07/09/2021
काल तो टीव्ही स्टार सिद्धार्थ अकाली गेला , म्हणून लगेच काही विचारवंत लोक जिम, व्यायाम , अति व्यायाम या विषयावर अर्धवट माहिती पसरवू लागले आहेत , बऱ्याच पोस्ट आल्या आहेत की फक्त योगासने ,थोडा वॉक ,शरिराला झेपेल असा व्यायाम करावा , जिम असे असते तसे असते वगैरे वगैरे त्यासाठी हा लेखन प्रपंच ...
हा सिद्धार्थ सिगारेट आणि दारू च्या व्यसनात होता इतर ही असतील , पण टिव्ही वर स्पर्धात्मक युगात अभिनय क्षेत्रात असल्याने दिखाऊ बॉडी साठी जिमिंग करत होता पण कमी कष्टात बॉडी बनवण्यासाठी वेगवेगळी स्टिरॉइड्स ,इंजेक्शन घेऊन शरीराची हानी करत होता हे सोयीस्कर पणे लोक लिहीत नाहीत , हाय प्रोटीन फूड, व्यसनं आणि ही ड्रग्ज त्यात स्ट्रेस आणि फिल्मी लाइफस्टाइल या मुळे या अश्या घटना घडतात , आणि अश्या तुरळक गोष्टींचा बाऊ करून लगेच व्यायामाला बदनाम केलं जातं ..
मनुष्य जन्म हा वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांचा सामना करून आपली ह्युमन लिमिट्स वाढवून पराक्रम करण्यासाठी आहे हे पूर्वापार चालत आलेले आहे.. त्याशिवाय का सिकंदर जग जिंकायला ग्रीस हुन हिंदुस्थानपर्यंत आला , एव्हरेस्ट सर करण्यासाठी शेकडो लोकांना 50 वर्ष जीवापाड प्रयत्न करावे लागले , 11 सेकंदात 100 मीटर ऑलिम्पिक रेस जिंकणारे , 9.58 सेकंदा पर्यंत पोहचले , हे सतत केलेल्या कष्टाने साध्य होत असते.
समर्थ रामदास 1200 सूर्यनमस्कार रोज मारत असत मग तो अति व्यायाम नव्हता का?? हजारो खेळाडू किती तरी वर्ष सतत अपरिमित शारीरिक कष्ट करून स्वतःला सिद्ध करत असताना मग एखाद्या घटनेवरून व्यायामाला बदनाम का बरे करतात??
अति हव्यासापोटी आणि चुकीच्या मार्गदर्शनामुळे स्टिरॉइड्स अतिरिक्त एक कल्ली आहार , डोळ्याआड केलेली व्यसनं म्हणून या घटना घडतात ...
योग्य व्यायाम योग्य आहार योग्य मार्गदर्शन असेल तर नियमित व्यायाम तुम्हाला अतिशय सुंदर लाइफस्टाइल देतो , तुम्ही आयुष्याचा चहू अंगाने आनंद घेऊ शकता, नवनवीन आव्हानात्मक परिस्थितीत ही ठाम राहू शकता हे या कोविड काळात दिसून आलं आहे..
शेवटी मृत्यू हा प्रत्येकाला येणार आहे च , मग त्यासाठी घाबरून आयुष्य जगणार आहोत का ???
आपण सगळे रोज व्यायाम करू , ट्रेकिंग करू , स्पर्धा खेळू , निरनिराळ्या प्रदेशांना भेटी देऊ, निरनिराळ्या अन्ना चा आनंद घेऊ , पण सतत कार्यरत आणि आहार विहारात योग्य तो नियमित पणा ठेवुन आनंदी सुदृढ आयुष्य हसत खेळत हे ईश्वर कृपेने मिळालेले सुंदर जीवन जगू यात,
फिट रहा
आनंदी रहा
हसत रहा
मजेत जगा ...👍👍
मिलनकुमार परदेशी🙏🙏