01/10/2025
"गांधी जयंती" निमित्त
स्वास्थ्यबोध नेचर क्युअर अँड रिसर्च फाउंडेशन आणि केळकर्स हेल्थ सोल्युशन्स तर्फे विशेष कार्यक्रम
🌿 खादी विचार आणि निसर्गोपचार 🌿
कापसापासून कापड बनवणाऱ्या सुताचा धागा शालेय शिक्षण आणि स्वास्थ्याशी कसा जोडतो हे प्रत्यक्ष दाखवणारा कार्यक्रम
(सरकी ते कापड याचे प्रात्यक्षिक)
✨ विशेष निमंत्रित:
रुबी रमा प्रविण (Consultant at Oneirix Labs, Educational Volunteer)
🗓 दिनांक: 4 ऑक्टोबर 2025
🕕 वेळ: संध्याकाळी 6 ते 8
📍 स्थळ: केळकर हेल्थ सोल्युशन्स, सदाशिव पेठ, पुणे
मुख्य विषय निसर्गोपचार असला तरी गांधीजयंतीचे निमित्त आणि औचित्य या कार्यक्रमामागे आहे. त्यामुळे ही विशेष टिप्पणी देत आहे:
गांधीजींबाबत स्वातंत्र्यलढा, चळवळी, राजकीय, सामाजिक वगैरे अनेक विषयात तात्विक, वैचारिक, सैद्धांतिक इत्यादि अनेक पातळ्यांवर मतमतांतरे असतात, असू शकतात. परंतु आपला कार्यक्रम हा मुख्यतः निसर्गोपचार या विषयाशी संबंधीत आहे.
स्वास्थ्य हा आपल्या जीवनाशी प्रत्यक्ष निगडित आणि सर्वव्यापी दाखवणारा कार्यक्रम आहे. त्यावरील निसर्गोपचार या कार्यपद्धतीबद्दलच्या या कार्यक्रमाला आपल्याला आग्रहाचे आणि मित्रत्वाचे निमंत्रण आहे. तज्ज्ञांच्या विचारांचा आणि अनुभवाचा अवश्य लाभ घ्यावा.
Kelkar’s Health Solutions
+919423861427
Kelkarshealthsolution@gmail.com
www.khshealth.com
Imanah
Ministry of Ayush, Government of India
National Institute of Naturopathy, Pune
Anand Kelkar
Madhavi Gokhale
Deepa Mandke