10/12/2020
नियम ..1
मंथन होतच राहणार.
राजे वाढले की युद्ध होणार, मूर्ख वाढले की दारिद्य्र येणार, संयम नसेल तर नुकसान होणार,संत वाढलें की शत्रू वाढणार, जास्त दिवस गप्प राहाल तर वाचा जाणार, समपर्कात राहाल तर सहकार्य मिळनार, उंचावर राहाल तर एकटे पडनार.
नियम..2
जसे कराल ..तसेच परत मिळेल.
प्रेम करा, जाणीव ठेवा, सहकार्य करा, आपुलकी ठेवा, धीर धरा, गोड बोला, ज्ञान द्या, वाटून खा, दान करा, मदतीस पुढाकार घ्या, बरोबरीने वागवा, समान समजा,मान ठेवा,दुर्बलांचे रक्षण करा .
वरील प्रमाणे वागलात तर बदल्यात तेच मिळेल... विरुद्ध वागायचे का वरील प्रमाणे ते ठरवा.
नियम..3
कोणतीच गोष्ट कायम राहत नाही .
सत्ता असो सम्पत्ती असो किंवा पद ,वय ,परिस्थिती,अवस्था,जात, पत, गरिबी, श्रीमंती, अज्ञान ,ज्ञान ...हे सर्व बदलणार.
...या जगाच सत्य खरच जाणायच असेल ..तर आदि ..स्वतःला अभ्यासू बनवा... वाचा.
माणसे वाचा, परिस्थिती वाचा, घटना वाचा, पक्ष वाचा ,पुढारी वाचा, शोध वाचा, भूतकाळ वाचा, भविष्य वाचा, वर्तमान वाचा.(काय वाचावे कसे वाचावे..? याचे नियम पण वाचा).
साठलेल्या सद्सद्विवेक बुद्धीचा जीवनात वापर करा.
नियम ..४
सर्वात विद्वान निसर्ग आहे ..मनुष्य नाही.
प्रत्येक गोष्टीचा अंत निश्चित आहे..निसर्गात नियम आहेत.. नियमानुसार ...विलीन होणे किंवा लुप्त होणे नष्ट होणे रूपांतरित होणे निश्चित आहे ..जसे.. कोळशाचा हिरा होतो, लोखंडाचे गंजल्याने माती होते, आगीचे राख होते....निसर्गाचा नियम आहे ..निसर्ग कधीच पक्षपात करत नाही.
- सुभाष औरादकर - 10 Dec 2020