09/08/2025
For additional details and registration form open the Google form :
https://forms.gle/ev9r7EJTvHu9txDBA
तुमच्या मुलाचं वय 0 ते 19 वर्षांच्या दरम्यान आहे का?
मुलांच्या विकासाची व पालकत्वाची सखोल समज मिळवण्यासाठी खास तयार केलेल्या या ऑनलाइन सेमिनार मालिकेत सहभागी व्हा — दोन महत्त्वाच्या टप्प्यांवर:
पालकत्व पहिल्या 12 वर्षापर्यंतचे (Age group 0 to 12 Years)
"मूल कसे घडते" या ऑनलाइन सिरीज मध्ये मुले घडत असतांना त्यांच्यात नेमके कोणते बदल होत असतात, ते बदल का घडतात याची माहीती आपल्याला मिळेल.
त्याच बरोबर त्यावेळी आपली त्यांच्याबरोबरची वागणूक कशी असावी जेणेकरून त्यांचा विकास चांगला होईल, त्यांच्यावर योग्य संस्कार होतील व चांगला अभ्यास करून घेण्यास मदत होईल याबद्दल मार्गदर्शनही मिळेल.
पालकत्व किशोरवयीन मुलांचे (Age group 12 to 19 Years)
या सेमिनर्स मधून तुम्हाला तुमची teenagers (किशोरवयीन मुले) समजून घ्यायला मदत होईल. तसेच या वयातील विकासाचे स्वरूप समजून घेता येईल. या सेमिनार मध्ये आपण बघणार आहोत
या वयातील मुलांच्या वागणुकीत हार्मोन्सचा प्रभाव आणि सामाजिक वातावरणाचा प्रभाव किती प्रमाणात असतो . त्यांचातील भावनिक बदल कसा सांभाळून घ्यायचा. या वयात resilience म्हणजेच विपरीत परिस्थितीतही टिकून राहण्याची क्षमता का महत्वाची असते आणि ती कशी निर्माण करायची. शिस्त लावण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि स्वयंशिस्त कशी निर्माण करायची