Archana Rairikar- NutriSatwa

Archana Rairikar- NutriSatwa good health with nutrition and lifestyle management

आहार कथासर्दीपासून सुरू झालेला प्रवास…तो ३३ वर्षांचा. उंची १८० सें.मी., वजन ९२ किलो.दिसायला मजबूत, पण नेहमी एकच त्रास  स...
01/03/2026

आहार कथा
सर्दीपासून सुरू झालेला प्रवास…

तो ३३ वर्षांचा. उंची १८० सें.मी., वजन ९२ किलो.
दिसायला मजबूत, पण नेहमी एकच त्रास सतत सर्दी, नाक बंद, डोके जड.
सर्दीने तो खूप वैतागला होता
सुरुवातीला त्याने अ‍ॅलोपॅथी उपचार घेतले. थोडा आराम, पण कायमस्वरूपी फरक नाही.
मग तो आयुर्वेदाकडे वळला. औषधी, काढे, दिनचर्या बदल…
हळूहळू सर्दी कमी झाली. त्याला हलकं वाटू लागलं.
आणि वजनही कमी होऊ लागलं.
९२ वरून ८५…
८५ वरून ८०…
त्याला आनंद झाला. “वा! आरोग्य आणि फिटनेस दोन्ही मिळत आहेत!”
पण त्याला अजून “परफेक्ट” व्हायचं होतं.
तो एका यु ट्यूब वरून नॅचरल कोर्समध्ये सामील झाला. तिथे त्याला सांगितलं गेलं
“शरीरातल्या सगळ्या टॉक्सिन्स काढून टाका. हलकं खा. साधं खा. कमी खा.”
आणि एक आहार दिला गेला
त्याने अक्षरशः मनावर घेतलं.
सकाळ फक्त फळे.
मध्यान्ह थोडे ड्रायफ्रूट्स आणि बिया.
दुपार 2 मल्टीग्रेन भाकरी आणि भाजी.
संध्याकाळ फक्त सूप.
बस्स.

दिवसभरात मिळणारे प्रोटीन अवघे २० ग्रॅम.
कॅलरी खूपच कमी.म्हणजे फक्त 800 ते 1000
एका लहान मुलाच्या केलरीज आणि प्रोटीन
वजन ७० किलोवर आलं.
सर्दी गायब होती
पण आता आरशात दिसणारा चेहरा बदलला होता.
गाल आत गेलेले.डोळ्याखाली काळी वर्तुळे.
शरीरात जळजळ.सतत थकवा.

तो म्हणाला, “मी तर हेल्दी होण्यासाठी हे सगळं केलं…”
मग हे काय झालं
मी म्हटलं
हो. पण शरीराला फक्त टॉक्सिन्स नाही तर पोषणही लागते.
स्नायू, व्हिटॅमिन्स, क्षार देखील लागतात.

डिटॉक्स हा प्रवासाचा एक भाग असू शकतो,
पण कायमचं कमी खाणं हा उपाय नाही.
आरोग्य म्हणजे फक्त वजन कमी होणं नाही.
आरोग्य म्हणजे संतुलन.
आणि सर्वात महत्त्वाचं –
कोणाचाही सल्ला आंधळेपणाने पाळू नका.
योग्य शिक्षण आणि अनुभव असलेल्या तज्ञाकडून मार्गदर्शन घ्या.
कारण कधी कधी
आपण आज ज्या गोष्टीला “हेल्दी” समजतो,
तीच उद्या शरीरासाठी ओझं ठरू शकते.

नुसता आजार बर करणं इतकंच ध्येय नको
शरीराला त्याबरोबर पोषण ही मिळायला हवे

अर्चना रायरीकर

*Diet Tip of the Day* :🌾 Eat One Local Grain TodayAdd one traditional Indian grain to your meals  like nachni (ragi), jo...
27/02/2026

*Diet Tip of the Day* :

🌾 Eat One Local Grain Today

Add one traditional Indian grain to your meals like nachni (ragi), jowar, bajra, or varai.
For .....
✅ Better digestion
✅ More fiber ,better gut health
✅ Steady energy (no sudden sugar spikes)
✅ Rich in minerals like iron & calcium

26/02/2026
अरे हळू खा… काय किती घाई?? 😄अरे ठसका लागेल, जरा बेताने…अरे काय कधीही खायला मिळालं नसल्यासारखं खातोय?असं ऐकत ऐकतच आपण मोठ...
21/02/2026

अरे हळू खा… काय किती घाई?? 😄
अरे ठसका लागेल, जरा बेताने…
अरे काय कधीही खायला मिळालं नसल्यासारखं खातोय?

असं ऐकत ऐकतच आपण मोठे झालो… पण खरं सांगायचं तर आजकाल सावकाश जेवायला वेळ कोणाला आहे? ऑफिसची घाई, क्लास, योगा, जिम, मीटिंग्स… आणि त्यात multi-tasking चा बादशहा आपण — एकीकडे मोबाईल, एकीकडे लॅपटॉप आणि मध्ये बेचारा डबा! 🍱

असं करताना “जेवण” हा एक अनुभव आहे हे आपण विसरूनच जातो.

पण जरा हळू खाल्लं तर फायदे मात्र full on आहेत 👇

🥗 पचनक्रिया सुधारते – नीट चावून खाल्लं की अन्न पचायला सोपं. ऍसिडिटी, गॅसेस, पोट साफ न होणं यांना थोडं ब्रेक लागतो.

🥗 पोषक तत्वांचे शोषण वाढते – शरीर म्हणतं, “वा! आज मला वेळ मिळालाय काम करायला!” 😌

🥗 वजन नियंत्रणात राहते – सावकाश खाल्लं की पोट म्हणतं, “बस्स झालं!” आणि आपण over-eating पासून वाचतो.

😁 दात आणि हिरड्यांचं आरोग्य – जास्त लाळ तयार होते, म्हणजे तोंडातला acid शांत… अगदी peace treaty!

🧘‍♀️ तणाव कमी होतो – हळू खाल्लं की मनही slow motion मध्ये जातं… आणि शरीर रिलॅक्स मोडमध्ये.

एकंदरीत काय…
जेवण ही रेस नाही, ती एक छोटीशी meditation आहे.

मग आजपासून प्रयत्न करूया —
“Slow eating… Happy living!” 🙏

19/02/2026

Interview part 1



18/02/2026

Diet food can be tasty

DietitianTips

Guess what?
18/02/2026

Guess what?

18/02/2026

Walking in nature gives you a lot....

Address

Kothrud
Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Archana Rairikar- NutriSatwa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category