30/01/2022
खमंग कांदा थालीपिठाचे नाव काढताच तोंडाला पाणी सुटते ! हो की नाही .. कांदा थलिपीठ हा पोळी भाजी ला पर्याय म्हणून सुद्धा केला जातो. काही झटपट पण चविष्ट नाष्टाचा बेत म्हणून कांदा थलिपीठ केले जाते .
करायची कृती .
Servings: २
cooking time : ८ -१० min
साहित्य:
200 ग्रॅम खमंग कांदा थलिपीठ भाजणी कैगा फूडस ची
3-4 कांदे बारीक चिरलेले
1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
1/8 चमचा हिंग पाऊडर
¼ चमचा हळद पाऊडर
¼ चमचा जीरे
बारीक वाटलेली हिरवी मिरची 1 चमचा
लाल तिखट पाऊडर ½ चमचा
पाणी
तेल
मीठ चवीनुसार
कृती
वरील सर्व जिन्नस एकत्र करून त्यात गरजेनुसार थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे.
त्या कणकेचे ४ छोटे छोटे गोळे करावेत. त्यानंतर पोळपाटावर ओल्या रुमालवर हाताने थापावे.
तव्याला चमच्याने थोडे तेल लाऊन पोळपटवरचा रुमाल उचलून तव्यावर थलिपीठ टाकावे . त्यानानंतर ३-४ छिद्रे थलिपीठला करावीत आणि थलिपीठला झाकण घालावे. मंद गॅस वर थलिपीठ भाजून घेऊन दुसऱ्या बाजूने परत भाजावे.
त्यानंतर लोणचे , दही आणि तूप घालून खाण्यास द्यावे .
DM for any requirements