16/11/2025
दिवाळीनंतर वातावरणात एक गारठा जाणवायला लागतो. हवीहवीशी वाटणारी गुलाबी थंडीचे साधारण नोव्हेंबर chya मध्यावर येता येता बोचऱ्या थंडीत रूपांतर होते. वातावरणात, शरीरात रुक्षता जाणवायला लागते अशा वेळी, शरीराला स्निग्धतेची गरज असते. मग ती वेगवेगळ्या माध्यमातून आपण देऊ शकतो. याशिवाय हल्ली वाढलेल्या तणावामुळे, मोबाइल , कॉम्प्युटर च्या वापरामुळे डोळ्यावर ताण येतो, झोप शांत लागत नाही आणि त्यामुळे थकवा वाटतो , उत्साह वाटत नाही. यासाठी आपण आपल्या दिनचर्येमध्ये एक छोटा उपाय करू शकतो. तो म्हणजे रात्री झोपताना तळपायाला मालिश करावी. खोबऱ्याचे तेल घरात उपलब्ध असते त्याने किंवा गायीच्या तुपाने करावी.पूर्वी घरात कांस्याची वाटी उपलब्ध असे. कांस्याच्या थाळीमध्ये जेवण करणे आरोग्यदायी मानलेले आहे. त्याविषयी नंतर बघूया. तर या वाटीने मालिश केल्यास अधिक उत्तम! या मालिश पादाभ्यंग म्हणतात. आयुर्वेदानुसार he थकवा घालवणारे, ताण कमी करणारे, पायांना उत्तम बल देणारे एवढेच नाही तर डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम सांगितलेले आहे. तसेच यामुळे वात प्रकोप कमी होऊन वाताचे विकार होण्याची संभावना कमी होते. शिवाय पायाच्या भेगा कमी होतात. त्याठिकाणी असलेली रुक्षता कमी होते.
या प्रकारच्या किंवा अशा इतर समस्यांसाठी आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्याकरिता DM करा.
त्रिदल आयुर्वेद.