07/06/2025
परीक्षेपूर्वी मार्गदर्शन, नंतर यशाचा गौरवसोहळा!
१०वी आणि १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
निरामय वेलनेस सेंटर आयोजित १०वी आणि १२वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा नुकताच पार पडला. या वेळी परीक्षेपूर्वी ‘निरामय विद्या प्रोग्राम' या अभिनव उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. निरामयच्या संचालिका सौ. अमृता चांदोरकर व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या निवृत्त उपप्राचार्या सौ. कांचन शेंडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशंसापत्र व गौरवचिन्ह देऊन भूषविण्यात आले.
निरामय विद्या प्रोग्रामद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात साहाय्य झालेच, शिवाय मानसिक स्थिरता, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या ऊर्जा उपचार प्रक्रियेवरचाही विश्वास दृढ झाला.
स्वयंपूर्ण ऊर्जा उपचारांमुळे – शांत व तणावरहित मन, सुधारलेली एकाग्रता आणि सकारात्मक विचारशक्ती साध्य झाली.
ज्यामुळे शालेय परीक्षेपेक्षा विद्यार्थ्यांचे १५ ते ३५% गुण बोर्डाच्या परीक्षेत वाढल्याचे दिसून आले. या यशस्वी वाटचालीत पालकांप्रमाणेच ‘निरामयही’ त्यांच्यासोबत उभे होते.
विद्यार्थ्यांच्या जिद्दीला, सातत्याला आणि आत्मविश्वासाला सलाम!
निरामय परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा!
#स्वयंपूर्णऊर्जा #10वी12वी