30/04/2026
सकाळी शांत बसता येतं का?
इथूनच hormones (हॉर्मोन्स) समजतात
उठल्या-उठल्या phone, घाई, विचारांची गर्दी…
आणि मग दिवसभर मूड अस्थिर, लक्ष कमी, cravings जास्त
हे केवळ सवय नाही…
हा neuro-hormonal pattern (मेंदू–हॉर्मोन्सचा प्रतिसाद) आहे
समजून घ्या
1️⃣ सकाळचा Cortisol peak (ताण वाढवणारा हॉर्मोन) उठल्यावर नैसर्गिकरीत्या वाढतो (Cortisol Awakening Response).
उठल्या-उठल्या घाई सुरू केली तर
हा peak “stress mode” मध्ये लांबतो
2️⃣ पहिल्या मिनिटांत mobile / stimulation
Dopamine (आनंद देणारं रसायन) artificial spikes होते. नंतर साध्या कामात रस कमी, focus तुटक
3️⃣ शांत बसणं कठीण वाटणं म्हणजे मज्जासंस्था (nervous system) सतत “alert mode” मध्ये आहे
त्यामुळे मन स्थिर ठेवणारं रसायन (Serotonin) संतुलित राहत नाही आणि मन पटकन अस्थिर, चंचल होतं
4️⃣ उठल्या-उठल्या चहा / साखर
Insulin (साखर नियंत्रित करणारा हॉर्मोन) अचानक वाढतो. नंतर energy crash आणि cravings वाढतात
5️⃣ सकाळी प्रकाश (sunlight) आणि हालचाल नसणं. ह्यमुळे body clock (जैविक घड्याळ) reset होत नाही. तसेच stiffness, fatigue, sleep disturbance वाढतात
6️⃣ वय काहीही असो - परिणाम सारखाच
विद्यार्थी: लक्ष तुटक
काम करणारे: anxiety जास्त
ज्येष्ठ: थकवा आणि चिडचिड
7️⃣ फक्त 2–5 मिनिटं शांत बसणारे श्वासावर लक्ष (breathing awareness) लोकांमध्ये
👉 mood stable, cravings कमी
👉 दिवस जास्त controlled
हे वेगवेगळे issues नाहीत…
तर सकाळच्या पहिल्या काही मिनिटांपासूनच सुरू होणारी साखळी आहे
सकाळी nervous system “घाई” मध्ये टाकलं तर दिवसभर शरीर correction करत राहतं
सकाळी 2 मिनिटं थांबलात…
शरीराला पहिला signal मिळतो “शांत राहा”
आणि इथूनच दिवसाचा tone, energy, निर्णय… सगळं बदलायला लागतं
ही post उपयुक्त वाटली तर like ❤️ and share करा
Dr Ravindra L Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 Just for Hearts