NAAM MED +

NAAM MED + Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from NAAM MED +, Medical Service, A/p:/shop no. 8 Ashman pride , dehuroad, kiwale, Pune.

03/04/2019
18/03/2019

कलिंगडासोबत बियाही खाल्ल्याने काय होतं?
आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजारामध्ये कलिंगडच कलिंगड दिसू लागले आहेत. कलिंगड खाल्ल्याने उन्हामुळे शरीरातील कमी झालेले पाण्यावर आणि अवेळी लागण्याऱ्या भुकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. मात्र, कलिंग खाताना त्यातील बिया आपण फेकून देतो. मात्र, कलिंगडाप्रमाणेच त्याच्या बियाही आपल्या शरीरास फायद्याच्या असतात.

कलिंगडासोबत बियाही खाल्ल्याने रक्तदाब कमी करण्यास मदत होते. कलिंगडाच्या बियांमध्ये सिट्रालाइन हे अमायनो अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात आढळते. याचा उपयोग रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास होतो.

हृदयविकाराचा त्रास कमी करण्यासाठीही कलिंगडाच्या बिया उपयुक्त आहेत. बियांमधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट गुणर्धम हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत करतात.

अमेरीकन हार्ट असोसिएशननुसार कलिंगडाच्या बियांमधील फॅट्स घातक कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करतात.

किटाणूंच्या संसर्गाचा प्रतिकार करण्यासाठीही कलिंगडाच्या बियांचा उपयोग होऊ शकतो. या बिया क्लेबसिएला न्युमोनिया आणि सुडोमोनास एरुगीनासाचा प्रतिकार करण्यास फायदेशीर ठरतात.

🙏🏻🚩अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत  श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी  महाराजांच्या जयंतीनिमित्त  सर्व शिवभक्तांना शिव जयंतीच्या...
19/02/2019

🙏🏻🚩अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी
महाराजांच्या जयंतीनिमित्त
सर्व शिवभक्तांना शिव जयंतीच्या शिवमय भगव्या शुभेच्छा ...🚩🙏🏻
⛳ जय भवानी जय शिवाजी 🚩

14/02/2019
केसात कोंडा होणे 1. मेथीच्या पुडीला पाण्यात घालून लेप तयार करावा, आणि सबंध डोक्यावर लावावा. एक तासानंतर साबणाने डोके धुव...
09/12/2018

केसात कोंडा होणे
1. मेथीच्या पुडीला पाण्यात घालून लेप तयार करावा, आणि सबंध डोक्यावर लावावा. एक तासानंतर साबणाने डोके धुवून टाकावे.

2. केस धुताना वारंवार लिंबाचा रस वापरल्यास कोंडा कमी होण्यास फायदा होतो. कच्च्या बीटाची मुळे पाण्यात घालून पाणी उकळावे आणि त्या पाण्याने रोज रात्री डोक्याला मसाज करावी.

3. दोन-तीन दिवसाचे शिळे (आबंट दही), थोडासा लिंबाचा रस, व्हिनिगर आणि आवळ्याचा रस यांच्या वापरानेही कोंडा कमी होऊ शकतो.

4. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट करून घ्या. मग तुम्ही ही पेस्ट आणि दही एकत्र करून स्कॅल्प आणि केसांच्या मुळापर्यंत लावा. त्याचबरोबर मसाज देखील करा. मग 30 मिनिटाने केस धुऊन घ्या.

5. १०० मिली नारळाच्या तेलामध्ये लिंबाच्या बियांचे चूर्ण(20 ग्रॅम) चांगल्याप्रकारे मिसळून घ्या. आठवड्यातून दोन दिवस रात्री या तेलाने मालिश केल्यास डँड्रफची समस्या दूर होऊ शकते.

6. कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी दहीत कालीमिर्च चूर्ण मिसळून डोके धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा. यामुळे कोंडा नाहीसा होईल. केस सशक्त होतील.

7. काळी माती केसांसाठी चांगली असते. काळी माती दोन तास पाण्यात कालवून ठेवा. नंतर डोक्यास ही माती फासा आणि थोड्या वेळाने डोके धुवा. केसांच्या अनेक समस्या दूर होतील.

8. केसातला कोंडा कमी करण्यासाठी दही + अंडं + लिंबू + बेसन यांचं मिश्रण हा एक उत्तम लेप सिद्ध झाला आहे. सुकी त्वचा ही अल्कालाइन आहे, त्यावर हा लेप आम्ललाइन क्रिया करतो आणि त्वचेला समतोल ठेवतो.

9. त्रिफळा पावडर दह्यात भिजवून त्याचा लेपही एक उत्तम औषध म्हणून वापरण्यास काहीच हरकत नाही.

10. सङ्गरचंदापासून तयार केले जाणारे व्हिनेगार जे बाजारात सायडर व्हिनेगार म्हणून उपलब्ध असते ते घेऊन त्याच्यात समान पाणी मिसळून त्याला सौम्य करावे आणि कापसाच्या बोळ्याने ते केसांच्या मुळाशी लाऊन हलक्या हाताने मालिश करवी व नंतर थोड्यावेळाने धुऊन टाका.

08/12/2018
21/11/2018

व्यवसाय सुरु करताना
लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी

१. वेळ -
तुम्ही व्यवसायाला पुरेसा वेळ देऊ शकत असाल तरच व्यवसाय सुरु करा. इतरांवर विसंबून राहून तुम्ही व्यवसाय करू शकत नाही. वेळेचे योग्य नियोजन आवश्यक असते. व्यवस्यासाठी वेळ देणे म्हणजे २४ तास व्यवसायाच्या ठिकाणी बसून राहणे नव्हे. तर त्याचे कामकाज योग्य पद्धतीने चालत आहे कि नाही याकडे सतत लक्ष देणे आवश्यक असते. एकपेक्षा जास्त व्यवसाय असतील तर तुम्हले वेळेचे योग्य नियोजन करावेच लागते. प्रत्येक व्यवसाय त्याच्या १००% क्षमतेने चालावा यासाठी त्याला आवश्यक तो वेळ द्यावाच लागेल.

२. एकाच ठिकाणी १८ तास आणि कोणत्याही प्रकारचे, काम करण्याची तयारी -
एकाच ठिकाणी दिवसातील १८ तासांपेक्षाही जास्त वेळ काम करण्याची तयारी हवी. व्यवसायात काही वेळेस अशा घटना घडतात कि तुम्हाला त्यासाठी तहान भूक विसरून तासंतास काम करत राहावे लागते. कित्येक वेळा एखादी मोठी ऑर्डर असते, किंवा कामकाजात एखादी अडचण येते अशावेळी तुम्हाला तहान भूक विसरून तुमचे काम करावे लागते. अगदी दहा पंधरा अठरा तास सुद्धा व्यवसायाच्या ठिकाणी काम करत राहण्याची वेळ येऊ शकते. यासाठी तुमची मानसिक शारीरिक तयारी असणे आवश्यक असते. ९ ते ५ काम करण्याचा हक्क फक्त कामगारांना आहे मालकाला नाही. मालक हा २४ x ७ त्याच्या व्यवसायासाठी कर्मचारी असतो.
यासोबतच तुम्हाला व्यवसायात कोणत्याही प्रकारचे काम करावे लागू शकते. अचानक एखादा कर्मचारी काम सोडून गेला तर तुम्ही तुमचे काम ठप्प करू शकत नाही. व्यवसाय करत असताना अगदी लेबर सारखे काम करण्याची तयारी सुद्धा असली पाहिजे.

३. ग्रहण क्षमता, संवाद कौशल्य -
तुमच्यात उत्तम ग्रहण क्षमता असणे आवश्यक आहे. कमी बोलणे आणि जास्त ऐकणे हे उत्कृष्ट संवाद कौशल्याचे गमक आहे. समोरच्याच्या मनाचा ठाव घेणे आणि त्याच्याशी चर्चा करणे हे कसाब तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. ते नसेल तर तुम्हाला ते विकसित करावे लागेल. यासाठी चांगली निरीक्षण शक्ती आवश्यक आहे. ग्राहकांशी चांगला संवाद प्रस्थापित करणारा व्यवसायिक कधीही अपयशी ठरत नाही.

४. रागावर नियंत्रण -
यशस्वी व्यवसायासाठी तुमचे स्वतःच्या रागावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. राग तुमच्या प्रगतीसाठी अतिशय घातक असतो. राग तुम्हाला कळसापासून पायाशी कधी आणतो ते तुम्हालाही कळत नाही, आणि कळेपर्यंत वेळ निघूनही गेलेली असते. रागाच्या भरात नेहमीच व्यवसायाला धोका उत्पन्न होतील असे निर्णय घेतले जातात. कितीही राग आला तरी त्याचे पर्यवसान समोरच्याचे मन दुखावण्यात होणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. रागाच्या भरात कोणताही निर्णय न घेणे आवश्यक आहे. व्यवसायाच्या बाबतीत कोणताही निर्णय थंड डोक्याने घ्यावा लागतो. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असणे आवश्यक आहे.

५. आळस नसावा -
हा नियम कधीकधी माझ्याकडूनही मोडला जातो, आणि याची मलाही वेळोवेळी जबर किंमत चुकवावी लागलेली आहे. आळस हा आपला खूप मोठा शत्रू आहे. एकवेळ इतर बाबतीत निभावून नेणं शक्य आहे पण आळसाच्या बाबतीत कसलीही माफी नसते. आळस हा नेहमीच तुम्हाला काळाच्या मागे नेतो. व्यवसायात कोणत्याही कामासाठी आळस नसावा. कंटाळा आला म्हणून एखादे काम पुढे ढकलणे हे व्यवसायाला ओहोटी लावते.

६. नुकसानीची मानसिकता -
व्यवसायात नुकसान होणार हि काळ्या दगडावरची रेघ असते. व्यवसायात पदार्पण करतानाच तुम्ही नुकसान होणार या टर्म्स & कंडिशन ला अप्रत्यक्षपणे सहमती दर्शवली असते. त्यामुळे नुकसान झाले म्हणून खचून जाऊ नये. नुकसानाला खंबीरपणे सामोरे जाण्याची तयारी हवी. नुकसान हा व्यवसायाचा भाग आहे. नुकसान नाही असा व्यवसाय नाही आणि असा व्यवसायिकाही नाही.
खरं तर ज्याला आपण नुकसान म्हणतो मी त्याला गुंतवणूक समजतो. हि गुंतवणूक तुम्हाला अनुभवसिद्ध करण्यासाठी, भविष्यातील मोठ्या संकटांना खंबीरपणे तोंड देण्यासाठी सक्षम करण्यासाठी आवश्यक असते.

७. आत्मविश्वास, सकारात्मकता -
यशस्वी व्यवसायासाठी आत्मविश्वास, सकारात्मक विचार आवश्यक असतो. कोणत्याही बाबीत नकारात्मकता तुम्हाला स्पर्धेमधे पिछाडीवर नेते. व्यवसाय सुरु करण्यापूर्वी तो यशस्वी होईल कि नाही हा विचार तुमच्या मनात येत असेल तर तुम्ही अजूनही व्यवसायासाठी तयार नहित हे लक्षात घ्या. काही काळ थांबा आणि ज्यावेळी तुमची हि मानसिकता संपेल त्याचवेळी व्यवसायात पाऊल ठेवा. प्रत्येक बाबतीत नकारात्मक विचार करणारे आपल्यासोबतच आपल्या सहकाऱ्यांनाही नकारात्मक करत असतात. यांची प्रगती होणे अशक्य असते. स्वतःवर विश्वास खूप आवश्यक आहे.

८. न्यूनगंड -
न्यूनगंड हे व्यवसायातील अपयशाचे खूप मोठे कारण आहे. कोणत्याही गोष्टींमधे स्वतःला कमी समजने हे तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम कार्यापासून परावृत्त करते. न्यूनगंडापासून वेळीच लांब जाणे व्यवसायासाठी आवश्यक असते.

९. संयम -
संयमासारखा हिरा शोधूनही सापडणार नाही. संयम बाळगण्यासाठी सुद्धा खूप संयम लागतो. संयम असेल तर तुम्ही कठिणातील कठिन प्रश्न मार्गी लावु शकता. परिस्थीती कशीही असली तरिही कोणत्याही परिस्थितीत संयम न गमावणारा यशस्वी होतोच. स्वतःवर संयम ठेवण्याची प्रक्रिया खूप कठीण आहे, पण प्रयत्नांती आपण त्यावर विजय मिळवू शकतो. मला स्वतःला यासाठी कित्येक वर्षे लागलेली आहेत. व्यवसायात पहिल्या सहा महिन्यातच धीर सोडणारे आपल्याकडे कमी नाहीत, अशांसाठी तर संयम खूप आवश्यक आहे. कारण व्यवसायात पुढचा रस्ता सहा महिन्यांनी नाही तर किमान दोन वर्षांनी स्पष्ट होत असतो. संयमी व्यक्तीची आणखी एक खासियत असते ती म्हणजे हे लोक इतरांपेक्षा नेहमीच वेगळे वाटत. स्वतःवर ताबा ठेवण्यासाठी तुम्हाला मानसिक दृष्ट्या खूप खंबीर असणे आवश्यक असते, हि खंबीर वृत्ती अशा लोकांच्या चेहऱ्यावर प्रखरतेज निर्माण करते. यशस्वी लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज असते, ते याच आत्मविश्वासातून, संयमी मानसिकतेतून आलेले असते.

१०. स्व प्रतिमा -
तुमच्या वैयक्तीक प्रतिमेचा तुमच्या व्यवसायावर परिणाम होत असतो, त्यामुळे तुमची समाजातील प्रतिमा कधीही बिघडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. व्यवसाय आणि वयक्तिक आयुष्य या वेगवेगळ्या बाबी आहेत हा बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे पहिले ब्रँड अँबेसेडर असता. तुमची समाजातील चांगली प्रतिमा तुमच्या व्यवसायाला सुद्धा उत्कर्ष मिळवून देते. स्वप्रतिमेला काचेच्या वस्तूप्रमाणे जपा.

एक चांगला उद्योजक / व्यवसायिक होण्यासाठी या किमान बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. स्वतःमधे आवश्यक ते परिवर्तन करून स्वतःला व्यवसाय योग्य बनवणे आवश्यक आहे. यात आपण कुणीही १००% परफेक्ट नाही. मीसुद्धा नाही. मीसुद्धा सतत माझ्यात परिवर्तन करायचा प्रयत्न करत असतो. आणि त्याचा चांगला परिणाम माझ्या कामावर नक्कीच दिसतो. पण या गोष्टी आपल्याला व्यवसायिक आयुष्यात सतत जाणवतात. यातील कमतरता आपल्याला कित्येक ठिकाणी माघार घ्यायला भाग पडते. ,म्हणून या महत्वाच्या १० गोष्टींना आपण नियम समजूनच चालले पाहिजे आणि या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

विश्वास ठेवा; यश तुमचेच असेल.

व्यवसाय साक्षर व्हा...
उद्योजक व्हा...
समृद्ध व्हा........................
साभार-फेसबुक

https://www.youtube.com/watch?v=DkPbp_JeZwMHi friendz,What are Generic Medicines ?Why are they affordable than Branded /...
27/10/2018

https://www.youtube.com/watch?v=DkPbp_JeZwM

Hi friendz,

What are Generic Medicines ?
Why are they affordable than Branded / Ethical drugs ?
Are they equally effective in the compare of Branded Medicines ?

To know more please watch the video till the end and if you like then don’t forget to subscribe & share my YouTube channel DrugDaddy

Thank You 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो,

जेनेरिक मेडिसिन्स म्हणजे नक्की काय ?..
जेनेरिक मेडिसिन्स स्टॅंडर्ड औषधांपेक्षा इतकी स्वस्त का असतात ?..
जेनेरिक मेडिसिन्स एकदम स्टॅंडर्ड कंपनी च्या औषधांसारखे काम करतात का ?..

अधिक जाणून घ्यायचे असल्यास विडिओ ला शेवटपर्यंत पहा आणि यासारखे videos आणि त्यांचे नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी माझ्या YouTube चॅनेल DrugDaddy ला Subscribe करायला विसरू नका.. आणि या विडिओ ला तुमच्या फेसबुक वर पोस्ट आणि शेअर करायला विसरू नका .... 😊

Thank You 

Hi friendz, What are Generic Medicines ? Why are they affordable than Branded / Ethical drugs ? Are they equally effective in the compare of Branded Medicine...

Address

A/p:/shop No. 8 Ashman Pride , Dehuroad, Kiwale
Pune
412101

Opening Hours

Monday 8:30am - 11pm
Tuesday 8am - 11pm
Wednesday 8am - 11pm
Thursday 8am - 11pm
Friday 8am - 11pm
Saturday 8am - 11pm
Sunday 8am - 11pm

Telephone

+919595774321

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NAAM MED + posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram