Sarhad

Sarhad This is the official page of "Sarhad",an NGO & educational organization based in Pune,India

Sarhad meaning border is an NGO and educational organization based in Pune which has dedicated itself to peace & humanity. And to assist in education, healthcare, rural, industrial & economic development in the violence affected regions, defining the strife ridden border areas. The year 2008 began with possibilities of Sarhad reaching out to the people in Afghanistan, Sri Lanka, Nepal Bangladesh etc to initiate activities that can bring peace, harmony and development in their respective troubled areas.

SarhadLokmat, Pune 28 Nov 2025
28/11/2025

Sarhad
Lokmat, Pune
28 Nov 2025

SarhadNavbharat, Pune 28 Nov 2025
28/11/2025

Sarhad
Navbharat, Pune
28 Nov 2025

देशासाठी गुरू तेग बहादुर जी यांचे बलिदान अविस्मरणीय : चंद्रकांत पाटीलगुरू तेग बहादुर जी यांचा जाज्वल्य इतिहास ग्रंथालयां...
27/11/2025

देशासाठी गुरू तेग बहादुर जी यांचे बलिदान अविस्मरणीय : चंद्रकांत पाटील
गुरू तेग बहादुर जी यांचा जाज्वल्य इतिहास ग्रंथालयांद्वारे समाजापर्यंत पोहोचविणार : चंद्रकांत पाटील
नांदेडच्या गुरू गोविंदसिंग अध्यासन केंद्राचे बळकटीकरण करणार : चंद्रकांत पाटील
सरहद, पुणेतर्फे गुरू तेग बहादुर जी यांच्या ३५०व्या शहीदी वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांचा शुभारंभ
‘गुरू तेग बहादुर जी’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : हिंदुस्तानवर सातत्याने होणारी परकीय आक्रमणे रोखण्यात देशातील मोजक्या राज्यांचे मोठे योगदान आहे. यात महाराष्ट्रासह पंजाबचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. गुरू तेग बहादुर जी यांचे बलिदान अविस्मरणीय असून त्यांच्या प्रयत्नातून धर्मावरचा आघात रोखला गेला. हा जाज्वल्य इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या कार्याची माहिती देणारे पुस्तक महत्वाचे ठरेल, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक ग्रंथालयात गुरू तेग बहादुर जी यांच्यावरील पुस्तक पोहोचविण्याचा तसेच नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील गुरू गोविंदसिंग अध्यासन केंद्राचे बळकटीकरण करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
सरहद, पुणेतर्फे गुरू तेग बहादुर जी यांच्या ३५०व्या शहीदी वर्षानिमित्त वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा तसेच ‘गुरू तेग बहादुर जी’ या पुस्तकाचे प्रकाशन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुनानक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संतसिंग मोखा होते तर गुरुद्वारा दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग साहनी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सरहद, पुणेचे संस्थापक संजय नहार, विश्वस्त डॉ. शैलेश पगारिया, डॉ. अमोल देवळेकर, शैलेश वाडेकर, अनुज नहार मंचावर होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आज (दि. २६) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, पुस्तक माणसाच्या जीवनाला दिशा देण्याचे कार्य करते. आपल्या देशात ग्रंथांना गुरू मानले गेले आहे. ‘गुरू तेग बहादुर जी’ या पुस्तकाच्या माध्यमातून गुरू तेग बहादुर जी यांचे बलिदान जनसामान्यांपर्यंत पोहोचावे, त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी याविषयी सघन काम होणे आवश्यक आहे.
प्रास्ताविकात संजय नहार म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यात गुरू तेग बहादुर जी यांनी मोलाचे कार्य केले. त्यांच्या ३५०व्या शहीदी वर्षानिमित्त देशात येत्या वर्षभरात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत, त्यांचा प्रारंभ या पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या द्वारे शिखांचा इतिहास देशभरात पोहोचविण्यास मदत होईल.
चरणजित साहनी म्हणाले, गुरू तेग बहादुर जी यांच्या कार्याविषयी चित्रकथेच्या माध्यमातून सोप्या शब्दात या पुस्तकात माहिती देण्यात आली आहे. वर्षभरात शाळा-शाळांमध्ये हे पुस्तक वितरित केले जाईल, ज्या योगे गुरू तेग बहादुर जी यांचे कार्य जनसामन्यांच्या मनात रुजविले जाईल. विद्यार्थ्यांनी हा इतिहास जाणून घ्यावा असे सांगून साहनी म्हणाले गुरू तेग बहादुर जी यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित निबंध स्पर्धाही घेण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचाल लेशपाल जवळगे यांनी केले तर आभार अनुज नहार यांनी मानले. ना. चंद्रकांत पाटील यांचे स्वागत डॉ. अमोल देवळेकर, संतसिंग मोखा, चरणजितसिंग साहनी यांनी केले.

#गुरूतेगबहादुरजी #शहिदीदिवस३५०वर्ष #बलिदानअविस्मरणीय #सिखइतिहास #धर्मसंरक्षण #चंद्रकांतपाटील #पुस्तकप्रकाशन #सरहदपुणे

SarhadMaharashtra Times, Pune 27 Nov 2025
27/11/2025

Sarhad
Maharashtra Times, Pune
27 Nov 2025

SarhadSakal, Pune 27 Nov 2025
27/11/2025

Sarhad
Sakal, Pune
27 Nov 2025

SarhadPunyanagari, Pune 24 Nov 2025
24/11/2025

Sarhad
Punyanagari, Pune
24 Nov 2025

SarhadMaharashtra Times, Pune 24 Nov 2025
24/11/2025

Sarhad
Maharashtra Times, Pune
24 Nov 2025

SarhadLokmat , Pune 24 Nov 2025
24/11/2025

Sarhad
Lokmat , Pune
24 Nov 2025

📍 पुणे भाषांच्या सर्वांगीण विकासासाठी इको सिस्टम घडवणारे नेतृव मराठीने स्वीकारावे: सदानंद मोरे दिल्ली येथे आयोजित ९८ व्य...
23/11/2025

📍 पुणे

भाषांच्या सर्वांगीण विकासासाठी इको सिस्टम घडवणारे नेतृव मराठीने स्वीकारावे: सदानंद मोरे

दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी घेण्यात आलेल्या ९८ साहित्यिक कार्यक्रमांच्या स्मरणिकेचे प्रकाशन पुणे येथील माधवराव पटवर्धन सभागृहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून राज्याच्या मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मराठीला मिळालेला अभिजात दर्जा साजरा करण्याच्या उत्सवी मानसिकतेतून आता बाहेर येत कृतीशील दृष्टीकोन स्वीकारण्याची ही वेळ असल्याचे मत डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ‘भाषिणी’ ॲपचा पहिला ट्रान्सक्राईब उपयोग सर्वात यशस्वीपणे मराठी भाषेने करून दाखवला असून आता अभिजात दर्जाप्राप्त भारतीय भाषांचे एकत्रित नेतृत्व मराठीने स्वीकारावे, यासाठी शासनाने ठोस रोडमॅप आखला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मराठी भाषा अभिजात आहे हे देशापुढे सिद्ध करण्यासाठी सरकार, साहित्यसंस्था आणि महामंडळांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी ही ज्ञानरसाळपणे सर्वसामान्य जनतेपर्यंत विज्ञान, तत्त्वज्ञान आणि अध्यात्म पोहोचवणारी पहिली भाषा कशी ठरली, हे सांगत अभिजात भारतीय भाषांच्या विकासाचे राष्ट्रीय नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारले पाहिजे, असे स्पष्टपणे प्रतिपादन केले. शासनाने हे नेतृत्व स्वीकारले पाहिजे आणि या प्रवासात सर्व साहित्यसंस्था, लेखक, संशोधक आणि सांस्कृतिक संघटनांनी स्वयंस्फूर्तपणे शासनाच्या पाठीशी उभे राहणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी आवाहन केले. मराठी भाषेचे पूर्वरूप, महाराष्ट्री प्राकृतचे योगदान आणि तंजावूरच्या भोसले घराण्याचे महत्त्वपूर्ण भाषाविषयक कार्य यांचा ऊहापोह करत, मराठी भाषेसाठी आता सक्षम "इको सिस्टीम" उभारण्याची आवश्यकता असल्यावर त्यांनी भर दिला.

कार्यक्रमात लेखक संजय सोनवणी यांनी स्मरणिकेच्या संपादनाविषयी माहिती दिली आणि दिल्लीतील साहित्य संमेलनाने सर्वसामान्यांना कशाप्रकारे जोडले याचे प्रभावी दस्तऐवजीकरण या स्मरणिकेत असल्याचे सांगितले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी ९८व्या संमेलनासाठी दिल्लीची निवड जाणीवपूर्वक केल्याचा उल्लेख करून स्मरणिकेच्या उपक्रमाचे कौतुक केले. संजय नहार यांनी भाषिक द्वेष नसावा, हा मराठीचा संदेश अधोरेखित करत संमेलनातील अनुभव मांडले. कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविक शैलेश वाडेकर यांनी केले, सुषमा नहार यांनी स्वागत केले आणि लेशपाल जवळगे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

#अखिलभारतीयमराठीसाहित्यसंमेलन #अभिजातमराठी #साहित्यक्षेत्र #भाषाविकास #मराठीअभिमान #साहित्यपरिषद #सरहदपुणे

SarhadSamana, Pune 23 Nov 2025
23/11/2025

Sarhad
Samana, Pune
23 Nov 2025

SarhadSakal, Pune 23 Nov 2025
23/11/2025

Sarhad
Sakal, Pune
23 Nov 2025

Address

Pune Kashmir Maitri Chowk, Late Khashaba Jadav Path
Pune
411046

Telephone

+912024368621

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarhad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sarhad:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram