My Write Up

My Write Up Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from My Write Up, Medical and health, Jaydeo Nagar, Pune.

विवाह विषयक समस्या, नोकरी, उद्योग धंदा, परदेश गमन, घर घेणे, घर विकणे, जमिनीचे व्यवहार, मानसिक व शारीरिक आजार ह्यावर कुंड...
29/01/2026

विवाह विषयक समस्या, नोकरी, उद्योग धंदा, परदेश गमन, घर घेणे, घर विकणे, जमिनीचे व्यवहार, मानसिक व शारीरिक आजार ह्यावर कुंडलीच्या सहाय्याने पारंपरिक व कृष्णमूर्ती पद्धतीने मार्गदर्शन.
पूर्वनियोजित वेळेनुसार.
ज्योतिष शास्त्री अजेय विष्णू उपाध्ये
H202, वृंदावन हाईट्स
वृंदावन हाउसिंग कॉम्प्लेक्स
डी पी रोड, कोथरूड
पुणे 411038
मोबाइल - 9422521672

हा माझा ब्लॉग आहे.  आपणास तो आवडेल अशी आशा करतो.Anxiety [भीती]Anxiety म्हणजे भीती.  आपण भाषणाला उभे रहाताना किंवा परीक्ष...
13/10/2025

हा माझा ब्लॉग आहे. आपणास तो आवडेल अशी आशा करतो.
Anxiety [भीती]
Anxiety म्हणजे भीती. आपण भाषणाला उभे रहाताना किंवा परीक्षेला जाताना जी भीती वाटते ही तात्कालिक भीती असते.
ही भीती जेव्हा दैनंदिन जीवनात येते आणि दैनंदिन जीवन अडचणीचे करते त्यावेळेला त्याला Anxiety असे म्हणतात.
उदाहरणार्थ, एखादी व्यक्ति / रुग्ण ज्यावेळी पुणे ते मुंबई सारख्या छोट्या प्रवासातही सतत सतत प्रसाधनगृहात जाते, त्यावेळी अशी भीती त्या व्यक्तीला / रुग्णाला दैनंदिन जीवनात अडचणीची किंवा त्रासदायक ठरते.

ही भीती औषधोपचाराने बरी होते. या भीतीची कारणे अशी असतात की वयाच्या 20-21 वर्षांपूर्वी ती व्यक्ति ज्या कठीण काळातून जाते त्याचा परिणाम नंतरच्या आयुष्यावर होतो. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ति सतत आजारी असणे, कामाचे स्वरूप तणावपूर्ण असणे किंवा आपल्या जवळची एखादी व्यक्ती मृत होणे, डिप्रेशन, अनुवंशिकता, आत्ताच्या काळात ड्रग्स किंवा दारूची सवय इत्यादी अनेक कारणाने भीती मनात रुजते.

ही भीती दूर करण्यासाठी सायकोथेरपी ही उत्तमच आहे पण आयुर्वेदात कोणती औषधे आहेत याचा विचार करताना मला सार्थ वाग्भटामधील एक श्लोक आठवला. त्या श्लोकाचा अर्थ म्हणजे शुक्रधातूपासून सर्वात उत्तम सत्व व तेज निर्माण होते ज्याला ‘ओज’ असे म्हणतात. त्याचे स्थान हृदय असते. आपण सामान्य भाषेत ‘ओजस्वी व्यक्ती’ असे म्हणतो. हेच ते ओज. ओजस्वी व्यक्ती कोणालाही भीत नाही पण हे ओज कमी झाले की मनुष्य भित्रा व दुर्बळ होतो. त्यावर आयुर्वेदात उपाय काय सांगितला आहे ? ओज वाढविण्यासाठी बरीच औषधे आयुर्वेदात आहेत. पण माझ्या आवडीचा ‘पूर्ण चंद्रोदय’ हा कल्प आहे. अशाच पद्धतीची अर्थपूर्ण नावे आयुर्वेदातील कल्पांसाठी आहेत.

पहा, ज्योतिष शास्त्रात चंद्र हा मनाचा कारक आहे असे ज्योतिषी सांगतात आणि मनातील भीती घालवण्यासाठी हे औषध आहे. म्हणूनच ह्या कल्पाला ‘पूर्ण चंद्रोदय’ असे म्हणतात.
‘पूर्ण चंद्रोदय’ यालाच ‘मकरध्वज’ असेही संबोधले जाते.
एका दिवसात भीती गेली असे होत नाही. म्हणून सातत्याने औषधोपचार व सायकोथेरपी घेणे अत्यंत जरूरीचे आहे.
अर्थात हा कल्प वैद्यांना विचारल्याशिवाय घेऊ नये.

वैदयराज अजेय विष्णू उपाध्ये
आयुर्वेदाचार्य आणि ज्योतिष शास्त्री
मोबाईल नंबर : 9422521672

आजकालच्या तणावपूर्ण, स्पर्धात्मक आणि बैठ्या जीवनशैलीमुळे तब्येतीच्या अनेक तक्रारी तरुणपणातच मुलींना किंवा महिलांना भेडसा...
12/03/2025

आजकालच्या तणावपूर्ण, स्पर्धात्मक आणि बैठ्या जीवनशैलीमुळे तब्येतीच्या अनेक तक्रारी तरुणपणातच मुलींना किंवा महिलांना भेडसावू लागल्या आहेत. मुलींमध्ये PCOD, PCOS, दाढी मिशा येणे, स्थूलता, पाळीच्या तक्रारी, लग्नानंतर गर्भधारणेत अडचणी अशा अनेक समस्या वाढू लागल्या आहेत. ह्या सर्व समस्यांचे निवारण हे आयुर्वेदिक उपचारांनी शक्य आहे. तज्ज्ञ आयुर्वेदिक सल्लागारांकडून योग्य ते आयुर्वेदिक उपचार घेतल्यास वरील सर्व त्रासातून सुटका होऊ शकते.
वैद्य अजेय विष्णू उपाध्ये
कोथरूड, पुणे
मोबाईल 9422521672

कुंडली ही फार बोलकी असते. जातकाचा स्वभाव, आवडीनिवडी, त्याची जीवनशैली ह्याविषयी अभ्यासकाला बरेच काही उकलून सांगते. जातकाल...
25/09/2024

कुंडली ही फार बोलकी असते. जातकाचा स्वभाव, आवडीनिवडी, त्याची जीवनशैली ह्याविषयी अभ्यासकाला बरेच काही उकलून सांगते. जातकाला जर एखादा आजार झाला असेल किंवा होणार असेल तर तो जातकाच्या कुंडलिमधील कोणत्या दोषांमुळे झाला आहे किंवा होणार आहे हे पटकन समजून येते. Prevention is better than cure ह्या म्हणीप्रमाणे आरोग्य ज्योतिषाच्या सहाय्याने आपण हे आजार टाळू शकतो किंवा लवकर आणि कायमचे बरे करु शकतो असे माझा अनुभव सांगतो.

आयुर्वेदाने संधीवात, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, अतिसार, महिलांच्या मासिक समस्या, PCOD, PCOS,  सोरायसिस, चेहेऱ्यावरील डाग, मुर...
18/09/2024

आयुर्वेदाने संधीवात, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, अतिसार, महिलांच्या मासिक समस्या, PCOD, PCOS, सोरायसिस, चेहेऱ्यावरील डाग, मुरूम, पुटकुळ्या, अस्थमा, नैराश्य, अनिद्रा यासारख्या अनेक समस्यांवर गुणकारी अशी औषधे सांगितली आहेत कि ज्यामुळे ह्या समस्या कायमस्वरूपी बऱ्या होतात. त्यासाठी आपल्या आयुर्वेदशास्त्रावर संपूर्ण विश्वास मात्र आवश्यक आहे.

19/08/2024

आरोग्य ज्योतिष म्हणजेच Medical Astrology ह्याचा नक्की अर्थ काय? तर एखादया व्यक्तीला एखादा आजार झाला असेल तर त्या व्यक्तीची clinical examination करून त्या आजाराचे निदान करणे आणि औषधोपचार करणे. हे काम Doctor किंवा वैद्यराज करतात. ह्या तपासण्यांच्या जोडीला जर त्या व्यक्तीची कुंडली तपासली तर? ग्रह नक्षत्रांचा त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर काय परिणाम झाला आहे किंवा होणार आहे हे तपासले तर? असे केले असता त्या व्यक्तीच्या आजाराचे कारण शोधणे आणि कोणते औषधोपचार करावे हे ठरवणे अधिक सोपे होते आणि अचूक सुद्धा. ह्यालाच म्हणतात आरोग्य ज्योतिष म्हणजेच Medical Astrology. तुम्हाला जर Medical Astrologer कडून सल्ला हवा असेल तर माझ्याशी अवश्य संपर्क साधा.
वैद्य अजेय उपाध्ये
मोबाईल 9422521672

आजकालच्या तणावपूर्ण, स्पर्धात्मक आणि बैठ्या जीवनशैलीमुळे तब्येतीच्या अनेक तक्रारी तरुणपणातच मुलींना किंवा महिलांना भेडसा...
22/07/2024

आजकालच्या तणावपूर्ण, स्पर्धात्मक आणि बैठ्या जीवनशैलीमुळे तब्येतीच्या अनेक तक्रारी तरुणपणातच मुलींना किंवा महिलांना भेडसावू लागल्या आहेत. मुलींमध्ये PCOD, PCOS, दाढी मिशा येणे, स्थूलता, पाळीच्या तक्रारी, लग्नानंतर गर्भधारणेत अडचणी अशा अनेक समस्या वाढू लागल्या आहेत. ह्या सर्व समस्यांचे निवारण हे आयुर्वेदिक उपचारांनी शक्य आहे. तज्ज्ञ आयुर्वेदिक सल्लागारांकडून योग्य ते आयुर्वेदिक उपचार घेतल्यास वरील सर्व त्रासातून सुटका होऊ शकते.

Medical Astrology म्हणजेच आरोग्य ज्योतिष : ज्योतिष आणि आयुर्वेद ही दोन्ही प्राचीन काळापासून आजपर्यंत अभ्यासलेली आणि मनुष...
22/07/2024

Medical Astrology म्हणजेच आरोग्य ज्योतिष :

ज्योतिष आणि आयुर्वेद ही दोन्ही प्राचीन काळापासून आजपर्यंत अभ्यासलेली आणि मनुष्यमात्रांसाठी उपयुक्त ठरलेली शास्त्रे आहेत. ह्या दोन्ही शास्त्रांची सांगड घातली तर आपल्याला भविष्यात कोणत्या व्याधी होऊ शकतील तसेच त्या टाळण्यासाठी कोणते उपाय करता येतील हे समजून घेता येते. तसेच एखादी व्याधी त्रास देत असेल असेल तर ती व्याधी का झाली आणि त्या व्याधीवर मात कशी करायची हेही आपण ठरवू शकतो. आपणास Medical Astrology म्हणजेच आरोग्य ज्योतिष सल्लागारांकडून मार्गदर्शन हवे असेल तर आमच्याशी अवश्य संपर्क साधा.
वैद्यराज अजेय विष्णू उपाध्ये
Astro-Ayurveda क्लिनिक
कोथरूड पुणे
Mob : 9422521672

सध्याच्या तणावपूर्ण आणि बैठ्या जीवनशैलीमुळे पोटाच्या म्हणजेच पचनाच्या अनेक समस्या लोकांना भेडसावू लागल्या आहेत. गॅसेस, प...
22/07/2024

सध्याच्या तणावपूर्ण आणि बैठ्या जीवनशैलीमुळे पोटाच्या म्हणजेच पचनाच्या अनेक समस्या लोकांना भेडसावू लागल्या आहेत. गॅसेस, पोट फुगणे म्हणजेच bloating, अॅसिडीटी,मळमळ, बद्धकोष्ठता असे अनेक त्रास तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना सतावत आहेत. ह्या त्रासांवर आयुर्वेदाने अनेक साधीसोपी औषधे सांगितली आहेत. ही औषधे योग्य वेळी, नियमितपणे घेतली तसेच आयुर्वेदाचार्य सांगतील ते पथ्य नीट पाळले तर वरील सर्व त्रास थोड्याच दिवसात बरे होतील हे नक्की.

ज्योतिष आणि आयुर्वेद ही दोन्ही प्राचीन शास्त्रे आहेत. ह्या दोन्ही शास्त्रांची सांगड घातली तर आपल्याला भविष्यात कोणत्या व...
21/07/2024

ज्योतिष आणि आयुर्वेद ही दोन्ही प्राचीन शास्त्रे आहेत. ह्या दोन्ही शास्त्रांची सांगड घातली तर आपल्याला भविष्यात कोणत्या व्याधी होऊ शकतील तसेच त्या टाळण्यासाठी कोणते उपाय करता येतील हे समजून घेता येते. तसेच एखादी व्याधी त्रास देत असेल असेल तर ती व्याधी का झाली आणि त्या व्याधीवर मात कशी करायची हेही आपण ठरवू शकतो. आपणास Medical Astrology म्हणजेच आरोग्य ज्योतिष सल्लागारांकडून मार्गदर्शन हवे असेल तर आमच्याशी अवश्य संपर्क साधा.
वैद्यराज अजेय विष्णू उपाध्ये
Astro-Ayurveda क्लिनिक
कोथरूड पुणे
Mob : 9422521672

1६ जून, २०२४ हा माझा आजचा ब्लॉग आहे. आपणांस तो आवडेल अशी आशा करतो. संधिवात - शुभस्य शीघ्रम IIमी आत्ता संधिवात म्हणजे Ost...
16/06/2024

1६ जून, २०२४
हा माझा आजचा ब्लॉग आहे. आपणांस तो आवडेल अशी आशा करतो.

संधिवात - शुभस्य शीघ्रम II

मी आत्ता संधिवात म्हणजे Osteoarthritis बद्दल लिहिणार नाही कारण संधिवात या विषयावर बऱ्याच वैद्य व डॉक्टरांनी बरीचशी माहिती निरनिराळ्या लेखांमध्ये प्रसिद्ध केली आहे. Osteoarthritis मध्ये जो itis हा शब्द आहे त्याचा अर्थ सूज येणे किंवा inflammation असणे असा आहे. सांध्यांच्या ठिकाणी सूज आली की वेदना होऊ लागतात. त्यानंतर आपले त्या अवयवाकडे लक्ष जाते. म्हणूनच त्याला संधि व वात म्हणजेच ‘संधिवात’ म्हणतात.
मानेचे सांधे, खांद्याचा सांधा, कोपराचा सांधा, मनगटाचा सांधा, बोटांचे सांधे, कंबर, मणक्यांचा सांधा, कंबर व पायाच्या मधल्या सांधा [हिप जॉइंट], गुडघे, तळपायाचे सांधे, घोट्याचा सांधा यांच्यात वेदना झाली की आपले लक्ष जाते. हीच ती वेळ ज्यावेळी योग्य चिकित्सा केली व आपली प्रत्येक हालचाल योग्य पद्धतीने केली की आजार दूर पळतो.
पृथ्वी आपल्या गुरुत्वाकर्षणाने प्रत्येक व्यक्तीला स्वतःकडे ओढून घेत असते. सहज आपण उडी मारली तरी आपल्याला गुरुत्वाकर्षण काय असते ते कळेल. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुरुत्वाकर्षणाचा केंद्रबिंदू गुदाची जागा (a**s) असते. ज्यावेळी आपण नॉर्मल पोझिशनमध्ये असतो त्यावेळी गुरुत्वाकर्षणाची जागा गुदद्वारावर असते. हा गुरुत्वाकर्षणाचा केंद्रबिंदू हालचाल करताना बदलतो. सतत त्याच पद्धतीने आपण हालचाल करत राहिलो तर केंद्रबिंदूच्या बदललेल्या ठिकाणी आपल्याला वेदना होण्याची शक्यता असते.
आपण मिलिटरीचे जवान चालताना बघतो. त्यांचे पाय सरळ एका रेषेत पडतात. ते पायाचा पंजा आधी टेकतात, नंतर पायाची बोटे टेकतात. मिलिटरीची परेड बघून त्यांच्यासारखे चालणे तुम्ही जमवले तर कधी पायाचे सांधे म्हणजेच घोट्याचा सांधा, गुडघे इत्यादि दुखणार नाहीत.
जे स्थूल शरीराचे आहेत त्यांनी पायामध्ये थोडे अंतर ठेवून चालावे.
आपण स्कूटर, मोटरसायकलवर बसत असताना दोन्ही हाताने बटक् मसल्स बाहेरच्या बाजूला काढून मग बसावे. असे केल्याने कंबर सरळ राहील. पाठ आणि कंबर दुखणार नाही.
छाती व छातीच्या मागचे मणके कसे असावेत यासाठी तुम्ही BOLLYWOOD मधला नायक Sylvester Stallone चा पिक्चर बघा. त्यामधील नायकाचे खांदे शरीराच्या मागे असतात व खाली खेचलेले असतात. त्याप्रमाणे खांदे नेहेमी असावेत.
मान दुखत असेल तर ती पुढच्या बाजूस वक्री होते. त्यामुळे अधिकच दुखू लागते. साधी सोपी पद्धत म्हणजे आपण समोर दृष्टीला दिसते त्यापेक्षा वरच्या भागात दृष्टी न्यावी म्हणजे आपोआप मान मागे जाते.
अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपण गुरुत्वाकर्षणाचे भान ठेवून आपल्या हालचाली केल्या तर उतारवयात होणारे संधीवातासारखे आजार टाळता येतील. मग वेळ कशाला दवडायचा. आत्ताच सुरुवात करूया. शुभस्य शीघ्रम ll

वैद्यराज अजेय विष्णू उपाध्ये
कोथरूड, पुणे
मोबाइल : ९४२२५२१६७२
वेबसाइट : www.astroayurveda.online

आयुर्वेद हे आपल्या देशात  हजारो वर्षे अभ्यासले गेलेले एक सखोल असे शास्त्र आहे. ह्या शास्त्राने अनेक रोगांवर  अत्यंत प्रभ...
14/06/2024

आयुर्वेद हे आपल्या देशात हजारो वर्षे अभ्यासले गेलेले एक सखोल असे शास्त्र आहे. ह्या शास्त्राने अनेक रोगांवर अत्यंत प्रभावशाली आणि परिणामकारक अशी औषधे सांगितली आहेत. ही औषधे रुग्णाला रोगमुक्त करून एक निरामय आयुष्य प्रदान करतात.

Address

Jaydeo Nagar
Pune

Website

http://www.astroayurvedalogy.com/

Alerts

Be the first to know and let us send you an email when My Write Up posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram