Prathamesh Bhoj

Prathamesh Bhoj पौरोहित्य पुजा विधी तसेच जोतिष मार्ग?

03/07/2023

ध्यान मूलं गुरूमुर्तिम्ं: पुजा मूलं गुरूपद्ं:
मंत्र मूलं गुरूवाक्य्ं : मोक्ष मूलं गुरूकृपा!!

श्री लक्ष्मीनृसिंहाय नम:
28/04/2023

श्री लक्ष्मीनृसिंहाय नम:

05/06/2022
विवाहयोग🟣 विवाह विलंब व वैवाहिक समस्यां               विवाहयोग या संकल्पनेत लवकर,विलंबाने,अविवाहित योग त्याचप्रमाणे विवा...
26/01/2022

विवाहयोग🟣
विवाह विलंब व वैवाहिक समस्यां
विवाहयोग या संकल्पनेत लवकर,विलंबाने,अविवाहित योग त्याचप्रमाणे विवाहोत्तर व विवाहपूर्व समस्यां असे त्याचे वर्गीकरण करता येईल.🟣
तसेच याबाबी पाहताना त्याप्रकारचे ग्रहयोग असतात,त्यात शुभयोग व अशुभ योग यांचा समावेश होतो. त्यात महादशा ,अंतर्दशा व गोचरीने आलेले ग्रहमान देखील महत्वाचे ठरतात त्यात कुंडलीचा दर्जा कसा आहे हेही विसरता कामा नये.🟣
विवाहविलंबात व वैवाहिक समस्येत काही घटक समान असतात .🟣
त्यात मंगळ, शनि, गुरू,शुक्र,,हर्षल यासारखे ग्रह महत्वाची भूमिका बजावतात.🟣
गुण जुळले याचा अर्थ सर्व आलबेल आहे असा अर्थ काढू नये,कारण एकमेकांचे पटणे,संसारसुख,आर्थिक सौख्य ,संततियोग,आरोग्य,अल्पायुयोग, इ. बाबी पाहणे,तितकेच महत्वाचे असते🟣
बऱ्याचवेळा सप्तमातील धनुराशीचा गुरू व दशमस्थानी व लाभातील सिहेचा गुरू व कृत्तिका नक्षत्राचा शुक्र हे विवाहास विलंब करतात असे दिसून आलेले आहे ,तसेच हे ग्रह एकाच अंशात असतील किंवा निर्बली असतील व जोडीला शनि व मंगळ युती असेल तर ही वैवाहिक समस्येची मोठीच अडचण ठरते.🟣
याच्याशिवाय प्रथमस्थानातील शनि किंवा सप्तमस्थानी असलेली दृष्टी व जोडीला हर्षलची उपस्थिती व शनि व मंगळाचा षडाष्टकयोगासह हे ग्रह अशुभ स्थानात असतील तर विवाहात किंवा विवाहास विलंब ठरलेला असतो व वैवाहिक समस्या देखील असण्याची शक्यता जास्त असते.🟣
त्रिक स्थानातील शनि व मंगळ युती व त्याबरोबर चंद्र किंवा हर्षल बरोबर षडाष्टक योग साधत असेल तर ही स्थिती देखील घडून येते,व वैवाहीक समस्यां ह्या असतातच किंवा त्यांचे प्रमाण असण्याची शक्यता अधिक असते हे मात्र नक्की.🟣
वर सांगितलेल्या बाबी ह्या ज्यावेळेस गोचरीने ग्रह येतात त्यावेळी शिवाय दशा व अंतर्दशा असतात व हे ग्रहयोग ज्यावेळी एकत्रित येतात त्यावेळी मात्र खरा त्रास सुरू होतो. घरातील इतर सदस्यांना देखील याचा त्रास होतो.🟣
मात्र वेळीच यावर काही उपाययोजना केली तर मात्र त्रासाचे प्रमाण कमी होऊ शकते किंवा हा त्रास सहन करण्याची शक्ती प्राप्त होते.🟣
पत्रिकेतील निर्णायक घटक ग्रह व ग्रहयोग व अधिपती पाहून त्यांची उपासना केली तर निश्चितच त्यात फरक पडतो.🟣
अनुमान धक्के ग्रहयोग न पाहता तज्ञ ज्योतिषीय सल्ला घेणे क्रमप्राप्त असते.त्यानुसारच उपाययोजना करणे कधीही श्रेयस्कर ठरते.🟣©️®️

ज्योतिष विषयक मार्गदर्शन व सल्ला
व्हाट्सअप नंबर 9850716088🟦

12/11/2021

जानवे म्हणजे नेमके काय ?...

◆जानव्याला पहिल्या तंतूवर ओमकार असतो
◆दुसर्‍यावर अग्नी असतो
◆तिसर्‍यावर नवनाग असतो
◆चौथ्यावर सोम
◆पाचव्यावर पितर
◆सहाव्यावर प्रजापती
◆सातव्यावर वायू
◆आठव्यावर सुर्यनारायण
◆नवव्यावर विश्वदेव

त्याचे तिन तंतूंचे पिळ असतात असे एकूण नऊ दोरे असतात
असे नऊ सुत्रिचे(तंतू) तिन पदर म्हणजेच •सत्व•रज•तम• हे तिन गुण मिळवून 96 आन्गुळे दोरा लाबं असतो.

(जानवे ९६ बोटे लांब असते असा उल्लेख आहे यांत तुमच्या संमतीने थोडा बदल सूचवितो तो असा...
शहाण्णव चौंगे ( एक चौंगा = चार अंगुळे )लांबी असलेल्या सूतास कोठेही न तोडता त्रिगुणीकरण करून त्यास ब्रह्मगाठ मारून यज्ञोपवीत अर्थात जानवे तयार केले जाते..यांत सुत म्हणजेच सुक्ष्मतंतू किंवा मुख्य धागा होय..! देवतान्यास करतांना तंतू हाच शब्द वापरतात....!
जानवे हे बेंबीपर्यंतच असावे..कमरेच्या खाली जाऊ नये असा संकेत आहे...!
तीन पदरावर तीन वेद व ब्रह्मगाठीवर अथर्ववेद असतो अशी संकल्पना आहे..!तसेच सामुद्रिक शास्त्रात पुरूषाचे प्रमाण स्वत:च्या अंगुळांनी ८४ ते १०८ पर्यंत असते...त्यांची सरासरी ९६ अंगुळे येते..खांद्यापासून बेंबी किंवा कमरेपर्यंत साधारणपणे ३२ अंगुळे अशी येते...३ पदर गृहित धरून ती ९६ अंगुळे अशी व सलग धागा ( न तोडता ) पकडला तर ९६ चौंगे असे माप येते...!)

सविस्तर सांगावयाचे झाले तर
( तंतू हाच शब्द बरोबर आहे. परंतु आपण काही लोक त्याला पदर, दोरा, सूत असे नावाने सुद्धा ओळखतो ..!म्हणजे एका जानव्यात ९ तंतू ...तीन तंतूंचा एक पदर...याप्रमाणे एक जानवे तीन पदरी असते त्यास यज्ञोपवीताचे त्रिसूत्रीकरण म्हणतात..प्रेत्येक पदरास एक गाठ असते त्यास ग्रंथी म्हणतात....देवतान्यास करतांना ९+३ असे १२ मंत्र म्हणतात..!)

नंतर त्याची ●ब्रह्मगाठ● दिलेली असती हि अद्वैताची गाठ म्हणजे जिव व ब्रम्हा एकच आहे.

म्हणून जानवे घालणे हे शास्त्रीय प्रतिक आहे.

● 4 वेद
● 6 शास्र
● अठरा पुराणे जिवो ब्रम्हैव ना पर हिच शिकवण देतात
● 15 कला
● 12 मास
● 7 वार
● 27 नक्षत्र



● प्रकृती
● पुरुष
● महतत्व
● अंहकार
● पंच महाभुते
● पंच विषय
● पंच ज्ञानेद्रिय
● पचं कर्मेद्रिय
● व मन

एकूण 25 आणि 4 वेद 3 काळ ( उन्हाळा हिवाळा व पावसाळा ) व रज सत्व तम हे तिन गुण मिळवून 96 होतात म्हणून जानव्याला 96 बोटे लाबं दोरा असतो
माऊली ज्ञानोबाराय या जानव्याला ज्ञानेश्वरीत नवरत्नाच्या हाराची उपमा देतात...

तो गुण नवरत्नाकारू !
यया नवरत्नाचा हारू !
न फेङितले दिनकरू !
प्रकाश जैसा !
शुभं भवतु

11/11/2021

आगामी गुरुपालट

तारीख 20 नोव्हेंबर 2021
वेळ रात्री 11. 20 वाजता
गुरूमहाराज कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.त्यामुळे राशीनुसार गुरू कसा असेल याविषयी पाहू.
(१) मेष ११ वा
(२)वृषभ १० वा
(३) मिथुन ९ वा
(४) कर्क ८ वा
(५) सिंह ७ वा
(६) कन्या ६ वा
(७) तुला ५ वा
(८) वृश्चिक ४ था
(९) धनु ३ रा
(१०) मकर २ रा
(११) कुंभ १ ला
(१२) मीन १२ वा
* वृश्चिक,कर्क, मीन राशीला अनुक्रमे ४,८,१२ वा गुरू असणार आहे तर,
कुंभ,धनु,कन्या,वृषभ राशीला अनुक्रमे १,३,६,१० वा गुरू असणार आहे
त्यामुळे
वरील राशींनी जप,दान,पूजा,अवश्य करावी.
* मिथुन,तुला,कुंभेला लोहपादाने गुरू येत असल्याने कष्टदायक असणार आहे . तर
*वृषभ, कर्क,धनु राशीला विशेष चिंता भेडसावतील . तरीदेखील सुवर्णपादाने गुरू येत असल्याने तो मात्र शुभच फळ देणार आहे.
*ज्यांचा पत्रिकेतील गुरू मकर राशीचा आहे व ज्यांना ४''८'१२ वा गुरू असणार आहे ,त्यांनी विशेषतः गुरूला प्रसन्न करावे .
*ज्यांचा पत्रिकेतील गुरू धनु,मीन व कर्क राशीचा आहे त्यांना त्यामानाने फारसा त्रास जाणवणार नाही.
*नियमितपणे जे उपासना करत आहेत त्यांना फारसा त्रास जाणवणार नाही.
संदर्भ दातेपंचांग

09/11/2021

मा. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर जी यांच्या सोबत आजच्या पुजेचा योग आला, सुंदर अनुभव आणि मोठी आठवण आमच्यासाठी 💐

सप्त म्हणजे सात, शत म्हणजे शंभर स्त्रीलिंगी रूप-सप्तशती. सातशे श्लोकात्मक त्रिगुणात्मिका शक्तीचे महात्म्यवर्णन म्हणजे सप...
09/11/2021

सप्त म्हणजे सात, शत म्हणजे शंभर स्त्रीलिंगी रूप-सप्तशती. सातशे श्लोकात्मक त्रिगुणात्मिका शक्तीचे महात्म्यवर्णन म्हणजे सप्तशती. व्यास ऋषींनी रचलेल्या अठरापुराणापैकी मार्कंड पुराणातील ८१ ते ९३ अध्यायामधे हे सातशे श्लोक आहेत. तसेच कवच, अर्गला, कीलक ही स्तोत्रे व तीन प्रकारची रहस्य आहेत. या सर्वांच्या एकत्रित पठणाला सप्तशती पाठ असे म्हणतात. असे दहा पाठ वाचून दोन पाठ हवनाचे म्हणजे एकूण बारा पाठ केल्यास पाठात्मक नवचंडी संपन्न होते.
(काही ठिकाणी हवन करणे अशक्य असते, पुरेशी जागा उपलब्ध नसल्यास पाठ वाचन केले जाते)

Address

Pune

Telephone

+919850716088

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prathamesh Bhoj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Prathamesh Bhoj:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram