21/07/2025
“ब्रँडेड vs जनरिक औषधं – एवढा गोंधळ का निर्माण होतोय?”
काय कारणे असावीत ? बघूयात
1.डॉक्टरांनी लिहिलेलं औषध महाग असतं, मेडिकलवर विचारलं की “हेच जनरिक आहे स्वस्तात” – मग शंका निर्माण होते.
2.मेडिकलवाले आपोआप दुसरं ब्रँड देतात, → बदल चालतो का? डॉक्टर सांगितलेलं न पाळल्यामुळे त्रास तर होणार नाही ना?
3.नेटवर, WhatsApp वर, YouTube वर लोक सांगतात –
“Generic म्हणजे तेच औषध, ब्रँड म्हणजे पैसे कमवण्याचा प्रकार!”
4.एका आजारासाठी दोन रुग्ण वेगवेगळी औषधं घेतात, → मग वाटतं आपण जास्त का देतोय?
5.दीर्घकालीन औषधं महाग वाटतात,
→ दर महिन्याला खर्च, म्हणून स्वस्त पर्याय हवा असतो.
6.सरकारी हॉस्पिटलमध्ये फ्री औषधं मिळतात, → मग खासगी डॉक्टर वेगळीच औषधं का लिहितात?
7.औषध कंपन्यांची जाहिरातबाजी आणि मार्केटिंग, → ब्रँडेड औषधं लोकप्रिय केली जातात, जनरिक दुर्लक्षित.
8.डॉक्टर आणि मेडिकल यांचं संवाद कमी, → रुग्ण मध्ये अडकतो – कोणाचं ऐकायचं?
9.रुग्ण आणि केअरगिव्हर्सना फार्माकोलॉजी माहिती नसते,
→ “Salt तेच आहे” की “टेक्नॉलॉजी वेगळी” – हे कळतच नाही.
10.डॉक्टरांवरही आरोप होतात –
→ “ब्रँड लिहितात कमिशनसाठी” – पण त्यामागे क्लिनिकल अनुभव आणि विश्वास असतो हे दुर्लक्षित होतं.
पुढच्या पोस्टमध्ये पाहू –
जनरिक आणि ब्रँडेड औषधांमध्ये नेमका फरक काय? आणि रुग्णांनी काय निवडावं?
पण त्याआधी…
तुम्हाला वाटतं का की हे प्रश्न खरे आहेत?
तुमचाही अनुभव काय सांगतो? हे कमेंटमध्ये नक्की लिहा.
Dr Ravindra L Kulkarni
Just For Hearts
Repost / Share on WhatsApp / Follow 👉 this Page