्हणून पालक पण खुश असतात .
त्या विद्यालयात मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देतात. तिथल्या विद्यार्थ्यांना नियमितपणे खेळणे, व्यायाम करणे हे अनिवार्य होते.

कल्पेश शाळेच्या फुटबॉल आणि बास्केटबॉल च्या चमू मध्ये होता. त्यांच्या इंटर- नवोदय विद्यालय स्पर्धा होत. कल्पेश ची नेहमी शाळेच्या चमू मध्ये निवड व्हायची. एखाद्या जवळच्या जिल्ह्याच्या ठिकाणी स्पर्धा व्हायची. त्यांचे सर टीम्स घेऊन जायचे, असंच एकदा स्पर्धेला गेले असताना सरांनी त्याला बोलावले आणि child s*x abuse घडले ,पण आपण कुणाला सांगितलं तर शिक्षण सोडावं लागेल ,म्हणून कल्पेशने gay रिलेशनशिप सहन केली. आणि सहन करत राहिला. साधारण आठवीत असताना सुरू झालेलं हे प्रकरण बारावीपर्यंत अधून मधून सुरू होतं .सरांबरोबरच इतरही त्यांच्या एक -दोन मित्रांबरोबरही सुरू होतं. त्याला अतिशय मानसिक त्रास होत होता तरीही त्यानी या प्रकरणाचा स्वतःचा अभ्यासावर परिणाम होऊ दिला नाही.

बारावीनंतर तो आंध्र प्रदेश मधूनच आयटी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून नोकरीकरता पुण्यात आला. नोकरी लागून तीन- चार वर्षे झाली ,आई -वडील लग्नाकरता खूप मागे लागले आहेत आणि त्याला असं वाटतं की मी लग्न करू का? आणि केलं तर बायकोला नाही फसवू शकत .
कसं काय लग्न करावं त्यामुळे तो समुपदेशनाला आला.

त्याचा प्रामाणिकपणा वाखाणण्या जोगा होता. त्याला त्यातून निघायचं होतं पण त्याची gay रिलेशनशिप ही गरज बनली होती आणि आताही ते सगळं सुरू होतं.

समुपदेशनामध्ये त्याला gay रिलेशनशिप बद्दल काय वाटतं ?खरंच आवडतं की सवयीचा गुलाम म्हणून सुरू आहे? त्याला मुलींच अट्रॅक्शन वाटतं की नाही ?हा मुख्य मुद्दा आहे .. यावर भरपूर वेळा बोलणं झालं.

झालेल्या सर्व प्रकरणाचा मानसिक त्रास त्याला होतच होता .तो कमी करायला REBT ची मदत घेतली. त्याने आठवीपासून सुरू झालेला कोंडमारा सेल्फ टॉक मध्ये लिहून काढला .आपण किती त्रास सहन केला आहे सगळं सांगताना तो अनेकदा गहिवरला आणि रडला.

आईला काय आणि कसं समजायचं हा प्रश्न मोठा होता, कारण ती एक शेतमजूर स्त्री होती आणि आता त्या झोपडीतून जरा बऱ्या घरात राहायला आली होती .सगळीच मुलं मार्गी लागली होती ,म्हणून खुश होती .स्थिर होती. त्यामुळे कल्पेश च्या मागे लग्नाचा तिचा ससेमीरा सुरू होता.

इतके वर्ष झालेल्या त्रासातून निघण्याकरता आरबीटीच्या मार्गाने समुपदेशन केले .त्याने नियमितपणे self talk लिहिला आणि जे झाले त्यातून बाहेर निघायला तो शिकला.

त्यानंतर तो खरच gay आहे का ? की gay पण त्याच्यावर जबरदस्ती केल्यामुळे स्वीकारलेल आहे ,यावर त्याला लिहायला सांगितलं. जवळपास एक ते दीड वर्षा तो स्वतःला शोधत होता. मनातलं खूप सारे लिहत होता. वाचत होता. gay रिलेशनशिप पासून दूर रहायला हळूहळू शिकू लागला. मानसिक आणि भावनिक दृष्टीने स्वतःला सावरलं . त्याने आईला दोन-तीन वर्षाचा वेळ मागितला आणि मागे नको लागू म्हणून समजावलं. त्याला सांगितलं की तू आता psychiatrist चे sessions घे आणि त्यातील मुद्दे पण समजावून घे.

हे सगळं नियमितपणे करून हळूहळू कल्पेश gay रिलेशनशिप मधून बाहेर पडायला लागला आणि मग बाहेर पडला तरीही त्याने लग्नाचा निर्णय घ्यायला अजून एक दीड वर्ष घेतलं .
एका गरीब आणि अनाथ मुलीला सगळं सांगून त्याने तिच्याशी लग्न केलं. मी ह्यात पुन्हा पडणार नाही हे तिला वचन दिलं. त्याच्या लग्नाला आता दोन वर्षे झालीत . हे एक प्रामाणिकपणा ,स्वत: बदलण्याची आणि परिस्थितीतून बाहेर निघण्याची तयारी ,त्याकरता चिकाटीचे केलेले सतत प्रयत्न आणि स्वतःचे मन समजून घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन, समुपदेशनामध्ये पूर्ण सहकार्य करून स्वतःचे आयुष्य नीट घडवल्याचे एक अतिशय दुर्मिळ उदाहरण आहे. खरंच कल्पेश च कौतुक वाटतं.

हे कौतुक खूप ठळकपणे वाटतं कारण अतिशय चांगल्या घरातले मुलं इतक्या चिकाटीने समुपदेशन पूर्ण करत नाहीत.

अपर्णा ठकार
मानसशास्त्रीय समुपदेशक.
पाषाण, पुणे.

21/04/2023

ऋचा किती छान नाव ठेवलं आई-वडिलांनी.

ही मुलगी साधारण 2016 मध्ये आपल्या बॉयफ्रेंड बरोबर पहिल्यांदा कौन्सिलिंग आली.
तो आधी येऊन गेला होता त्याला pre-marital कौन्सिलिंग दोघांचे करायची इच्छा होती. त्याप्रमाणे दोघे आले.

दोघेही तरुण, ती सुंदर व राहायला smart दिसत होती. शाळेत व कॉलेजमध्ये अभ्यासात हुशार होती.
ती कम्प्युटर इंजिनियर तर तो एमसीए.
दोघे एकाच कंपनीत पहिले नोकरी करत होते. पण त्याने तिच्या नावावर तिच्या लॅपटॉप वरून ऑफिसच्या कामात काही गडबड केली... त्यामुळे दोघांच्याही नोकऱ्या गेल्या.

ती कोल्हापूर जवळच्या चांगल्या गावातून अर्धशिक्षित आई-वडिलांच्या घरात जन्मलेली. घरी मोठा भाऊ व वडील होते .तिच्या वयाच्या विसाव्या वर्षी साधारण तिची आई कॅन्सर ने वारली.. वडील चांगल्या नोकरीत होते ,भाऊ काही करत नव्हता... त्याचं शिक्षणात ही लक्ष नव्हतं.

ती आता 27 वर्षाची.

तो पण कोल्हापूर साईडचा.... वडील गुरव आणि घरी आई आणि बहीण. तो पुण्यात आला . एमसीए केलं नोकरी मिळवली.. छोकरीचा शोधात होताच पण ऑफिसच्या गडबडीमुळे पकडला गेला.

तिची चूक नसताना तिची नोकरी गेली, तिला दोन वर्षाच्या नोकरीनंतर experience certificate पण मिळालं नाही ... कारण त्याला लॅपटॉप वापरू दिला हा तीचा दोष होता .
तरीही ती लग्नाला तयार होती. याचं कारण म्हणजे घरी आपल्यासाठी कोण मुलगा बघेल आणि आपले वडील आपलं लग्न करून देतील की नाही ही तिला शंका होती. अशी शंका का आहे हे तिला नीट सांगता आलं नाही.

तू असं का वागलास ?
तू असं वागलास तरी मी तुझ्याशी लग्न का करू असे प्रश्न तिने त्याला माझ्याकडे समुपदेशनाला यायच्या आधी विचारले नाही.

आपण आधी नोकरी मिळवावी, financially नीट settle व्हावं आणि मग नोकरीचा विचार करावा हे ही तिला सुचलं नाही.

आज-काल मुला-मुलींना वाटतं की आपण शिकलो, पैसे कमवतो तर आता आपल्या आयुष्याचे निर्णय आपण घेऊ शकतो पण जगातील अनुभव, त्याचे टक्के टोणपे न मिळाल्यामुळे व्यवहार ज्ञानात कमतरता असते असं वाटतं.
सारासार विचार नसतो, एककल्लीपणा असतो, शेअर करणे कमीपणाचं वाटतं की गरज वाटत नाही ,काही कळत नाही.. पण त्यामुळे आपल्या आयुष्यात आपणच प्रश्न तयार करतो असं नाही का वाटत?

ऋचा म्हणजे वेदमंत्र.जे जगाला शिकवतात...
पण ही सर्वच बाबतीत अतिशय confused , थोडीशी भोळसट आणि भावनेच्या प्रवाहात वाहून जाणारी वाटली.

मुलींनो.. नेहमी self assessment, self-acceptance हे तपासायला शिकायला हवं ना.
Over confidence, स्वप्नाळूपणा यातून बाहेर पडून स्वतःला समजून घ्यायला हवा ना. मग जग समजू शकता थोडं तरी... आपल्याला अभ्यासाच्या पलीकडची हुशारी पण यायला हवी.

अपर्णा ठकार
समुपदेशक,पुणे.

The GoalEvery person has got some or the other goal in his /her life, otherwise  the life can become dull & boaring.It h...
04/07/2022

The Goal

Every person has got some or the other goal in his /her life, otherwise the life can become dull & boaring.

It has been observed that the young and teenager students ,players have great goals to achieve something glorious in their future life.They are continuously goal oriented young generation, passionate about their goal.

Do you know ,what is this "Goal of life "? Let us see story of one of the Rifle shooter from Country of Poland...I got chance to read this great story .

This Polish Rifle Shooter got seventeen days daughter and she had to leave for Olympics ,so her boy friend accompanied her to reach the air port & there he has conveyed her that ..this is our last meeting as I am now separating from you.She was absolutely shocked and stunned.But she immediately decided that this decision will never impact on her Olympics Goal.

She had very clear goal of representing her country in Olympics n achieve great success.
During her daily shooting practice on the range ,she was giving her 100 % to her role of shooter.....complete concentration & dedication and after finishing her practice ,she used to talk to her daughter ..a lot n used to get relaxation after talking to daughter.It was her self talk .

She has achieved her goal of getting GOLD medal in rifle shooting in that Olympics.

Salute to her achievement.
Salute to her goal.
Her name was Renata Mayer...1996 Olympics rifle shooting gold medalist.

If you want guidance about it,talk to

Psychological Counselor
APARNA THAKAR
91-95799-39991

Address

502, Sahadeo Iris A, Park Ridge Someshwar Wadi Road , Someshwar Wadi, Pashan
Pune
411016

Opening Hours

Monday 12am - 8pm
Tuesday 12am - 8pm
Wednesday 12am - 8pm
Thursday 12am - 8pm
Friday 12am - 8pm
Saturday 12am - 8pm
Sunday 12am - 8pm

Telephone

+919579939991

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manoyog Psychological Counseling posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram