07/12/2025
trip trip
एकूणच एक मंगल दिन होता. सकाळी सर्व मंडळी अनुक्रमे ५.३० व ६.०० वा अनुक्रमे नेहरु स्टेडियम व एरंडवणे अग्निशामक संग्रहालय येथे वेळेवर उपस्थित होती. तसेच शीरसाट ट्रॅव्हलचे - चक्रधर श्री. बालू शिंदे हेही अगदी वेळेवर ५.२५ ला स्टेडियमवर पोचले व त्यामुळे सर्व नियोजित स्थळांना शांतपणे भेट देऊन सायं. ७.२० ला आम्ही परत पोचलो.
आजची सहल - लेले गुरुजी योग वर्ग आयोजित शिवनेरी किल्ला व चाकणचा - संग्रामदुर्ग सहल
यामधे वय वर्षे ११ पासून ७२ वर्षांपर्यतचे सर्व योगसाधक होते. दिवसभर अल्हाददायक हवामान, सुयोग्य वेळात - मोरे मिसळ, जुन्नर येथे घेतलेली (चविष्ट) न्याहरी, दुपारचे जेवळ व सायं - चाकण येथे चहा, रस्ते मोकळे मिळणे, श्री बाळूकाकांचे सावध व संयत गाडी चालवणे; शिवाय सर्वच सदस्यांची सावध व मनमिळाऊ वागणूक आणि सर्वात महत्वाचे नियमित करत असलेली योगसाधना यामुळे कोणत्याही प्रकारे शारीरिक किंवा मानसिक अडचणी न येता आजची सहल यशस्वी व आनंददायी झाली.
शिवनेरी वरील पहाण्यासारखी ठिकाणे - सर्व दरवाजे, शिवाईमातेचे मंदिर, बांधकाम साहित्याची मांडणी. जन्मस्थान, तलाव, कडलोट टोक, इ.
या सहलीचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे सौ. रमा लोहोकरे यांनी केलेली अभ्यासपूर्ण व भावनापूर्ण निवेदन. आज त्यांनी प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीची महाराष्ट्राची परिस्थिती, जिजाऊंची व शहाजींची मानसिकता, तसेच चाकण येथील सग्रामदुर्ग हा संग्रामदुर्ग का आहे याची माहिती दिली.
सर्व उपस्थितांना धन्यवाद